इंग्रजी कॉन्व्हेंट मुळे गुन्हे वाढले ?

Submitted by रमेश भिडे on 3 January, 2013 - 12:06

दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेचा दाखला देत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीवर छडी उगारली आहे. इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. आत्महत्या, हत्या, बलात्कारासारख्या घटनांना असंस्कृतपणाच कारणीभूत आहे, असा संताप सिंग यांनी व्यक्त केलाय.

शाळा, महाविद्यालये यांचा आत्महत्या व हत्यांशी थेट संबंध असल्याचे नमूद करून सिंग यांनी आपला दावा अधिक स्पष्ट करण्यासाठी क्राईम मीटरच समोर ठेवला. ते म्हणाले, ' मुंबईत १५० हत्या झाल्यास त्याच्या आठ पट घटना या आत्महत्यांच्या असतात. गंभीर बाब म्हणजे हे आत्महत्या करणारे सर्वच्या सर्व सुशिक्षित असल्याचेच आढळून आले आहे. एखाद्या अशिक्षित व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना कधीही घडलेली नाही. ' सिंग यांनी पुण्याचेही उदाहरण दिले. ते म्हणाले, ' मी पुण्यात असताना तेथे तर आयटी क्षेत्रात काम करणारे तसेच इंजिनिअर्सनीही नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घटना घडल्या. '

आत्महत्या करणा-या व्यक्ती या इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांत शिकलेल्या असतात, असा दावा सिंग यांनी केला. ही पार्श्वभूमी असतानाही बहुतांश पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाठवण्याचा असतो, अशी नाराजी सिंग यांनी व्यक्त केली.

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास इथली शिक्षण पद्धतीच कारणीभूत असल्याचा आरोप सिंग यांनी केला. दिल्लीत जी भयंकर घटना घडलीय तसेच मुंबईतही ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडताहेत. त्याला मी संस्कृती मानत नाही. हा केवळ असंस्कृतपणा आहे. हे जे काही घडतय ते असंस्कृतपणाचे दुष्परिणाम आहेत. आपल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सध्या जे काही शिकवले जाते त्यात कुठेही संस्कार पहायला मिळत नाहीत. मुळात त्यात जीवनाचे महत्वच मुलांना समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे सगळा घात झालाय, असे सिंग म्हणाले. हे सगळं थाबवायचं असेल तर शिक्षण पद्धतीत बदल अनिवार्य आहे. त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे स्पष्ट मतही सिंग यांनी मांडले. सिंग यांनी याआधी २००९ मध्येही आपल्या ब्लॉगमधून शिक्षण पद्धतीवर परखड भाष्य केले होते.

संदर्भ- मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागे निघतायत हे आहेच पण असल्या महान विचारांना अनुमोदन देणारी मंडळीही आहेत हे त्याहून महान आहे.

स्वातीशी सहमत. मूल्य शिक्षणाबद्दल असतं तर ठीकय... पण कॉन्व्हेन्ट? इन्ग्रजी माध्यम? मग मराठी शाळा ज्यांच्यात आठवीपासून काही विषय इंग्रजीत आहेत त्या शाळेत शिकलेल्यांचं काय? ना घरका ना घाट का?
एखाद्या चुकार ब्लॉगस्पॉटवर काही चिताडणं एक गोष्टं पण पोलीस आयुक्तांनी इतकं बेजबाबदार विधान करणं..
खरच कठीण आहे... झापडं लावून चाललय सगळंच. इतकी मोठी सामाजिक समस्या... त्याचं उत्तर असं झटक्यात हवेत बोट ठेवल्यासारखं?

इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि कॉन्वेन्ट्स यात पुष्कळ फरक आहे. कॉन्वेन्ट हे नन्सनी चालवलेले मुलींसाठी असलेले शिक्षणस्थळ असते. अशा प्रकारच्या संस्थांत कडक शिस्त तर असतेच पण मुलींनी समाजात कसे बोलावे,वागावे याबद्दल एक आचारसंहिताही असते आणि ती कसोशीने पाळली जाते. समोर आलेल्या ओळखीच्या व्यक्तीस अभिवादन करणे(लाजून किंवा दखल न घेता तोंड न फिरवणे),शालीनतेने हालहवाल पुसणे,कुठल्याही प्रकारे सौंदर्यप्रसाधन न करणे, ठराविकच प्रकारचा गणवेश(लांबी,बाह्या वगैरे)असे नियम असतात आणि त्यांचे पालन होते आहे की नाही ते पाहिले जाते. थोडक्यात या शाळांमध्ये नागरी मूल्यशिक्षण असते, त्यामुळे एलिटिझ्म आला तरी रीफाइन्मेंट ही येते. आणि माझे तर मत आहे की आजच्या पोलिटिकल क्लासला किम्बहुना सगळ्यांनाच ह्या एलिटिझ्म आणि रीफाइन्मेंट्ची गरज आहे ज्यामुळे एक ब्रॉडर आउट्लुक (विशाल नव्हे,रुंद) अंगी बाणेल.बड्या धेंडांनी काढलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळांत या धेंडांची वा तत्सम मुले जातात ज्यांना ब्रॅट्स हा शब्द लागू पडतो. या शाळांच्या संस्थापक-चालकांनाच नागरी मूल्यशिक्षणाची आवश्यकता असते. अर्थात याला काही सन्माननीय अपवाड आहेतच. तेव्हा सर्व इंग्लिश माध्यम शाळांना सरसकट झोडपू नये.

अरे देवा Sad काय हे विचार? शिक्षणाचं माध्यम आणि घडणारे गुन्हे यात लावलेला हा बादरायण संबंध आहे.

डॉ(पीएचडी इन पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) सत्यपाल सिंग यांनी स्टॅटिस्टिक्स+रिसर्चचा हवाला देत ही विधाने केली आहेत.
All of the perpetrators are educated people. I have never seen an uneducated person committing suicide. I have researched this even while I was police commissioner in Pune. There were engineers and IT professionals committing suicide.
“Most suicides,” Singh reportedly said, “are committed by those who have studied in the English medium. I have never heard of or seen a Sanskrit-medium educated person committing suicide

हे सगळे प्रतिसाद देण्याच्या पलीकडचे आहे.

धाग्याच नाव वाचुनच खदाखदा हसत इथे आलोय.
खुपच जनरलाइज्ड विधान आहे. मटाने एकतर मोडतोड करुन बातमी लिहिली असेल.
अथवा सुतावरुन स्वर्ग गाठला असेल.

लैंगिक अत्याचार व गुन्हेगारी याचा संबंध इंग्लीश माध्यमाच्या शाळांशी जोडणं कितपत औचित्यपूर्ण आहे हें सांगणं कठीण आहे. पण हेटाळणी व अश्लाघ्य भाषा याचं प्रमाण अशा शाळांतील , विशेषतः उच्चमध्यम वर्गातील मुलांत, जास्तच असावं असं मला जाणवतं. ठळक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या इंग्लंडविरुद्धच्या एका क्रिकेट सामन्यात अशा मुलांचीं टोळकीं इंग्लीश खेळाडूना सतत व विनाकारण इतक्या गलीच्छ शिव्या [ अर्थात, इंग्लीशमधे ] मोठ्याने ओरडून देत होती कीं मला किळस येऊन स्टेडियममधून उठून जावसं वाटलं.[ इंग्लीश खेळाडूंनी त्याबाबत तक्रारही केली होती ]. मुख्य म्हणजे त्या मुलाना क्रिकेटचा गंधही नव्हता व फक्त या शिव्या घालण्यापुरतेच ते तिथं आले होते व ते त्यांत धन्यता मानत होते !!

संस्कृत माध्यम? आहे कुठे बरं ही शाळा? मुम्बै - पुण्यात तरी नाही ऐकली बुवा

दुशा:सनाच उदाहरण परफेक्ट आहे.

संसदेत बसून "क्ष" फिल्म पहाणारे कुठच्या माध्यमात शिकले?
वार्षिक पोलीस महोत्सवात आयटेम गाण्यांना दाद देणारे, बिलो बेल्ट विनोदां ना दाद देणारे प्रेक्षक (पक्षी पोलीस आणि नेते आणि मोठमोठे अधिकारी) ते कुठच्या माध्यमात शिकले ?

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा/बदल हवा म्हणणार्‍यांनी काय बदल हवा ह्यावर विचार केलाय की नुसतं आपलं "दर्जा" घसरला... संस्कार हवे.. नकोत असं काही तरी हवेत सोडून द्यायचं?

