पाणी..

Submitted by रसप on 6 January, 2013 - 01:56

चालताना पाउले भिजवायचे पाणी
तू किनारा सोडता खवळायचे पाणी

फाटले काळीज पण ना वाहतो अश्रू
पापणीवर नेहमी साठायचे पाणी

खेळ माझा अन तुझा झाला जुना, दैवा
मी लिहावे स्वप्न, तू फिरवायचे पाणी

खुर्द आणिक बुद्रुकाच्या आखल्या सीमा
पण नदीला कोठुनी आणायचे पाणी

घाव सारे झेल छातीवर तुझ्या 'जीतू'
वार तू करता न ते मागायचे पाणी !

....रसप....
५ जानेवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/01/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! मस्त **अकाउंट उघडलाय रसप !
** नव्या वर्षातली तुमची नवी पहिलीच सुंदर रचना, म्हणून असे म्हटले ! क्षमस्व, अंगात बँकर संचारला माझ्या Happy

(संपादित )

रणजीत तुझा पाहिला व शेवटचा शेर असा वाचून पाहिला........तुझ्या शेरांना पर्याय नव्हेत!

मी किनारी थांबता परतायचे पाणी!
पण, किनारा सोडता बिलगायचे पाणी!!

याचसाठी झेल 'जीतू' वार छातीवर.....
वार करणारेच तुज मागायचे पाणी!

...........प्रा.सतीश देवपूरकर

चालताना पाउले भिजवायचे पाणी
तू किनारा सोडता खवळायचे पाणी

किनाऱ्यावर आपण दोघं चालत असताना पायाशी खेळकरपणे येऊन पाउले भिजवणारे पाणी तू तिथून निघून जाताना खवळून अंगावर यायचे. - असा दृश्य अर्थ आहे. खवळणारे पाणी डोळ्यातले असू शकते का ? ते अनावर उचंबळाचे प्रतीक असू शकते ? हे मला माहित नाही. पण तशी अपेक्षा आहे..!

खुर्द आणिक बुद्रुकाच्या आखल्या सीमा
पण नदीला कोठुनी आणायचे पाणी

व्वा..! रणजीत... चांगली गझल.

तू जशी लिहिलीस तशीच वाचली मी... Happy

खुर्द आणिक बुद्रुकाच्या आखल्या सीमा
पण नदीला कोठुनी आणायचे पाणी....व्वा...

आवडली गझल.

सर्व शेर आहेत तसेच जास्त आवड्ले
गझल खूप छान आहे

भारतीताई बहुधा रसप या आय्डी नेम बद्दल बोलत आहेत

वा सर मस्त गझल करता तुम्ही

तुमचा नवीन गझल संग्रह प्रकाशित झाल्याचे समजले खूप आनंद झाला
अभिनंदन सर
संग्रहाबद्दल अधिक माहिती द्याल का
मुख्यतः ; हा कुठे मिळेल? ..(फुकटात हवा आहे ;))

खेळ माझा अन तुझा झाला जुना, दैवा
मी लिहावे स्वप्न, तू फिरवायचे पाणी

खुर्द आणिक बुद्रुकाच्या आखल्या सीमा
पण नदीला कोठुनी आणायचे पाणी<<<

वा वा

खेळ माझा अन तुझा झाला जुना, दैवा
मी लिहावे स्वप्न, तू फिरवायचे पाणी

>>>
वाह!

चालताना पाउले भिजवायचे पाणी
तू किनारा सोडता खवळायचे पाणी

>>> हा एक्सप्लेनेशन वाचल्यावर आवडला Happy

गझल मस्त आहे रणजित,

खेळ माझा अन तुझा झाला जुना, दैवा
मी लिहावे स्वप्न, तू फिरवायचे पाणी
व्वा....

शुभेच्छा