नियतीचा न्याय असतो का?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 4 January, 2013 - 13:34

लोक खूप पूर्वीपासून नियती व नियतीच्या न्यायाबद्दल चर्चा करत आलेले आहेत , त्यांच्या बोलण्याचा सूर असा असतो की भ्रष्टाचारी /पापी / नास्तिक माणसे आज जारी सुखात लोळत असली तरी कालांतराने त्यांना त्यांच्या पाप-कर्माबाबत शिक्षा मिळेल व नरकात खितपत पडावे लागेल किंवा अपमृत्यू/ अन्य मार्गाने त्यांच्या पापकरमचे फळ नियती त्यांना भोगायला लावेल .

आपल्या मतानुसार याचे काय स्पष्टीकरण आहे? खरेच नियती व नियतीचा न्याय असतो का? असल्यास कोणत्या प्रकारे?

त्याची काही उदाहरणे आहेत का? की लोकांनी चांगलं वागावे म्हणून घातलेली ही एक भीती आहे?

सविस्तर चर्चा अपेक्षित ! धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाय छाप जर्दा / नाफिकीर

याबाबत काहीच सांगता येत नाही Sad

क.भू.धा.वि. काय!!!!! Rofl मला एकदम शाळेतलं मराठी व्याकरण आठवलं आणि भिती वाटली Proud

प्रशासकांनां विनंती की, सिगरेट व तंबाकू उत्पादकांचे नावाशी साधर्म्य असलेला आय.डी. कोणालाही वापरू देऊ नये.

>>प्रशासकांनां विनंती की, सिगरेट व तंबाकू उत्पादकांचे नावाशी साधर्म्य असलेला आय.डी. कोणालाही वापरू देऊ नये.
जोरदार अनुमोदन !!!

प्रशासकांनां विनंती की, सिगरेट व तंबाकू उत्पादकांचे नावाशी साधर्म्य असलेला आय.डी. कोणालाही वापरू देऊ नये.>> + १ अनुमोदन

त्याचबरोबर हिडिस नावे वापरणार्या आयड्यांना माबोवरुन लाथा मारुन हाकलुन द्यावे. कारण जो कोणी स्वतःचा आयडीला हिडिस नाव घेइल त्याची मानसिक स्थिती सामान्य नाहि हे सहज समजुन येउ शकते. आणी ते त्यांच्या लिखाणावरुन सहज प्रुव्ह होते. उदा. इब्लिस.

दुर्जनांना शासन करण्याची भीती ज्या छक्क्यांना वाटते ते नियतीचा आधार घेतात. अमेरीकन, लादेन तालिबान बाबतीत नियती वगैरे करत बसले नाहीत डायरेक्ट त्याच्या घरात जाऊन त्याचा खात्मा केला की, जगच अवाक झाले, परत त्याला गाडला ते वेगळेच .असो
all that is nessesary for triumph of evil is good men do nothing.

भारतीय,

वीकेंड आला की तुमच्या जिभेवर सरस्वती नाचू लागते.

तुम्हाला तोंड सांभाळून बोलता येत नसेल, तर बोलू नका. तुमच्या सारख्या टिनपॉट लोकांच्या तोंडी लागायची खरे तर गरज नाही, पण २ दिवसांपासून तुमचे ताळतंत्र फारच सुटलेले दिसते आहे. लाथा फार वळवळ करताहेत असे दिसते आहे.

तुमची मनोवृत्ती कशी आहे हे तर तुमच्या पोस्टीतून दिसतेच आहे.

त्या अमीरखानच्या बाफवरून तुमची हकालपट्टी झाली तेव्हा तुमचा आयडी काय होता हो?
अन हो, तो सामोपचार आयडी देखिल गेला तुमचा.
आता भारतीय या आयडीला फेकण्याआधी शिवीगाळ करून घेण्याचा तुमचा उद्देश दिसतोच आहे.
कालच तुम्ही काढलेल्या "ईब्लीस" या आयडीची तक्रार मी केलेलीच आहे.
एल एम एफ ए ओ.