कैच्याकै बै!

संस्कृत माध्यम? आहे कुठे बरं ही शाळा? मुम्बै - पुण्यात तरी नाही ऐकली बुवा >> जाईजुई, बहुतेक वैदिक शाळा या संस्कृत माध्यमांतून शिकवतात. पण सत्यपाल सिंग यांना धार्मिक शिक्षण देणार्‍या शाळा (वैदिक, मदरसा अथवा चर्चेस अपेक्षित नसावीत- असा अंदाज).

मला हा एक शब्द वाटला चटकन>> वाटणारच!!!! Proud

एवढी टीका सुरू झाल्यावर मला डॉ. सत्यपाल सिंग यांनी जर खुलासा केलाच तर तो "मी इंग्रजी माध्यम म्हणजे शैक्षणिक माध्यम म्हटलो नाही. इंग्रजी मीडीया उर्फ प्रसारमाध्यमे असे मला म्हणायचे होते, मराठी वृत्तपत्रांनी त्याचा अर्थ चुकीचा लावला" असा असेल (हा माझा अंदाज!!!!)

भाऊ, एका उदाहरणावरून/अनुभवावरून जनरलायझेशन करणार का? माझ्या घराशेजारीच बहुसंख्य मुले निम्नमध्यमवर्गीय असलेली मराठी माध्यमाची शाळा आहे.
त्यातील अनेकांचे आपसातले बोलणे अनेकदा कानावर पडते, तेव्हा तात्पुरते बहिरे होण्याची सोय असती तर बरे झाले असते असे वाटते.

इंग्रजीतील बातमीची लिंक
http://www.financialexpress.com/news/shocker-english-education-triggers-...

इंग्रजी वृत्तपत्राने बातमीत शॉकर असा शब्द वापरला आहे. मटाने त्यांचे वक्तव्य उचलून धरले आहे का?
धाग्याच्या हेडरमधील मजकूर मटाच्या मूळ बातमीतून उचलला आहे असे मानले तर वार्तांकन करताना आक्षेपाचा नव्हे तर अनुमोदनाचा सूर जाणवतोय.

Most suicides,” Singh reportedly said, “are committed by those who have studied in the English medium. >> स्टॅटिस्टिक्सनुसार हा एक मुद्दा असू शकतो. त्याला बर्‍यापैकी वैधदेखील मानता येइल. पण मग याचा संबंध गुन्हेगारीशी लावण्याचे कारण लक्षात आले नाही.

नंदिनी, I have never seen an uneducated person commit suicide या विधानावरून त्या आकडेवारीच्या दर्जबद्दल काय वाटते?

वर्तमानपत्राने सिंग यांचे वक्तव्य देताना आकडेवारी द्यायला हवी होती. मुळात अशी आकडेवारी सहज उपलब्ध होऊ शकते. पण "मटा ऑनलाईन" एवढे दोनच शब्द बोलून मी थांबते. Happy

अतिशय हास्यास्पद मत आहेत. इतर माध्यमांच्या शाळाप्रमाणेच कॉन्व्हेंट इंग्रजी शाळा मुलींना डिसिप्लिन शिकवतात. योग्य वर्तणुक देतात. समाजिक बांधिलकी शिकवली जाते. मॉरल लिविंग, बेटर लिविंग असे विषयच अभ्यासक्रमात आहेत. इतर शाळाप्रमाणेच अभ्यासक्रम असतो.

गुन्हा कसा करावा, आत्म्हत्या कशी करावी असा अभ्यासक्रम तिथे नसतो.

