मायबोलीवरील सुप्रसिद्ध, व्यासंगी, गझलअभ्यासक व गझलअभ्यस्त आदरणीय श्री. प्रसादपंत यांच्या आग्रहाखातर ही “शिमग्याची गझल” खास, त्यांना आमचेकडून विनम्रपणे अर्पण........
गझल
चेह-यावर लावणारे चेहरे करतात शिमगा!
कोणतेही सण असो,ते साजरे करतात शिमगा!!
ईद, होळी, वा दिवाळी, वा असो ख्रिस्मस कुणाचा.....
राज्यकर्ते मात्र सारे साजरे करतात शिमगा!
हा कसा गोतावळा? अन् कोणती नाती म्हणवी?
पाठ फिरली की, अचानक सोयरे करतात शिमगा!
ही घरे की, कोंडवाडे? माणसे की, मूक ढोरे?
स्वस्तघरकुल योजनांचे पिंजरे करतात शिमगा!
चार दिवसांची दिवाळी, थाटलेली रोषणाई.....
एरव्ही अंधारलेले कोपरे करतात शिमगा!
स्वप्न घर बांधावयाचे पाहताना प्राण गेले....
आजही पश्चात त्यांच्या चौथरे करतात शिमगा!
पोट गेलेले खपाटी....आड ते ओसाड पडले!
पावसाचे चिन्ह नाही...पोहरे करतात शिमगा!!
आज बोंबाबोंब नाही अन्नवस्त्राचीच नुसती;
राहण्याची सोय नाही, आसरे करतात शिमगा!
संकुलांची जंगले शहरामधे या फार झाली....
आज वनराई न कोठे, पाखरे करतात शिमगा!
मायबोलीने अम्हाला मानले आहेच मामा! ........(खवटुन्निसांच्या हुकुमावरून/फर्माईशीनुसार)
मात्र मामांच्याच नावे भाचरे करतात शिमगा!!
वेषभूषा, केशभूषा या पिढीची और आहे!
कोण घेतो आज गजरे? मोगरे करतात शिमगा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
'आमचे येथे नको त्या विषयावर,
'आमचे येथे नको त्या विषयावर, नको तितक्या लांबी-रुंदीच्या गझला, नतद्रष्ट मायबोलीकरांनी चावी न भरताही पाडून मिळतात.'
देवपुरकरमामा, 'भाचरे करतात शिमगा' तेवढे राहिले.
खवटुन्निसा! आपल्या
खवटुन्निसा!
आपल्या प्रतिसादाचा शिमगा आवडला!
टीप: ही गझल खास मागणीवरून मेड टू आर्डर दिली आहे!
आपलीही फर्माईश येवू द्या.........वेलकम!
हा कसा गोतावळा? अन् कोणती
हा कसा गोतावळा? अन् कोणती नाती म्हणवी?
पाठ फिरली की, अचानक सोयरे करतात शिमगा!....... वा वा.. क्या बात है!!
चार दिवसांची दिवाळी, थाटलेली रोषणाई.....
एरव्ही अंधारलेले कोपरे करतात शिमगा!....... व्वा !!
हे दोन शेर फार्फार आवडले. पुलेशु.
मतला दोषपूर्ण आहे.
चेह-यावर लावणारे चेहरे करतात शिमगा!
कोणताही सण असू द्या, साजरे करतात शिमगा!!
एकतर ''कोणतेही'' असं लिहा...किंवा ''साजरा'' असं लिहा.
कैलासतराव! मतला गद्यात असा
कैलासतराव!
मतला गद्यात असा लिहिता यावा........
(जे लोक) चेह-यावर चेहरे लावतात (तेच नेहमी) शिमगा करत असतात.
कोणताही सण असू द्या (तेच लोक) शिमगा साजरे करतात!
कैलासराव, इथे ते लोक अव्यक्त आहेत ज्यांना अनुलक्षून तेच लोक (शिमगा) साजरे करतात असे आम्ही म्हणतो आहोत!
व्याकरणाच्या दृष्टीने ही वाक्यरचना चूक वाटत आहे काय?
आपले मत जरूर कळवा, बदल ताबडतोब करू!
प्रा.सतीश देवपूरकर
धन्यवाद कैलासराव! बदल केलेला
धन्यवाद कैलासराव!
बदल केलेला आहे, कारण आपले म्हणणे आम्हास पटले आहे, विचारांती!
हा कसा गोतावळा? अन् कोणती
हा कसा गोतावळा? अन् कोणती नाती म्हणवी?
पाठ फिरली की, अचानक सोयरे करतात शिमगा!
