संक्रांतीच वाण काय द्याव?

Submitted by आकांशा on 5 January, 2013 - 05:51

नमस्कार,
मी नवीनच मायबोलीमध्ये प्रवेश केला आहे.
मला संक्रांतीच वाण काय द्याव? ह प्रश्न पडला आहे, जे वाण लुटणार आहोत त्याचा उपयोग झाला पाहीजे. कृपया मला अश्या वस्तू सुचवाव्यात. वाट्या, चमचे, प्लॅस्टीक वस्तू सोडून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे झालेल्या चर्चेचा आपणांस काही उपयोग होऊ शकेल.

त्याच बाफवरची मेधा यांची पोस्ट वाचा, तसेच अनु३ यांचीही पोस्ट वाचा आणि त्यावर जरूर विचार करा.

माझा सल्ला पटणार नाही, गेली काही वर्षे आमच्या घरी हे हळदीकु़कू जाणीवपूर्वक बंद केले आहे, त्या ऐवजी आमच्या घरात काम करणार्‍या बाईंना आम्ही त्यांच्या घरात उपयोगी पडेल असे एखादे मोठे भांडे वगैरे, त्यांना विचारूनच देतो. त्यांना एखाद्या वर्षी पैश्याची गरज असेल तर पैसेच देतो.
एखाद्या संस्थेलाही मदत करू शकाल, त्यातून पूण्य वगैरे मिळते का ते मला माहीत नाही, पण मनाचे समाधान आणि संस्थेतील लोकांचे आशिर्वाद नक्कीच मिळतील.

हे घ्या भरपुर चॉईस देतेय

१.कडधान्याची लहान पाकिटे
२.साखर, चहापावडरची लहान पाकिटे
३.नारळ
४.साबण, तेल, फेस पावडर, सिंदुर स्टिक, टिकल्या,कंगवा
५.मिठाईचा लहान बॉक्स
६.ब्रासचे लहान दिवे, डेकोरेटिव्ह दिवे, अ‍ॅरोमा ऑईलचे दिवे
७.स्टोरेज करण्यासाठीच्या काचेच्या लहान बरण्या, डब्बे
८.सुगंधित अगरबत्ती, अ‍ॅरोमा ऑईलच्या लहान बाटल्या
९. हल्ली त्या चांदीसारख्या दिसणारया पण चांदी नसणारया वस्तु देखील खुप छान अवेलेबल आहेत त्या बघा ( त्यांना नेमके काय म्हणतात माहित नाही)
१०. इमिटेशन ज्वेलरीमधील एखादा लहानसा दागिना
११. एखादी लहानशी पण जरा हटके वाटणारी पर्स
१०.वेगळा प्रकार पण आधुनिक स्त्रियांना उपयोगी होईल असा Happy मोबाईल रिचार्जचे सर्वांत कमी किंमतीचे कार्ड ( आता सर्वांकडे सेम कंपनीचे सिम कार्ड नसेलच म्हणा )

अजुन काही आठवले तर सांगेन Happy

सगळ्यांना धन्यवाद,

अनघा - बजेट साधारण १०-१५ रुपये प्रत्येकी,
मंजूडी - छान माहीती
दिनेशदा- मी पण दरवर्षी ऑफिसमध्ये सफाई करणा-या मावशींची ओटी भरते.

आकांशा, छान वाटलं. पुर्वी साधारण त्याच त्याच वस्तू वाणात दिल्या घेतल्या जात. जितक्या आपण देतो तितक्याच परत येतात. एवढ्या गाळण्या / कंगवे / सोप डीश यांचा वापरही होत नाही. त्यापेक्षा त्या पैशाच्या कुणा गरजवंताचा उपयोग झाला तर चांगला, हा विचार आम्ही केला. अर्थात आई वहिनीच्या मैत्रिणी घरी यायला
निमित्त लागत नाही. त्या नेहमीच येत असतात.

शोभेच्या कोणत्याही वस्तू वाया जाण्याची शक्यता आहे. म्हणून वर सुचवले आहे तसे
खाद्यपदार्थ हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय कुणी शिवून देणार असेल तर भाजीसाठी पिशव्या शिवून वाण देता येईल. इतर म्हणजे - फ्रिजमधल्या पिशव्या, कपड्याचे चिमटे, मेणबत्त्या इ. इ.