भाऊ, एका उदाहरणावरून/अनुभवावरून जनरलायझेशन करणार का? >>>>+१

आम्ही दबंग २ बघायला गेलो होतो. तेव्हा मागल्या रो मधे ७-८ मुलं बसली होती. चित्रपट सुरु होण्यापासुन जी त्यांनी आरडाओरड्याला सुरवात केली की ज्याच नाव ते. बरं नुसतं आरडा ओरड नाही तर सलमान खान तुझ्या आई* **. मा, भे अश्या घाणेरड्या शिव्या देत होते मोठमोठ्याने. एकही डायलॉग ऐकु येत नव्ह्ता. अशा गुंड प्रवृत्तीच्या मुलांच्या तोंडी लागुन फायदा नाहीच तर नुकसानच जास्त म्हणुन १०-१५ मिनिटांनी आम्च्या रो मधुन ३-४ पुरुष उठुन बाहेर गेले आणि सेक्युरीटीला घेउन आले आणि त्यांना बाहेर काढले. तरीही सेक्युरीटीशी सुध्धा भांडत होते. मग पोलिसांची धमकी दिली तेव्हा कुठे गेले ते. आणि त्यांच्या भाषेवरुन ते सगळे कोणत्याही इंग्रजी, कॉन्व्हेंट मधुन तर सोडाच ते शिकलेलेच वाटत नव्हते.

Rapes occur in 'India' not 'Bharat': RSS chief Mohan Bhagwat

एल एम एफ ए ओ

पुरुष गायनॅक डॉक्टरनेही आपल्या महिला पेशंटचा विनयभंग, लैंगिक शोषण वगैरे केल्याची उदाहरणे आहेत.

अशी विधाने आकडेवारीशिवाय धाडसी वाटतात. सिंग यांचं नेमकं विधान काय, नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोच्या सर्वेची अ‍ॅक्युरसी आणि व्यापकता किती, हाती असलेल्या डेटाचं विश्लेषण कसं करण्यात आलं आहे, नोंदवलेले गुन्हे किती, न नोंदवलेले गुन्हे किती हे सर्वच पहायला हवं. एकंदर शिक्षणपद्धतीमधे मूल्यशिक्षणाचा अभाव आहे हे मान्य करायला अडचण नसावी.

पण, दिल्ली किंवा महानगरात घडलेल्या घटनेत काही गुन्हेगार कॉन्व्हेंट \ इंग्लीश \ सेमी इंगीश माध्यमात सापडणं शक्य आहे. कारण इथे व्हर्नाक्युलर माध्यमाच्या शाळा कमी आहेत. पण याचा अर्थ हरियाणा मधे होणारे आणि नोंदवले न जाणारे गुन्हे हे देखील याच कारणामुळे घडतात का ? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किंवा जिथे कॉन्व्हेंट स्कूल्स नाहीत किंवा जिथे शिक्षण नाही तिथे गुन्हे घडत नाहीत असा याचा अर्थ काढायचा का ? दिल्लीच्या त्या घटनेतले गुन्हेगार शाळेत तरी गेलेले होते का ? पूर्वेकडच्या राज्यात तर मिशनरी शाळाच आहेत. मग तिथले बलात्काराचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे किंवा कसे हे सिंग साहेब किंवा त्या मताचे लोक सांगू शकतील का ?

कशाचा कशाशी संबंध दिसत नाही... Sad

असे नक्की म्हणाले का त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केलेला आहे ?

वैद्यबुवा, भारीच प्रतिसाद.
कॉन्वेंटमध्ये मूल्यशिक्षण मिळत नाही हे कॉन्वेंटमध्ये न गेलेल्या लोकांनी काढलेले खूळ आहे असे माझे कॉन्वेंटला न जाता मत आहे. कारण माझे कित्येक मित्र/ नातेवाईक कॉन्वेंटात शिकलेत आणि ते माझ्याइतकेच किंवा माझ्याहुन जास्त सुसंस्कृत आहेत. (मूळात मी सुसंस्कृत आहे का विचारू नका Happy )

एकंदर बाफचा सूर पाहता सिंग साहेबांचे विधान काय असावे याचा अंदाज येतो. अशी व्यक्ती मुंबईसारख्या अतिसंवेदनशील नगरीच्या पोलीसप्रमुखपदावर असावी का याचा शासनाने गंभीरपणे विचार केला असणारच. त्याबद्दल मनात कुठलीही शंका नाही.

मात्र या निमित्ताने एक विचार, एक मत इथे मांडावंसं वाटतं कि महत्वाच्या पदांवर कुठल्याही विचारसरणीला वाहिलेली व्यक्ती असू नये याची काळजी शासनाने घ्यायला हवी. पूर्वी पदोन्नतीने खालून वर गेलेल्या अधिका-यांना समाजातल्या सर्व प्रवाहांची माहिती असे, आता थेट आयपीएस सर्विस मधून नेमणूक झालेल्यांना अशी माहिती असते किंवा कसे याबद्दल शंका आहे. अशा नेमणुकांबद्दल भाष्य करणं हे आपल्या लोकशाहीत बसतं अथवा नाही याबद्दल कल्पना नाही.

