नियतीचा न्याय असतो का?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 4 January, 2013 - 13:34

लोक खूप पूर्वीपासून नियती व नियतीच्या न्यायाबद्दल चर्चा करत आलेले आहेत , त्यांच्या बोलण्याचा सूर असा असतो की भ्रष्टाचारी /पापी / नास्तिक माणसे आज जारी सुखात लोळत असली तरी कालांतराने त्यांना त्यांच्या पाप-कर्माबाबत शिक्षा मिळेल व नरकात खितपत पडावे लागेल किंवा अपमृत्यू/ अन्य मार्गाने त्यांच्या पापकरमचे फळ नियती त्यांना भोगायला लावेल .

आपल्या मतानुसार याचे काय स्पष्टीकरण आहे? खरेच नियती व नियतीचा न्याय असतो का? असल्यास कोणत्या प्रकारे?

त्याची काही उदाहरणे आहेत का? की लोकांनी चांगलं वागावे म्हणून घातलेली ही एक भीती आहे?

सविस्तर चर्चा अपेक्षित ! धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे लोकं भिरभिरले असतील.. अरे आपल्या ह्या माणसाकडुन काय वाचतोय.. उत्तर तरी काय द्यायच.. निरुत्तर केलं सगळ्यांना.. Happy

नियतीच्या न्यायाचे ताजे उदाहरण,
वर जसे म्हंटले तसे काश्मीर मध्ये पापी लोक लष्कराच्या रोषाला तोंड देत आहेत,
त्यातल्याच एक पाप्याला जीप वर बांधून मेजर गोगोई नि फिरवले होते, त्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक झाले,
मात्र चित्रगुप्तच्या दरबारी त्याची वेगळीच नोंद झाली असावी,

त्यामुळे आज मेजर गोगोई याना ड्युटीवर असताना हलगर्जी करण्याच्या(ड्युटी चे ठिकाण सोडून स्त्रियांबरोबर एका हॉटेल मध्ये सत्संग करणे) आरोपाखाली दोषी ठरवले आहे. त्यांना आता शिक्षा ठोठावली जाईल,

स्वामीजी, नियतीचा न्याय करायचा कालावधी कमी होऊ लागला आहे का ?

या व्हिडीओमधे या धाग्याचे सार सामावलेले आहे. नीट काळजीपूर्वक पहावा ( मानसिक दृष्ट्या १३ वर्षांखालील मुलांनी कृपया पाहू नये )
https://www.facebook.com/jairaj.jagtap3/videos/1670513229723693/

सिम्बा आपले विचार बर्यापैकी पट्ले . कुठलेही कर्म जर अकारण केले नसेल तर, त्याचे चान्गले वाइट फळ हे भोगावेच लागते.
कलियुगात्त ही दोन्हि फळे सत्वर मिळ्तात, असे वाचल्याचे आठवते.

स्वामीजी,
परत मन भिरभिरु लागले आहे,

पर्रीकर, जेटली, सुषमा स्वराज, अमित शहा, या सर्व जेष्ठ सज्जन लोकांना एकाच वेळी दुर्धर व्याधी का व्हावी?

त्यातल्या जेटली ना तर आधी किडनी आणि आता कॅन्सर, पण त्यांचे समजू शकतो, ते पेशाने वकील, आशीलाला सोडवण्यासाठी त्यांना खोटे बोलणे, धाक घालून साक्षीदार फोडणे, कागदपत्र गायब करणे वगैरे प्रकार करायला लागत असतील ,त्याची ते शिक्षा भोगत असतील, मात्र ही सगळी कु कर्मे अशिलाचे हित मनात ठेवून केल्याने , ही शिक्षा जीवावर बेतत् नाही.

पण सुषमा बाई, पर्रीकर यांचे काय?
यांनी तर कधी कोणाचे वाकडे केले नाही,
उलट सुषमा बाईंनी स्वतः च्या ट्रोल सेनेचा त्रास भोगून लोकांना एक ट्विट वर पासपोर्ट उपलब्ध करून दिले

पर्रीकरांनी बिचार्यांनी राफेल प्रकरणापासून स्वतः ला दूर ठेवले, ज्या दिवाशी ते डील साइन होत होते तेव्हा ते फिश मार्केट चे उदघाटन करण्यात मग्न होते. प्रकरण फारच तापेल असे वाटले तेव्हा चक्क राजीनामा दिला.
मग इतक्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाच्या नशिबी इतका दुर्धर रोग का?

कृपया मार्ग दाखवा स्वामीजी.

Pages