इंग्रजी कॉन्व्हेंट मुळे गुन्हे वाढले ?

Submitted by रमेश भिडे on 3 January, 2013 - 12:06

दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेचा दाखला देत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीवर छडी उगारली आहे. इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. आत्महत्या, हत्या, बलात्कारासारख्या घटनांना असंस्कृतपणाच कारणीभूत आहे, असा संताप सिंग यांनी व्यक्त केलाय.

शाळा, महाविद्यालये यांचा आत्महत्या व हत्यांशी थेट संबंध असल्याचे नमूद करून सिंग यांनी आपला दावा अधिक स्पष्ट करण्यासाठी क्राईम मीटरच समोर ठेवला. ते म्हणाले, ' मुंबईत १५० हत्या झाल्यास त्याच्या आठ पट घटना या आत्महत्यांच्या असतात. गंभीर बाब म्हणजे हे आत्महत्या करणारे सर्वच्या सर्व सुशिक्षित असल्याचेच आढळून आले आहे. एखाद्या अशिक्षित व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना कधीही घडलेली नाही. ' सिंग यांनी पुण्याचेही उदाहरण दिले. ते म्हणाले, ' मी पुण्यात असताना तेथे तर आयटी क्षेत्रात काम करणारे तसेच इंजिनिअर्सनीही नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घटना घडल्या. '

आत्महत्या करणा-या व्यक्ती या इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांत शिकलेल्या असतात, असा दावा सिंग यांनी केला. ही पार्श्वभूमी असतानाही बहुतांश पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाठवण्याचा असतो, अशी नाराजी सिंग यांनी व्यक्त केली.

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास इथली शिक्षण पद्धतीच कारणीभूत असल्याचा आरोप सिंग यांनी केला. दिल्लीत जी भयंकर घटना घडलीय तसेच मुंबईतही ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडताहेत. त्याला मी संस्कृती मानत नाही. हा केवळ असंस्कृतपणा आहे. हे जे काही घडतय ते असंस्कृतपणाचे दुष्परिणाम आहेत. आपल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सध्या जे काही शिकवले जाते त्यात कुठेही संस्कार पहायला मिळत नाहीत. मुळात त्यात जीवनाचे महत्वच मुलांना समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे सगळा घात झालाय, असे सिंग म्हणाले. हे सगळं थाबवायचं असेल तर शिक्षण पद्धतीत बदल अनिवार्य आहे. त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे स्पष्ट मतही सिंग यांनी मांडले. सिंग यांनी याआधी २००९ मध्येही आपल्या ब्लॉगमधून शिक्षण पद्धतीवर परखड भाष्य केले होते.