इंग्रजी व काँन्हेंट शिक्षणाचा असा दुष्परिणाम घालवायचा असेल तर गोसेवेशिवाय पर्याय नाही, हम्मा!!!!!!
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-12-29/edit-page/3603705...

पार गुरुकुल पध्दतीतून शिकून आलेल्या दु:शासनाने सुध्धा वहिनीच्या वस्त्राला भर सभेत हात घातलाच होता. >>>> सहमत

दुर्योधन, दु:शासन आदि कौरव आणि पांडव सर्व द्रोणाचार्यांचे शिष्य होते. त्या शिक्षणाव्यतिरिक्त काय वातावरण त्यांना लाभले? त्यांची विवेक बुद्धि आणि प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता काय होती? हे महत्वाचे मुद्दे आहेत. एकाच घरात वाढलेली दोन व्यक्तींमध्ये स्वभावात आणि व्यवहारात बराच फरक असू शकतो.
अजून बर्‍याच घरांमध्ये मुलींना उपेक्षित करून मुलांना उत्तेजन दिलं जातं. मुलीच्या जातीला हे शोभत नाही, तू पुढे शिकून काय करशील, नाही तरी उद्या चूल अन मूल ह्यातच सर्व आयुष्य जाणार आहे इ. इ.
त्यांना धड खायला नाही, चांगलं नेसायला नाही, शाबासकी तर फार लांबची गोष्ट...

मुलांनी मुलींशी किंवा मुलींनी मुलांशी वाढत्या वयात कसं वागायला हवं हे मला वाटतं काही अंशी पालकांनी ह्या बाबतीत दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना कळत नाही. "आमच्या आई साहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा सुंदर निपजलो असतो" सांगणारे शिवरायांचे उदाहरण सर्वांसमोर आहे.

आजच्या परिस्तिथिला केवल शिक्षण कारणीभूत आहे असे सांगणे योग्य नाही.

Lol innovative आहेत की सिंग! convent English or मराठी, उलट जास्त वळण लावणारे असते.
शिक्षणाच्या/ शिक्षण देण्या आणि घेण्याच्या decreasing quality मुळे गुन्हे वाढले असे म्हणायचे होते का? Uhoh
suisides हा वेगळा मुद्दा आहे. त्याचा depression शी संबंध असतो बहुधा, education शी कसा?

<< भाऊ, एका उदाहरणावरून/अनुभवावरून जनरलायझेशन करणार का? >> मयेकरजी , 'अशांचं प्रमाण अधिक असावं एवढंच म्हणालोय मीं; माझ्या मर्यादित अनुभवावरून मीं 'जनरलायझेशन'' करणं हा आगाऊपणा आहे , हें मान्य.
एक मुद्दा मात्र स्पष्ट करतो. मी कित्येक दशकं स्टेडियममधे जावून सर्व थराच्या लोकांमधे बसून सामने पाहिले आहेत. एखादा खेळाडू खराब खेळला तर मुलांच्या तोंडून शिव्या येतात पण त्या त्यांच्या कंपूपुरत्या मर्यादित व क्रिकेटच्या जोषामुळे आलेल्या तात्पुरत्या असतात. मोठ्याने ओरडून फक्त ' हाय, हाय ' किंवा 'शेम, शेम ' एवढाच बव्हंशी जाहीर निषेध असतो. क्रिकेटशीं कांहीही देणंघेणं नसूनही शिकलेलीं श्रीमंत मुलं केवळ इंग्लीशमधे गलीच्छ शिव्या मोठ्याने घालण्यासाठीं स्टेडियममधे मोठ्या संख्येने येतात, तेंव्हा मात्र, जनरलायझेशन न करतां , ह्याचा त्यांच्या शैक्षणिक संस्थेशी तर संबंध नाही ना, ही पाल मनात चुकचूकते.

