"आज कॉफी वेगळी पण छान लागतेय. कुठुन आणली?" - मी
"मैत्रिणीने दिली. चिकमंगळूर ला गेली होती ती. तेथुन आणली तिने." - बायको.
कॉफी घेता-घेता तिचे चिकमंगळूरचे फोटोज् पहात होतो.
ऑगस्ट सुरु होता. कॅलेंडर बघितले. १५ ऑगस्ट बरोबर बुधवारी येत होता. नुकतेच रीलीज झाले असल्याने ऑफिसमध्ये काही खास काम पण नव्हते. गुरुवार, शुक्रवार सुटी टाकली तर ५ दिवस सलग मिळत होते.
त्यातच मुंबईच्या काही मित्र-मैत्रिणींना फोन केला तर ते पण तयार झाले. लगेचच हॉटेल्सचा शोध सुरु झाला.
चिकमंगळूर परीसरात कॉफीच्या मळ्यातले होम स्टे (बंगले) प्रसिद्ध आहेत. ह्यांचा दर सिझनवर अवलंबुन असतो. आम्हाला १५००/- दर माणशी दर रात्री असा होम स्टे मिळाला. हे सर्व बंगले चिकमंगळूर शहरापासुन बाहेर जंगलात किंवा मळ्यात असतात. हे सर्व मळे खाजगी असल्याने तिथपर्यंत जायचा रस्ता यथा-तथाच किंवा कधी-कधी नसतोच. त्यामुळे स्वतःची गाडी असणे फार गरजेचे आहे.
चिकमंगळूर बंगलोर पासुन २५० किमीवर आहे. बराचसा रस्ता खुप चांगला आहे. १२०-१३० चा वेग आरामात गाठता येतो. मध्ये थोडा-फार खराब पॅच आहे. पण बंगलोरच्या बाहेर पडायलाच २ तास लागतात.
असो. सकाळी १० ला घराबाहेर पडलो व टाईमपास करत, फोटोज् काढत दुपारी ३ वाजेपर्यंत चिकमंगळूरला पोहोचलो.
ह्या भागात झेंडूचे पण बरेच मळे आहेत.
प्रचि १
-
-
जो बंगला रहायला बुक केला होता तो अगदी भन्नाट जागी होता. कॉफी मळ्यात अगदी आत चारही बाजुने कॉफी मळ्यांनी ने वेढलेला, समोरच थोड्याच अंतरावर मोठा डोंगर व त्यावर घनदाट जंगल व खाली एक मोठा तलाव. नितांत सुंदर जागी हा बंगला होता.
बंगल्याकडे जाण्याचा रस्ता. दोन्ही बाजुला कॉफीचे मळे आहेत.
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
कॉफी
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
सिल्व्हर ओक आणि काळी मिरीच्या वेली.
-
-
-
प्रचि ७
-
-
-
संध्याकाळपर्यंत बाकी सर्व जण पण येऊन पोहोचले.
पावसाळा होता म्हणुन हवेत थंडी होती. समोर व्हरांड्यात सर्व जण खुर्च्या टाकुन बसले होते. तिथल्या कुक ने गरम -गरम सूप आणुन दिले. एकाने मोठी शेकोटी लावुन दिली. पिक्शनरी, गप्पा, खाणे-पिणे ह्यात संध्याकाळ गेली.
दुसर्या दिवशी सकाळी मुलायनागिरी शिखर पहायला निघालो. हे कर्नाटकातील सर्वात ऊंच शिखर (१९३० मी) मानले जाते.
प्रचि ८
मुलायनगिरी
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
मुलायनगिरी समोर दिसणारा एक डोंगर.
-
-
-
तिसर्या दिवशी हेब्बे आणि कलाहत्ती धबधबे पहायला निघालो. ईथे जाणारा रस्ता अगदी घनदाट जंगलातुन गेला आहे. रस्ता तर अतिशय वाईट आहे आणि शिवाय गाडीला काही झाले तर जवळपास २०-३० किमीच्या परिसरात वस्तीही नाहिये. जवळपास ४० किमीचा वाईट पॅच आहे. हेब्बे फॉल्सजवळ पोहोचल्यावर कळले की हा धबधबा पर्यटकांना बंद केला आहे. मग तसेच पुढे कलाहत्ती फॉल्स ला निघालो.
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
पच्शिम घाटातील जंगलातले रस्ते
-
-
-
प्रचि १६
पच्शिम घाटातील जंगल
-
-
-
प्रचि १७
पच्शिम घाट
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
कलाहत्ती फॉल्स
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
परतताना लागलेले काही कॉफी मळे
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
-----------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत. क्रमशः
आगामी आकर्षणः लेपाक्षी, आंध्र प्रदेश.
मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
http://www.maayboli.com/node/15407
नेहमीप्रमाणे खासच, चंदन
नेहमीप्रमाणे खासच, चंदन
मनापासुन धन्स रे 
तुझ्या प्रचिंतुन मस्त कर्नाटक फिरायला मिळाले.