लवकर बरे व्हा, अशी शुभेच्छा!

आपल्या मतानुसार याचे काय स्पष्टीकरण आहे? खरेच नियती व नियतीचा न्याय असतो का? असल्यास कोणत्या प्रकारे?
----- नाही....

की लोकांनी चांगलं वागावे म्हणून घातलेली ही एक भीती आहे?
------ होय...

अनेकांच्या सूचनेनुसार युजरनेम बदलले आहे.......... बाकी भारतीय यांच्या प्रतिसादशी सहमत !

कृपया मूळं विषयावर बोलावे,फाटे फोडू नयेत ,ही नम्र विनन्नती !

जर नुसतीच भीती घातली असेल तर गुरुचरित्र इत्यादि ग्रंथातून सांगितलेला कर्मविपाक सिद्धान्त आणि विवेकानंदांनी सांगितलेला कार्यकारणभाव याचे काय? ते सगळे खोटे?

कृपया बाष्कळ चर्चेपेक्षा जाणकारणी बोलावे असे माला वाटते ,अर्थात सर्वांची मते स्वागतार्ह च आहेत.........असो

तुमची मनोवृत्ती कशी आहे हे तर तुमच्या पोस्टीतून दिसतेच आहे. >>>>>> निर्लज्जम सदा सुखी! . आधी स्वतःचा आयडी बदला. असला आयडी घेणार्या माणसाची मनोव्रुती काय असेल ह्याबद्दल वेगळे भाष्य करण्याची मला गरज नाहि. आणी तुम्हि डु आय असाल तर तसे आरोप दुसर्यांवर करुन नका.

तुम्हाला लवकर बरे व्हा अशी शुभेच्छा देण्याची इच्छा तर आहे पण सैतान कधी देव होणार नाहि हे माहित आहे.!

नियतीचा न्याय असतो असे सगळेच म्हणतात पण नियती अगदि १०० अपराध भरेपर्यंत वाट का बघते....जरा आधी काहि केलेले चालत नाहि का? आणि हे १०० अपराध होईपर्यंत ज्याला न्याय हवा आहे तोच गेला तर काय फायदा त्या न्यायाचा?

वाटत नाही कारण आपण अनुभव केलेले नसते. सन्गायला खूप आहे पण पटणे अवघड आहे सगळ्यांना. टाईप करणेही अवघड आहे ईथे.

मागे एक कहाणी वाचली होती,
एक दुराचारी गावात एक सत्शील ब्राह्मण त्याच्या पत्नी सकट रहात असतो, गावात सर्व दुराचारी लोक असल्याने कुणी धर्म कार्य करीत नसते, त्यामुळे ब्राह्मणाची स्थिती अजूनच खालावते,
एक दिवस त्याच्याकडे एक सिद्धपुरुष येतात, ते गावातील परिस्थिती पाहून त्याला नेसत्या कापड्यानिशी ताबडतोब गाव सोडायला सांगतात,
गावा बाहेर पडल्यावर ब्राह्मणीला आठवते, की आपल्या धुण्याचे पिळे विहिरीवर तसेच राहिले, म्हणून ब्राह्मण परत फिरतो आणि ते पिळे घेऊन गावा बाहेर पडतो,
त्याचे वेशीबाहेर पाऊल पडताच गाव जळून जातो.

सिद्धपुरुष त्याकज स्पष्टीकरण देतात, की गावाच्या दु: शिला तुमचे सत्शील थोपवून धरत होते, ते इतके शक्तिवान होते की विहिरीवर राहिलेली केवळ वस्त्रे सुद्धा गावाचे रक्षण करत होती, जेव्हा ते उरलेले शील सुद्धा तुम्ही घेऊन आलात तेव्हा गाव आपल्या वर्तनाची शिक्षा भोगू लागला.