रेडीमेड शेवयांचे पॅकेट्स म्हणजे खिर बनवतो त्या शेवया Happy
की चेन
भांडी घासायचा साबण व्हीम किंवा तत्सम कोणताही
गुळाची लहान ढेप
दलियाचे लहान पॅकेट्स

गेल्या वर्षी मी अशी खिचडी लुटली, पर्लपेट च्या बरण्यातुन.

wan.jpg

आई बरीच वर्ष न चुकता हळदी कुन्कु करत असे. ती अनेक भाज्या आणुन त्याचे सोरट करायची. म्हणजे जितक्या बायका तितक्या भाज्या आणायच्या आणि चिठयांवर भाज्यान्ची नाव लिहायची. एकेकीला एक चिठी उचलायला सांगायची.
एकदा तिने पाककृतांची छोटी पुस्तक मिळतात ती पण लुटली होती. अगदी १०-१२ रुपयांपासुन मिळतात.
एक वर्ष तुळशीची रोपं
मसाल्यांच सोरट पण केल होतं, एक वर्ष खडे मसाले, एक वर्ष तयार मसाल्यांच्या पुड्या.
मधाची बाटली देऊ शकता.

मला वाटतं दरवर्षी संक्रांतीच्या काही दिवस अगोदर असा एखादा धागा निघतो किंवा विचारणा होतेच होते! Happy

वस्तूंमध्ये कितीतरी पर्याय आहेत, वर बरेच चांगले पर्याय सुचवलेत, तसेच समाजकार्याचा, गरजूंना काही देण्याचा पर्यायही आहे.

काही वेगळे द्यायचे झाल्यास :

१. नव्या वर्षाचे पॉकेट कॅलेंडर
२. राहत्या शहराची छापील माहिती असणारी छोटी डायरी
३. सुती पिशव्या / फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्याच्या जाळीच्या पिशव्या / कागदी पिशव्या (आकर्षक हँडबॅग्ज)
४. वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास लहान बरणी/बाटलीत भरून... किंवा अशा तयार विविध आकारांच्या बाटल्याही मिळतात.
५. अत्तरे. (अर्थात अत्तर १५-२० रुपयांत येणार नाही)
६. तयार मसाल्यांची छोटी पाकिटे : उदा एवरेस्ट / सुहाना असे मसाले. किंवा अनेक तयार पदार्थ आजकाल सॅशे मध्ये मिळतात. मेतकुटे, चटण्या - लोणच्यांची पाकिटे.
७. गिफ्ट देण्याच्या पाकिटांचा संच
८. आकर्षक बुकमार्क्स.

अत्तराची एम आर पी सकट २५ ग्राम ची बाटली २५ रु. प्रत्येकी पडेल. ३- ८ - १० ग्राम च्या स्वस्तातल्या बाटल्या १५ परेन्त उपलब्ध आहेत. ती खिचडी खूप मस्त दिसते आहे. घरी चॉकोलेट्स बनवून ती ही ३ -४ अशी एका पॅक मध्ये डे़कोरेट करून देता येइल.

मतिमंद मुले/ आदिवासी अश्या गटांनी बनविलेली उत्पादने सोर्स करून दिलीत तर त्यांनाही प्रोत्साहन मिळेल.

डिटरजंट साबण पावडर, शांपू, तेल यांचे सॅशे देता येतील. हे फारच प्रॅक्टिकल झाले पण उपयोगास येइल नक्की. आजकाल मोइस्चरायझर पण छोट्या पाकिटात येते. नॉर सूप ची छोटी पाकिटे १२ रु. ला उपलब्ध आहेत. क्यूट आहेत. हॅपी संक्रांती.