>> व्वा!
छान सर
छान सर
मस्त
मस्त
_/\_ धन्यवाद सर !! हा कसा
_/\_
धन्यवाद सर !!
हा कसा गोतावळा? अन् कोणती नाती म्हणवी?
पाठ फिरली की, अचानक सोयरे करतात शिमगा!
ही घरे की, कोंडवाडे? माणसे की, मूक ढोरे?
स्वस्तघरकुल योजनांचे पिंजरे करतात शिमगा!
>>> हे शेर आवडले !
वेषभूषा, केशभूषा या पिढीची और आहे!
कोण घेतो आज गजरे? मोगरे करतात शिमगा!! >>> हे हे खरं आहे !
मस्तच !!!
प्रसादपंत! काल आपण
प्रसादपंत!
काल आपण शिमग्याच्या गझलची फर्माईश काय केली अन् आमच्या डोक्यात शिमगाच भणभणायला लागला!
आपण कवाफी सुचवा म्हणाला, पण आम्हाला आमची शिमग्यावरची गझल साक्षात दिसू लागली!
संध्याकाळी सौंबरोबर बाजारहाटास बाहेर पडलो पण डोक्यात हीच गझल थैमान घालत होती!
१/२तासात गझलेचे ५ शेर कारमधेच चिठोरग्यावर सौंचे लक्ष चुकवून उतरवले व उरलेली गझल घरी आल्यावर जवळपास पूर्ण करून रात्री निवांत झोपी गेलो!
सकाळी उठल्या उठल्या एक शेवटचा हात गझलेवर फिरवला व ताबडतोब ती इथे पोस्ट केली!
पुनश्च आपले अभिनंदन करतो की, इतका चांगला रदीफ आपण आम्हास देवून लेखनप्रोत्साहन दिले
टीप: आता आपली शिमग्याची गझल येवू द्या!
........प्रा.सतीश देवपूरकर
एक चेहरे पे कई चेहरे लगाते है
एक चेहरे पे कई चेहरे लगाते है लोग
अशी एक हिंदी ओळ सुचली आहे शिर्षक वाचून.
प्रसादराव, काय करून बसलात हे?
प्रसादराव, काय करून बसलात हे? कुठे फेडाल हे पाप?
जगदंब!!
खवटुन्निसा! देवपुरकरमामा,
खवटुन्निसा!
देवपुरकरमामा, 'भाचरे करतात शिमगा' तेवढे राहिले.<<<<<<<
सकाळच्या धांदलीत वेळ नाही मिळाला, पण आता तुमची फर्माईश पूर्ण करत आहोत!
हा घ्या भाचरेंचा शेर..............जो वरील गझलेत अंतर्भूत करत आहोत!
शेर असा आहे..............
मायबोलीने अम्हाला मानले आहेच मामा!
मात्र मामांच्याच नावे भाचरे करतात शिमगा!!
..............प्रा.सतीश देवपूरकर
पंतांना काय भरपूर वेळ रिकामा
पंतांना काय भरपूर वेळ रिकामा मिळालाय काय
बाकी मस्त शिमगा आहे प्रोफेसर......!
भुंगाजी, पंतांना काय भरपूर
भुंगाजी,
पंतांना काय भरपूर वेळ रिकामा मिळालाय काय<<<<<<
वेळ रिकामा कुणाला मिळत असतो काय? तो काढावा लागतो.......इच्छा/इच्छाशक्ती असेल तर!
बाकी मस्त शिमगा आहे प्रोफेसर......!<<<<<<<<
धन्यवाद शिमगा मस्त वाटल्याबद्दल!
प्रा.सतीश देवपूरकर
अनेक शेर छान आहेत मतला जरा
अनेक शेर छान आहेत
मतला जरा गडबडीचा वाटतोय
'अनेक सण' साजरे केले जातात शिमगा हा एकवचनी असल्याने तो साजरा करतात
मायबोलीवरील सुप्रसिद्ध,
मायबोलीवरील सुप्रसिद्ध, व्यासंगी, गझलअभ्यासक व गझलअभ्यस्त आदरणीय श्री. प्रसादपंत यांच्या आग्रहाखातर ही “शिमग्याची गझल” खास, त्यांना आमचेकडून विनम्रपणे अर्पण........
++++++
सहृदय रसिक प्रसादपंत येथे व्यासंगी मानले जात असतील तर गझलेला लावणी मानायला हवे.