केरळ हा आद्य शंकराचार्यांचा प्रदेश, त्यांच्या पुण्यप्रभाव आत्ता पर्यंत या प्रदेशाची वाताहात रोखत होता, केरळ सरकारने ती ओळख पूर्ण पुसून काढताच प्रदेश आपल्या वर्तनाची शिक्षा भोगू लागला.

माझा नियती प्रकारावर विश्वास नव्हता, पण केरळ चे उदाहरण पहिल्यापासून माझा पूर्ण विश्वास बसला आहे.

आपण आयुष्यभर कवटाळलेली तत्व चुकीची ठरत असताना ते तसे मान्य करणे धैर्याचे आहे,
गोष्टींची टिंगल करून उडवून लावणे सोपे आहे,

विचार करून पाहा, काश्मीर, मराठवाडा अनंत उदाहरणे दिसतील.

>>>>>भ्रष्टाचारी /पापी / नास्तिक माणसे आज जारी सुखात लोळत असली तरी कालांतराने त्यांना त्यांच्या पाप-कर्माबाबत शिक्षा मिळेल व नरकात खितपत पडावे लागेल किंवा अपमृत्यू/ अन्य मार्गाने त्यांच्या पापकरमचे फळ नियती त्यांना भोगायला लावेल .>>>>

याला पूर्ण अनुमोदन

भारत अमेरिका ही सुद्धा उदाहरणात घाला. होप्फुली एका टर्म मध्ये पापक्षालन पूर्ण होईल.
Simbaa चा आयडी हॅक झाला Biggrin

सिंबांनी सांगितलेल्या गोष्टीतल्याच्या उलट प्रकारसुद्धा होतो. एखाद्या माणसाच्या पापाचा प्रभाव इतका भयंकर असतो, की त्याच्यासोबतच्या पापी नसणार्‍या लोकांनाही तो बुडवतो. विमान, बस, ट्रेन अपघात, इमारती कोसळून झालेले मृत्यू यांमागे हेच कारण आहे.
यासाठीच नुसते पाप न करणे पुरेसे नाही, अधिकाधिक पुण्यसंचयही केला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीतल्या ब्राह्मणासारखे बल मिळेल.

अमित तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थो आहात,
मी सुद्धा विज्ञानवादी आहे,
शेवटी विज्ञान देखील समोर आलेल्या तथ्यांना महत्व देते आणि आपल्या जुन्या धारणा बदलते,
जुने सिद्धांत जेव्हा मांडले तेव्हा ते त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या तथ्यांशी सुसंगत होते, कालौघात नवीन माहिती समोर आली तेव्हा आपली मते तपासून पाहणे आणि गरज पडल्यास बदलणे हे खरे विज्ञानवादाचे लक्षण आहे.
आपल्या धारणा बदलाव्या लागतील, सोशल मीडिया वर आपल्या कमेंट्स मागे घ्याव्या लागतील, लोक त्याची खिल्ली उडवत या भीतीने समोरील महितीकडे डोळेझाक करणे म्हणजे भोंदू विज्ञानवाद झाला.

खरे विज्ञानवादी असाल तर खालील माहिती लक्षपूर्वक वाचा,

काश्मीर मध्ये हिंदू राजाची सत्ता होती, हिंदू ,मुसलमान आपापल्या धर्मसीमा सांभाळून होते, त्यामुळे अगदी मुघल, इंग्रज काळात सुद्धा तिकडील जनतेस फारसा त्रास झालेला दिसत नाही,
स्वतंत्र्यानंतर निधर्मी राजवटीच्या नावाखाली लोक सीमा ओलांडू लागले,
हिंदुलोक जे स्वतः:पुरता धर्म सांभाळून होते, मात्र बाहेर अधर्मचारण रोखत नव्हते त्यांना त्याची शिक्षा मिळाली, एक रात्रीत बेघर व्हावे लागले, संपन्न आयुष्य जाऊन दारिद्र्य नशिबी आले,
त्यांच्यातील जे स्वतः धर्म पालन करत होते त्यांचे भोग भोगून संपल्यावर परत संपन्न झाले, आयुष्यात बऱ्याच क्षेत्रात पुढे आले,
जे वाहवत जाऊन अधर्मचारण करत होते ते अजून रेफ्युजी कॅम्प मध्ये खितपत पडले आहेत.