संक्रांतीचे वाण नेमके का द्यायचे हे आधी जाणून घ्या. दिल्याने वृद्धी होते, वाढ होते असे आपण मानतो. त्यामुळे "द्यायचेच आहे. द्यावे लागते" म्हणून देऊ नका. वाटल्यास कमी बायकांना बोलावून द्या, पण चांगली, वापरातली आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या. (नुकताच वाणावरचा एक लेख एका व्यक्तीला लिहून दिल्यने प्राप्त झालेले ज्ञान)- वाणामधे साबण अथवा शांपू चालत नाहीत. तेल दिले तर सौभाग्यवाणामधे येते त्यामुळे कंगवा, आरसा, काजळ आणि गजरा द्यावा लागतो. शिजवलेले खाद्यपदार्थ देखील चालत नाहीत, मात्र कोरडा शिधा दिलेला चालतो. त्याहीमधे खिचडी देणे चांगले मानतात. वाणामधे पहिल्या वर्शी हळदी कुंकू, दुसर्‍या वर्षी बांगड्या, तिसर्‍या वर्षी कंगवा आरसा, चौथ्या वर्षी खिचडी, पाचव्या वर्षी नारळ लुटले जातात. पाचव्या वर्षानंतर आपल्याला जमेल ती वस्तू दिली जाते. ढीगभर बायकांना बोलावून काहीतरी हातात थोपवण्यापेक्षा कमीजणींना बोलावून उत्तम प्रतीची वस्तू देणे जास्त हितकर. त्यातही सर्वांना समानच वाण दिले पाहिजे अशी अपेक्षा असते. एकीला एक द्यायचे आणि दुसरीला भलते असे करू नये. अर्थात ही झाली पारंपारिक मते.

मी माझ्यापुरतं तरी "जिला गरज आहे तिला देणे" हे जास्त श्रेष्ठ मानते. मागच्या वर्षी आमच्याकडे काम करणार्‍या दोन्ही बहिणींना साडी आणि जेवायची थाळी दिली होती. यावर्षी कामवालीचा ख्रिसमस असल्याने तिला आधीच साडी आणि तिच्या मुलांना दप्तरं घेऊन दिली आहेत. लेकीचे बोरन्हाण करायचा बेत असल्याने लहान मुलांना उपयोगी ठरतील अशी पुस्तके देणार आहे.

रायबागान,

सॉरी, शक्य नाही. दुसर्‍या व्यक्तीला तिच्या नावाने प्रसिद्ध करण्यासाठी लिहून दिला आहे.

नंदिनी छान माहिती..... पहिल्या पाच वर्षाबद्द्ल योग्य लिहीलेस. मात्र माझ्यावेळी मी खिचडी सोडुन तु सांगितलेले इतर पाच प्रकार दिले आहेत.

ढीगभर बायकांना बोलावून काहीतरी हातात थोपवण्यापेक्षा कमीजणींना बोलावून उत्तम प्रतीची वस्तू देणे जास्त हितकर
<<<<<< हे पटले , याबाबतीत काय होते. एका बिल्डिंग मधील, एका कॉम्प्लेक्स मधील खुप सारया स्त्रिया आपल्या ओळखीच्या होतात. त्यातील काही तोंडओळख किंवा हाय-बाय वाल्या जरी सोडुन दिल्या तरी खुपजणी होतात. मग एकीला बोलवायचे एकीला नाही तर ते बरे वाटत नाही, पुन्हा त्या देखील आपल्याला बोलावतात. मग उसणे वाण कसे ठेवायचे म्हणुन तरी दयावेच लागते. त्यापेक्षा तु वर लिहिल्याप्रमाने जिला गरज आहे तिला दिलेले बरे हेच योग्य वाटते.

मकरसंक्रातिला कश्या प्रकारे सुगड्या पुजतात व इतर पुजा कशि करतात? याचि माहिति मिळेल का?

माझे नविन लग्न झाले आहे त्यामुळे माहिती हवि आहे. Happy

अविगा,

पाच सुगडी आणून त्यामधे चुरमुरे, ऊसाचे कांडे, गाजराचे तुकडे, बत्तासे, तिळगूळ इत्यादि घालून त्याची नेहमीप्रमाणेच पूजा करा. नैवेद्याला तिळपोळी, गूळपोळी अथवा तिळगूळ करा. काळी साडी अथवा काळे कपडे घाला. हौस असल्यास हलव्याचे दागिने घालून फोटो काढून घ्या. हौस असली नसली तरी नवर्‍याकडून गिफ्ट अवश्य घ्या. Happy

अंनिस तल्या आमच्या एका जेष्ठ सहकार्‍याच्या पत्नीने माझे यंदा कर्तव्य आहे हे विवाह व ज्योतिष या विषयावरील पुस्तक संक्रातीला काहींना वाण दिल्याचे सांगितले होते त्याची आठवण आली दुर्दैवाने नंतर त्यांनी स्वेच्छामरण? पत्करले. असो.