अफलातुन मित्रा ... सर्व
अफलातुन मित्रा ...
सर्व पॅनोरमा खासच ...
सुंदर आहेत सर्व प्रचि.....
सुंदर आहेत सर्व प्रचि..... पहिले झेंडुचे आणि १२,१४,१९,२० तर अगदी देखणे
क्या बात! क्या बात!! क्या
क्या बात! क्या बात!! क्या बात!!!
मस्त रे... सगळेच प्रचि सुंदर
सुपर्ब फोटोज !!!!
सुपर्ब फोटोज !!!!
(No subject)
सगळे प्रचि खासच!!!!
सगळे प्रचि खासच!!!!
मस्त फोटो. चिकमंगळुर आणि
मस्त फोटो. चिकमंगळुर आणि मंगळुर एकच का? नसल्यास काय फरक आहे?
१२ आणि २० अप्रतिमच. १८ मध्ये
१२ आणि २० अप्रतिमच.
१८ मध्ये एक मस्त गूढ फिलींग येतय. तो पण खासच.
सुपर्ब!!
सुपर्ब!!
कस्ला सुंदर निसर्ग आहे.....
कस्ला सुंदर निसर्ग आहे..... सर्व प्र चि अप्रतिमच....
प्र चि ८ पासून सगळे झकास. दोन
प्र चि ८ पासून सगळे झकास.
दोन धबधब्यानच्या मध्ये त्या खडकात देवाची स्थापना करायला कोण गेलं बरं ?
हे कसं सगळं आपलं आणि म्हणूनच
हे कसं सगळं आपलं आणि म्हणूनच आवाक्यातलं वाटलं ..
आहाहा.. सुपर्ब , देखणे फोटो..
आहाहा.. सुपर्ब , देखणे फोटो.. पाहताना बरं वाटलं अगदी
सही!
सही!
सहीच. एकदम गुढ.
सहीच. एकदम गुढ.
सुंदर फोटोज चंदन.
सुंदर फोटोज चंदन.
चिकमंगळूर अत्यंत सुंदर आहे.
चिकमंगळूर अत्यंत सुंदर आहे. बंगलोर ते चिकमंगळूर रस्ता पण मस्त आहे, सिनीक. :). माझ्या बंगळुरुच्या बेफ्रें चे माहेर चिकमंगलूर ला होते त्यामुळे त्या शहराबद्दल बरेच ऐकलेही आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा तर पावसाळ्यात फारच नेत्रसुखद होते सर्व काही.
तिथे खूप सही सही रिसोर्ट्स पण आहेत. कॉफी डे चे The Serai रिसोर्ट पण अतिशय सुरेख आहे. अप्रतिम व्ह्यू, आसपास सर्व कॉफीचे मळे ..
सुरेख प्रचि ८.९, १८, १९ फार
सुरेख
प्रचि ८.९, १८, १९ फार आवडले. खरच अतुल्य भारत!
सुंदर!
सुंदर!
अतीसूंदर
अतीसूंदर
सुरेख आहेत सगळेच फोटो.
सुरेख आहेत सगळेच फोटो.
मस्तच रे रच्याकने, आता छप्पर
मस्तच रे

रच्याकने, आता छप्पर चांगलच उडलेलं दिसतयं की रे
सुरेखच आहेत सर्व फोटो
सुरेखच आहेत सर्व फोटो
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
झक्कास !
झक्कास !
धन्स
धन्स लोक्स...

-----------------------------
जिप्सी,
अरे कर्नाटक अजुन बाकी आहे. तोच-तोचपणा येत होता म्हणुन म्हटले पुढच्या वेळेला वेगळे राज्य घ्यावे.
वैतागलास तर नाही ना?
-----------------------------
सायो,
चिकमंगळूर पच्शिम घाटात येते. हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर मंगळूर समुद्रकिनारी (अरबी समुद्र, गोव्याच्या खाली) येते. दोन्हीही कर्नाटकातच आहेत.
-----------------------------
आता छप्पर चांगलच उडलेलं दिसतयं की रे>>>
हो रे... काय करतोस सांग?
जिप्सी, अरे कर्नाटक अजुन बाकी
जिप्सी,
अजुन येऊ देत.
अरे कर्नाटक अजुन बाकी आहे. तोच-तोचपणा येत होता म्हणुन म्हटले पुढच्या वेळेला वेगळे राज्य घ्यावे.
वैतागलास तर नाही ना?>>>>>बिलकुल नही
तोचतोचपणा बिलकुलच नाही. उलट प्रत्येक भागात वेगवेगळेपणा जाणवतोय. और आने दो.
चंदन, तसं नाही रे नॉयडात
चंदन, तसं नाही रे नॉयडात असताना बरं होतं की ...
चंदन .... सुर्रेख फोटू !!
चंदन .... सुर्रेख फोटू !!
Pages