मात्र हर सगळे लोक एका जमान्यात धर्माचारण करत असल्याने ते जम्मू किंवा दिल्ली मध्ये आहेत, त्यांचा जीव वाचला

जे मुसलमान आजही धर्माच्या सीमा न मानता गोहत्या इत्यादी प्रकार करतात ते खोऱ्यात अडकून पडले आहेत, उद्योग धंदे बंद झाल्याने दारिद्र्य, थंडी आणि दहशदवाद आणि लष्कर यांच्या रोषाला सामोरे जात आहेत.

ही सर्व नियती नाही तर काय आहे?

तुम्हाला अजून विश्वास बसत नसेल तर अजून डेटा पॉईंट द्यायची माझी तयारी आहे.

आपण छोट्या कालखंडाचा विचार केला तर त्याला नेहरूंची चूक, पाकिस्तान चा हात वगैरे लेबल लावत बसतो, अमुक एक चांगले झाले , वाईट झाले असे आखाडे बांधयो
पण जर बर्ड आय व्ह्यू घेतला तर या मागचा कार्यकारण भाव लक्षात येतो,

उदाहरणार्थ, काश्मिरी हिंदू बेघर झाले हे आपण वाईट झाले म्हणतो, पण त्यामुळेच त्यांचा जीव वाचला, पाप भार झालेले लोक एक ठिकाणी एकवटले आणि त्यांना शिक्षा मिळाली हे आपण विसरतो.

भगवंतांनी गीतेत सांगितले आहे तसे " मी केले" " माझ्यामुळे झाले" हा भाव सोडून द्यायला पाहिजे. प्रत्येकजण त्याच्या पूर्वसंचिता प्रमाणे पुढील आयुष्य घालवतो.

आणि हे पूर्वसंचिता त्या व्यक्तीचे च असले पाहिजे असे नाही,
त्याच्या कुळा चे ही असू शकते,
म्हणूनच एखादा अतिशय नालायक माणूस सुद्धा बऱ्यापैकी सुखात राहताना दिसतो, करण त्यांच्या पूर्वजांनी जो पुण्य संचय केला असतो त्याचा तो फायदा घेत असतो,
पण जर त्याने असा संचय केला नाही, आणि त्याची संतती सुद्धा तशीच नालायक निपजली तर ती स्वतःच्या + आपली वडिलांच्या पाप संचयाची फळे भोगेल.

बिर्ला कुटुंबाचे उदाहरण देऊ शकेन

बिर्ला कुळाने अनेक लोकोपयोगी कामे करून पुण्य संचय केला आहे, म्हणूनच सध्याचे बिर्ला वंशज अवंती आणि यश बिर्ला त्या संचिता वर सुखात आहेत, त्यांच्या पुढच्या पिढीचे पहायचे काय होते.
जसे मी म्हंटले हे कर्मफल खूप स्लो मिळते पण मिळते नक्की.