आभारि आहे नंदिनि.
त्या सुगड्या नंतर काय करायच्या? वाण किति जणांना द्यायचे?आणी च्यामध्ये काय काय आणि कश्या प्रकारे द्यायचे? कृपया सांगा.

हौस असली नसली तरी नवर्‍याकडून गिफ्ट अवश्य घ्या. स्मित>>>> हि हौस तर प्रत्येक पत्निची असते.. Happy

अविगा, तुमच्यामधे नक्की काय पद्धत आहे माहित नाही. पण माझ्या सासरी (कोकणस्थांकडे) मी त्यातलं वाण काढून घेऊन (मस्तपैकी खाऊन) सुगडी स्वच्छ धुवून घेतल्या आणि दही लावायला वापरल्या!!!!! Proud

तुमचं पहिलं वर्ष असेल हळदीकुंकू लुटाय॑चे असते. घरी हळदीकुंकवाला (किमान पाच, जास्तीत जास्त कितीही) बायका बोलवाल तेव्हा एका ताटात हळद आणि एका ताटात कुंकू घालून ठेवा. येणार्‍या बायका स्वतः ते हळदीकुंकू बांधून घेतात (गृहकृत्यदक्ष टीप: सोबत एक चमचा आणि भरपूर झिपलॉकच्या पिशव्या ठेवा). सोबत सुवासिक फुले (अ‍ॅस्टरची फुले देतात हल्ली. पण ते शास्त्रांत अलाऊड नाहीये) शिवाय अत्तर, तीळगूळ आणि वाट्लंच तर काही खाऊपिऊ देऊ शकता.

पहिलीच संक्रांत असेल तर स्टुडिओत जाऊन हलव्याचे दागिने घालून फोटो जरूर काढा.

हळ्दीकुंकवाच्या सुरेख डिझायनर पुरचुंड्या जरीच्या कापडाच्या बनवता येतील. बरोबर अत्तराची छोटी तीन ग्रामची बाटली आणि तिळगुळाचे पॅकेट. हे सर्व डेकोरेटिव बटव्यात घालून बरोबर गजरा असे दिले तर काय सुरेख दिसेल.

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.

नंदिनि आभारि आहे

मला वाटल त्या सुगड्या कुमारिकांना द्यायच्या.लहानपणी आम्हाला कोणी कोणि दिलेल्या असे साधारण आठवत आहे
ठिक आहे तरि पण कोणि कोणी कशी संक्रात साजरि केलि तो अनुभव सांगावा Happy Happy Happy

After first 5 years of typical Van I distributed idli ata, idli podi, masala packets.
other ideas vegetables, attar, pichkoo sos or chatni packeets, nescoffee sachets, clucher clips, chaat masala or chhaas masala packets.
basically I prefer edible stuff rather those plastic containers.
the year I gave idli ata next day society had common menu for b-fast, and all ladies were happy since headache of thinking what to do was not there for a day Wink

सुगडी स्वच्छ धुवून घेतल्या आणि दही लावायला वापरल्या>> आम्ही त्या घेवुन त्याला सुतळी बांधुन , काठ्या बांधुन तराजु करुन दुकान दुकान खेळत असु. Happy

सुगड्या पुजणे आणि हळदिकुंकु रथसप्तमि पर्यंत कधिहि करु शकतो ना?
>> हो.

तुमची संक्रांत कशी झाली ते सांगा. नविन काळी साडी घेतली का?

‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.

https://youtu.be/cn0e8Q2iPik?list=PLLL_c-ouLm9JcQhfC0u7_A8aOOHb3rRxt

वाण देण्याचे महत्त्व

‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

वाण कोणते द्यावे ?

असात्त्विक वाण देण्यामुळे होणारी हानी : प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक वाण दिल्यामुळे वाण घेणार्‍या अन् देणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो.

सात्त्विक वाण देण्याचे लाभ : सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते.

सध्या साबण, प्लास्टिकच्या वस्तू यांसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयकध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

1420279603_makar_sankrant_2[1].jpg1420279559_makar_sankrant_1[1].jpg

अधिक माहितीसाठी
http://www.sanatan.org/mr/a/809.html

मी या वर्षी कटाक्षाने वापरुन संपेल अशी वस्तु द्यायची ठरवले होते.
कोलगेटची छोटी ५० ग्रॅमची टूथपेस्ट लुटणार आहे.

Pages