कळावे
गंभीर समीक्षक
अश्या मेड टू ऑर्डर गझलांचे
अश्या मेड टू ऑर्डर गझलांचे मशीन टाकून कळप जमवून उथळ टाळेपीट करून घेण्यात धन्यता मानणार्यांना आम्ही मराठी गझल क्षेत्रातून बेदखल करत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कळावे
गंभीर समीक्षक
बहिर्जी बरोबर
बहिर्जी बरोबर सहमत
"प्रसाद्पंत" खरच कुठे फेडणार ही पापे तुम्ही. एव्हडे मामांचे प्रेम ऊतु जात होते तर त्यांच्या घरी जाउन अॅकायाचा शीमगा.
कविता पाडणार्यांची मायबोली
कविता पाडणार्यांची मायबोली वर झाली गर्दी !
थांबवा ह्यांचा रतीब, यांची दिवाळी आमचा शिमगा !!
>>>आपण कवाफी सुचवा म्हणाला,
>>>आपण कवाफी सुचवा म्हणाला, पण आम्हाला आमची शिमग्यावरची गझल साक्षात दिसू लागली!
संध्याकाळी सौंबरोबर बाजारहाटास बाहेर पडलो पण डोक्यात हीच गझल थैमान घालत होती!
१/२तासात गझलेचे ५ शेर कारमधेच चिठोरग्यावर सौंचे लक्ष चुकवून उतरवले व उरलेली गझल घरी आल्यावर जवळपास पूर्ण करून रात्री निवांत झोपी गेलो!
सकाळी उठल्या उठल्या एक शेवटचा हात गझलेवर फिरवला व ताबडतोब ती इथे पोस्ट केली!
पुनश्च आपले अभिनंदन करतो की, इतका चांगला रदीफ आपण आम्हास देवून लेखनप्रोत्साहन दिले<<<
गझलनिर्मीतीची प्रक्रिया फार आवडली.
आपले काम सोडुन प्राध्यापक
आपले काम सोडुन प्राध्यापक पाडिती गजला !
बोंबलला अभ्यास, विद्यार्थी करिती शिमगा ||
सहृदय रसिक प्रसादपंत येथे
सहृदय रसिक प्रसादपंत येथे व्यासंगी मानले जात असतील तर गझलेला लावणी मानायला हवे. >>>
"मामा , मला वाचवाआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ "
>>> " समीक्षक ह्या प्राण्याची ह्या जगात गरज काय हे मला अजुन कळाले नाहीये " असे आमचे पुण्यातील एक सुप्रसिध्द मित्र म्हणाले होते ...त्याची आज प्रचिती आली
पण आपण आम्हाला किमान 'सहृदय ' आणि "रसिक" मानलेत हे ही नसे थोडके
(अवांतर : मी खरच नाही हो व्यासंगी ...गझलेचा तर ग जमला नाही आपल्याला ...( मगर दिल को खुष रखने के लिये गालिब ये खयाल अच्छा है
लावणीचा "व्यासंग" करायची इच्छा आहे
मागे एकदा योग आला होता ...आता पुढच्या वेळेला कोल्हापुरला जाईन तेव्हा नक्की करेन )
गंभीर समीक्षक | 8 January,
गंभीर समीक्षक | 8 January, 2013 - 17:43
अश्या मेड टू ऑर्डर गझलांचे मशीन टाकून कळप जमवून उथळ टाळेपीट करून घेण्यात धन्यता मानणार्यांना आम्ही मराठी गझल क्षेत्रातून बेदखल करत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कळावे
गंभीर समीक्षक
<<
कोण आपण?
लावणारे चेहर्यावर चेहरे
लावणारे चेहर्यावर चेहरे करतात शिमगा
पहिला मिसरा असा लिहीला असता मी.
शिमगा जोरात आहे थोडी टीमकि ची
शिमगा जोरात आहे
थोडी टीमकि ची जोड होउन जाउन्द्या
विजयराव! चेह-यावर लावणारे
विजयराव!
चेह-यावर लावणारे चेहरे(असे लोक.....अव्यक्त) करतात शिमगा!
म्हणून हा मिसरा असा लिहिला.
ापण सुचवलेला बदलही चांगला आहे!
धन्यवाद श्रीवल्लभ!
धन्यवाद श्रीवल्लभ!
@प्रोफेसर - मी तुमच्या गजले
@प्रोफेसर - मी तुमच्या गजले वर तुमचेच रदिफ, काफिया वापरुन सुंदर सुंदर शेर टाकतो, पण तुम्ही मात्र ignore करता. हे बरोबर नाही.
प्रसादपंत! इग्नोअर कुठे रे
प्रसादपंत!
इग्नोअर कुठे रे करतो बाबा?
तुझ्या मूळ रचनाही टाकत चल>>>>