हेला,
खरे सांगायचे तर मला माहित नाही,
आज कदाचित हिंदू खतरे मै वाटत असेल, पण कसे मी म्हंटले हे आपण छोट्या कालखंडात काय वाटतंय ते बोलतोय,
40-50 वर्षाच्या (किंवा त्याहून मोठ्या) कालखंडाच्या जिक्सो पझल मध्ये हा तुकडा कसा बसेल माहित नाही,

पण हो, जर आज हिंदू अडचणीत, व्यथेत आहेत असे वाटत असेल तर त्यांनी पूर्वी केलेल्या अधर्म आचरणाचे (सनातन धर्म सोडून, पुरोगामी म्हणवण्यासाठी आपल्या रूढी, परंपरा उपासना पद्धती दूर सारणे, प्रसंगी आपल्या धर्माचा बळी देऊन दुसर्यांना जास्तच अकोमोडेट करणे, शुद्ध स्वरूपातील उत्सव, परंपरा बंद करणे) प्रायश्चित्त करत आहेत असे म्हणता येईल,
पण हे प्रायश्चित्त झाले , धर्ममधील हीन जळून गेले की हिंदुस्थान परत तेजोमय होईल.

व्यत्यय, हेला, अमित, भरत आणि इतर सर्वच
तुम्ही मायबोली वरील विचारी id आहात,
जसे मी म्हंटले , मी नव्यानेच या दिशेने विचार करायला लागलो आहे, माझे विचार पक्के करण्यासाठी अजून बरेच मंथन करायची गरज आहे,
तुम्ही तुमच्यामते जे काही काँट्रॅदिक्टरी पॉईंट्स असतील ते इकडे मांडा, या विषयावर साधक बाधक चर्चा झाली तर माझ्या ज्ञानांत भरच पडेल.

मी या विषयाचा तज्ञ नाही, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करीनच, उत्तर देऊ शकलो नाही तर कमीतकमी Happy तरी देईनच.
जास्तीची माहिती आपल्याला विश्वारूपानंदजी देतीलच.

इतक्या वर्षानन्तर हा धागा जिवन्त् केल्याबद्दल गुलबकावली आणि इतर मण्डळींचे आभार!

सिम्बा जी तुमच्याशी शम्भर टक्के सहमत आहे . तात्कालिक दॄष्टीने पाहता नियतीच्या न्यायावर विश्वास वाटत नाही परन्तु विहंगम दॄष्टीने कालसापेक्ष विचार केल्यास केरळा व काश्मीर ची उदाहरणे योग्य आहेत . हे समष्टी प्रारब्ध झालेपण व्यष्टी प्रारब्धाबाबतही असेच अनुभव यावेत व त्वरित यावेत अशी विचारसरणी आहे ज्यायोगे लोकांचा नियती देव धर्म यावरील विश्वास सुस्थापित होइल ...

नियती अगदि १०० अपराध भरेपर्यंत वाट का बघते....जरा आधी काहि केलेले चालत नाहि का? अगदी मनातले बोललात!

https://www.misalpav.com/node/42681 या पृथ्वीवर माणसांची एवढी गर्दी का आहे ?
ह्या लेखात मी काही विचार माण्डलेले आहेत ...

मेदिनीज्योतिष म्हणून ज्योतिषाची एक शाखा आहे . त्यात भूकम्प / पूर अथवा तत्सम नैसर्गिक आपत्ती का ,कशा व कुठे , कधी येतात याबाबत विस्तॄत विवेचन केलेले आहे

सिंबा ह्यांचेशी सहमत,
अनेक नास्तिक वादी लोकसंख्या भरपूर असलेली गावे ह्या एका पिढीच्या काळात दुष्काळग्रस्त होवून स्थलांतरित झाली असे पाहिलं आहे. मराठवाड्यात अशी गावे बरीच आहेत

किल्लारीला पण सर्व लोक नास्तिकवादीच होते का?

ज्योतिषाची शाखा (अन्दाज पन्चे काहीतरी सान्गायचे - निव्वळ ठोकताळे असतात) आणि भूकम्प, पूर, नैसर्गिक आपत्ती कशाचा सम्बन्ध कशाशी नाही आहे.

उत्तराखंड (देवभूमी ) येथे सच्छील, आस्तिक लोक होते. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू, पुण्यवान लोक येत असत. येथे देवांचा वास असे.
तर गोव्यात बीफबंदी नसल्याने येथे अधर्मी लोकांचा वास आहे.