माझे असे निरीक्षण आहे की , कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या मुली या मराठी भाषा व मराठी बोलणार्‍या नातेवाईक / मुलांना कमी लेखतात .प्रातींनिधिक उदाहरण द्यायचे तर विजय चव्हाण नावच्या मित्राने संगीतलेली गोष्ट- मालाड येथे कथित उच्चभ्रू वस्तीत राहणारी राजश्री नावाची एक कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली मराठी मुलगी. त्या मुलीचे असे विचार होते की , मराठी ही कामवाल्या बाईची / रामु गाड्याची, वॉचमन ची, रस्त्यावर भाजी विकणार्‍या ~लोकल~ लोकांची नेटीव्ह लँग्वेज आहे.......................... ! इ.इ.

या मुलीला अनेक मराठी स्थळे सांगून आली, पण तिने त्यांना नाकारून एका भैय्या शी लग्न केले. भैय्या ने वर्षभरा नंतर तिला मारहाण सुरू केली ,शेवटी एक वर्षाचे मूल घेवून घटस्फोतीता म्हणून वडिलांच्या घरी आली............

कॉन्व्हेंट मधील मुली/मुले मराठी मुलांना हीन/मागासलेली लेखतात .व मुक्त सेक्स इत्यादि पाश्चात्य संकल्पनांनी पछादून स्वता:च्या आयुष्याचे वाटोळे करून घेतात ,हे चक्षु:एव सत्य आहे ...........!

दिल्लितले सहा जण काय कॉन्व्हेंट मध्ये शिकले काय ?

साहेबांची मुले कोठे शिकतात बाय द वे ?

त्या सिंग ची (मी कॉन्वेंट मध्ये शिकल्याने जरा उद्धट आहे ) मुलाखत वाचून झिट आलीय मला.

पुन्हा एकदा .. हे राम!

देव त्यांना माफ करो... Proud

अवांतर :

गायछाप जर्दा,

>> कॉन्व्हेंट मधील मुली/मुले मराठी मुलांना हीन/मागासलेली लेखतात .व मुक्त सेक्स इत्यादि पाश्चात्य
>> संकल्पनांनी पछादून स्वता:च्या आयुष्याचे वाटोळे करून घेतात ,हे चक्षु:एव सत्य आहे ...........!

असं हीन लेखणं मी ऐकलंय. प्रत्यक्ष अनुभव नाही. मात्र एक थोडा वेगळा अनुभव सांगावासा वाटतो. एका इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍या मुलाच्या आईने माझं इंग्रजी (बोली नव्हे लेखी) वाचून मी कॉन्व्हेंटशिक्षित असल्याचा ठाम ग्रह करून घेतला होता. तसं नसल्याचं स्पष्ट झाल्यावर तिने आश्चर्य व्यक्त केलं होतं. विचार अचूक रीत्या मांडण्याची प्रक्रिया तिला विशद करण्यात काहीच अर्थ नव्हता!

जर माझं इंग्रजी तिने वाचलं नसतं तर कदाचित तिने मला कमी लेखलं असतं की काय, असा एक विचार मात्र माझ्या मनी डोकावून गेला. ती बाई मराठीच होती. त्यामुळे माझं इंग्रजी वाचायची वेळ तिच्यावर येण्याची शक्यता फार कमी होती. तिच्या मुलाला सी.व्ही. लिहिण्यासाठी मदत करीत होतो तेव्हा हा प्रकार घडला.

आ.न.,
-गा.पै.

पार गुरुकुल पध्दतीतून शिकून आलेल्या दु:शासनाने सुध्धा वहिनीच्या वस्त्राला भर सभेत हात घातलाच होता.
<<<

का ही ही चालु आहे इथे, पण अगदीच रहावत नाही म्हणून एक करेक्शन ,
पार गुरुकुल पध्दतीतून शिकून आलेल्या द्रोण शिष्याने युधिष्ठिराने आपली बायको 'भोगायची वस्तु' समजून दावी लावली होती आणि अख्ख्या राज दरबारी सभेने हे होउ दिलं होतं/ पाहिलं होतं, हे आधी.
दु:शासनाचे पाप वगैरे गोष्टी नंतरच्या.

असो, बाकी चालु द्या हास्यास्पद चर्चा(!).

सरकारचे, पोलिसांचे अपयश झाकण्यासाठी , त्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे साहेब कै च्या कै विधाने करतायेत हे कोणालाही कळेल . दील्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची पार वाट लागलेली आहे हे सांगायला कोणत्याही आकडेवारीची गरजच नाही.

Pages