.. फ़ुलून घे जरा

Submitted by प्राजु on 7 January, 2013 - 22:06

प्राक्तनाचा फ़ोड कातळ.. रुजून घे जरा
भीड, चिंता सोड तळमळ... जगून घे जरा

पावसाळे वा उन्हाळे.. नको तुला तमा
वाटले आता भिजावे.. भिजून घे जरा

भाळणे हा धर्म आहे.. मना तुझा खरा
सोड अब्रूचे बहाणे.. फ़सून घे जरा

जीवना चढली तुला का.. जगायची नशा?
सांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा

मोगरा प्राजक्त जाई.. जुईच का म्हणे??
होत कोरंटी, अबोली.. फ़ुलून घे जरा

वाट काट्यांची निवड अन.. असाच चाल पण
सावली दिसताच तेथे.. निजून घे जरा

वय कशाला आड यावे.. सजा-धजायला
माळ गजरा, रेख काजळ.. सजून घे जरा

ओढुनी आकाश थोडे.. निशा व चंद्र घे
चांदणे माझ्यात आहे... लुटून घे जरा...

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राक्तनाचा फ़ोड कातळ.. रुजून घे जरा
भीड, चिंता सोड तळमळ... जगून घे जरा

पावसाळे वा उन्हाळे.. नको तुला तमा
वाटले आता भिजावे.. भिजून घे जरा

भाळणे हा धर्म आहे.. मना तुझा खरा
सोड अब्रूचे बहाणे.. फ़सून घे जरा

जीवना चढली तुला का.. जगायची नशा?
सांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा

मोगरा प्राजक्त जाई.. जुईच का म्हणे??
होत कोरंटी, अबोली.. फ़ुलून घे जरा

जबरी प्राजु.... भन्नाट आवडली गझल.

पुलेशु.

>>>सांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा<<< - व्वा व्वा व्वा! एकदम नशिला आणि सिग्नेचर म्हणून सांगता येईल असा शेर! सांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा<<< व्वा!

गझल आवडली.

भाळणे हा धर्म आहे.. मना तुझा खरा
सोड अब्रूचे बहाणे.. फ़सून घे जरा

वय कशाला आड यावे.. सजा-धजायला
माळ गजरा, रेख काजळ.. सजून घे जरा

चांदणे माझ्यात आहे... लुटून घे जरा...<<<

वा वा!

लयीत मात्र थोड अडखळत आहे मी अजूनही!

तुमच्या आजवरच्या गझलांपैकी एक उमदी गझल!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मनापासून आभार मंडळी.

@बेफिजी.. माहित नाही असे वृत्त आहे की नाही ते.. पण गालगागा गालगागा.. लगालगालगा... अशी लगावली घेतली गेली आहे. पहिली ओळ जसी सुचली त्याप्रमाणे इतर मिसरे बांधले आहेत.
गझलेमध्ये अशी वृत्त नसलेली.. तरी सर्टन लगावली ची गझल चालते की नाही ते ही माहीत नाही. असो.. धन्यवाद.

गझलेमध्ये अशी वृत्त नसलेली.. तरी सर्टन लगावली ची गझल चालते की नाही ते ही माहीत नाही<<<

असे काही नाही. घेतलेली व मतल्यात प्रस्थापित झालेली (अक्षरगणवृत्त असल्यास) लगावली पाळली गेली की झाले. खरे तर काहीजण याला चालही लावू शकतात. पण गझल वाचल्यानंतर ओळी उच्चारताना कश्या उच्चारल्या की आणि कुठे यती मानलाकी उच्चारणे लयबद्ध होईल ते तपासत राहावे लागते वाचणार्‍याला. मला अजूनतरी तो शोध लागलेला नाही या वृत्ताबाबत!

Happy

गझल मस्तच

गालगागा गालगागा नंतर एक मोठा यती घ्यावा लागतो आहे त्यामुळे लयीत अडखळताहेत मिसरे!

पण खयाल भारी, अभिनंदन.