तर मग आपत्ती कुठे यायला हवी होती ?

डागदार, निष्कर्ष काढू नका एवढ्यात, सिंबा यांनी लोकांचे निष्कर्ष लिहिलेत. त्यातला प्रत्येकावर त्यांचे मत काय आहे हे येईल, तोवर वाट पहा.

आणि जर घाई असेलच तर पर्यावरणवादी लोकांनी केरळनंतर गोव्याचा नंबर आहे हे भविष्य वर्तवलेय हे लक्षात घ्या. पूर्ण पश्चिम घाट पट्टा गेलाय कामातून हा त्यांचा दावा आहे. खरी कारणे बाजूला ठेऊन आपल्याला आवडतील ती कारणे चिकटवायचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच.

मी कुठे निष्कर्ष काढलाय ? केरळात गोहत्या झाली म्हणून आपत्ती आली, बायकांना शबरीमलाला प्रवेश दिला म्हणून आपत्ती आली असे निष्कर्ष फिरत आहेत. त्यामुळे शंका आहे हो. तुम्ही वैज्ञानिक कारणे का लिहीताय ? इथे कर्मसिद्धांत लाथाडताय कि तुम्ही..
पश्चिम घाटाचे कारण आणि वरील कारणे यांचा ताळमेळ कसा बसवायचा ?

उत्तराखंडमध्ये नास्तिक लोकांनी पुण्य्क्षेत्रांत जाऊन मलमूत्रविसर्जन केल्याने तिथे ढगफुटी झाली. - केंद्रीय मंत्री साध्वी उमा भारती.

तेव्हा मला हे पटलं नव्हतं. आता पटतंय.

काश्मीरमध्येही गेल्या दशकभरात भूकंप झाला आणि पूर आला.

नेपाळमध्ये देव न मानणार्‍या कम्युनिस्ट लोकांचा वरचष्मा होताच तिथे भूकंप झाला.

साधना
माबोवर पुण्यातम्यांची संख्या लक्षणीय असल्याने संस्थळ काही बंद होणार नाही, ह्याबाबत खात्री बाळगा

ती खात्री आहे हो. इथल्या लोकांनी कितीही नाकारले तरी स्वधर्माला जागून प्रत्येकाने स्वतःच्या 84 लक्ष जन्माची सोय करून ठेवलीय. त्यामुळे एका जन्माचे अवतारकार्य संपले की लगेच ते नव्या आईडीने पुनर्जन्म घेतात.

काय गम्मत आहे, लेखनातून जे नाकारतात, आचरणात मात्र तेच आणतात.

सिम्बा, भरत... गुजरात मधे भूकंप्/पूर यामागची काय कारणं असावीत? तिथे तर अधर्मी/अहिंदू लोकांची संख्या कमी करण्याचे पुण्यकर्म केले गेले.

विठ्ठल ,
तुमची टाइम लाईन चुकते आहे,
गुजराथेंत अधर्म बोकाळला होता
म्हणून भूकंप 2001 साली झाला,
पृथ्वीवरच्या पापाचा बोजा बराच कमी झाला,
तरीही पाप होतेच, म्हणून ईश्वरी इच्छे प्रमाणे 2002 चा उद्रेक झाला.

धर्मयुद्धात झालेली हिंसा क्षम्य असली तरी त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागते. खुद्द पांडवानी सुद्धा युद्ध संपल्यावर सशास्त्र प्रायश्चित्त घेतल्याचे उल्लेख आहेत,
गुजरात मध्ये म्हणूनच पूर आले, मात्र हिंसा धर्मरक्षणासाठी झालेल्या असल्याने पुरात प्राणहानी फारशी झाली नाही.

स्वामीजी मी बरोबर विचार करतोय ना?

Pages