संदर्भ- मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री. सिन्ग हे संस्कृतचे स्कॉलर आहेत्.त्यांच्या म्हनण्यात तथ्यांश आहेच पण वेगळ्या अर्थाने. जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांचे मातृभाषेतील वाचन जवळ जवळ नसतेच. किंबहुना इंग्रजीचे लितरेचरही ते वाचत नाहीत. त्यामुळे मातृभाषेतील उत्तमोत्तम साहित्यातून मानवी भावभावना , नात्यांची ओढ, सामाजिकीकरण, करुणा , संवएदनाशीलता, रसग्रहण , साहित्यातून जीवनानुभव समृद्ध करून जीवनाचे सौंदर्याचा आस्वाद घेणे या बाबत पोषण अशा शाळात होत नाही हे सत्य आहे. त्यामुळे संकटे सहन करण्याची क्षमता , भावना उत्कटपणे पोचवण्याची क्षमता , भावनांचे समायोजन (मानसशास्त्रातील अ‍ॅडजस्टमेन्ट ही संज्ञा) याला पारखे व्हायला होते.
एक उदाहरणः शामची आई मध्ये एक प्रसंग आहे शामच्या वडलांची सक्त ताकीद असते की स्वयंपाकात कमी जास्त झाले तर नावे ठेवायची नाहीत ,एखादे वेलीच चूक होते ती दुर्लक्ष करायची. जेवणात खोड्या काढल्यास त्या स्त्रीच्या सगळ्या श्रमांवर पाणी फिरते. एकदा शामची आई भाजीत मीठ घालायला विसरली . मुलांनी वडिलांच्या धाकाने व वडिलांनी तत्व म्हणून निमूटपणे ती भाजी संपवली .शेवटी आई जेवायला बसल्याव्र भाजी अळणी असल्याचे लक्षात आले व मुलांनी अळणी भाजी खाल्ली या विचाराने आईला दु:खाने रडू कोसळले. हा एक उत्तम संस्कार आहे. मी स्वतः हा प्रसंग वाचल्यानन्तर कोणत्याही जेवणाला अगदी हॉतेलच्या देखील नावे ठेवणे बन्द केले. व्यवसायाच्या कारणाने जेवनाची खूपच आबाळ होते त्यामुळे जेवनाचे महत्व त्यमागच्या श्रमाचे महत्व पटलेले आहे. असे संस्कार नकळत उत्तम साहित्यातून होतात. आजही माझी मुले साध्या साध्या मराठीशब्दांचे, संकल्प्नांचे अर्थ विचारते तेव्हा दया येते व ही मंडळी भाषा समृद्धीतून व त्यातून येणार्‍या व्यक्तिविकासास कशी पारखी झाली आहे हे पाहून व्यथित व्हायला होते. वामन चोरघडेंच्या एका कथेत किशोरावस्थेत मुलींकडे मुलांनी पाहण्याचा निर्मळ व मोहक दृश्टिकोन चित्रीत केला आहे हा पाठ आम्हाला मराठीच्या पाठ्य पुस्तकात अगदी योग्य वेळी म्हनजे १० वी की ११ वी ला होता.नाही म्हटले तरी त्यातून सहाध्यायिनींच्या सहवासातील गोडवा,जिव्हाळा, सौंदर्य अनुभवण्याची एक जाणीव निर्मान होऊन तिने लैंगिक जाणिवेवर मात करण्याची क्षमताही दिली साहित्यातून होणार्या संस्काराचे महत्व आहेच.
संत साहित्यातून येणारे भावनिक नियंत्रनाचे संस्कार स्ट्रेस मॅनेजमेन्ट म्हणून उपयोगी येत नाहीत का?
डॉ सिंग याना या अंगाने म्हणायचे असावे असे वाटते....

>>>>श्री. सिन्ग हे संस्कृतचे स्कॉलर आहेत्.त्यांच्या म्हनण्यात तथ्यांश आहेच पण वेगळ्या अर्थाने. जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांचे मातृभाषेतील वाचन जवळ जवळ नसतेच. किंबहुना इंग्रजीचे लितरेचरही ते वाचत नाहीत. त्यामुळे मातृभाषेतील उत्तमोत्तम साहित्यातून मानवी भावभावना , नात्यांची ओढ, सामाजिकीकरण, करुणा , संवएदनाशीलता, रसग्रहण , साहित्यातून जीवनानुभव समृद्ध करून जीवनाचे सौंदर्याचा आस्वाद घेणे या बाबत पोषण अशा शाळात होत नाही हे सत्य आहे. त्यामुळे संकटे सहन करण्याची क्षमता , भावना उत्कटपणे पोचवण्याची क्षमता , भावनांचे समायोजन (मानसशास्त्रातील अ‍ॅडजस्टमेन्ट ही संज्ञा) याला पारखे व्हायला होते.<<<<

निरक्षर लोक सततच भावनाशून्यपणे वावरतात हे गृहीतक गाढवपणाचे लक्षण नाही काय?

मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्या या निष्कर्शाला स्टॅटेस्टीक बेस असेलच की. डॉक्टरेट मिळवलेला सरकारी सनदी अधिकारी बेसलेस विधाने करेल अशी शक्यता वाटत नाही. मायबोलीकरांना जर अजुन माहिती हवी असेल तर आपण त्यांची मुलाखत घ्यायला हवी आणि मायबोलीवर प्रसिध्द करायला हवी. आपला फोरम ११ लाख मराठी लोकांचा आहे. अशी मुलाखत फक्त या विषयावर द्यायला त्यांना आक्षेपार्ह वाटेल असे वाटत नाही. drsinghsp@yahoo.co.in या इमेल आयडीवर संपर्क करुन पाहुया.

भरतदा,

स्वतः डॉ सत्यपाल सिंगसाहेब यांनी यावर भाष्य केलेले जास्त चांगले. त्याची मुळची विधाने, मटावरचे इंटर्प्रिटेशन आणि त्यावरुन लिहलेला रमेश भिडे यांचा लेख यात तफावत असण्याची शक्यता गृहीत धरायला हवी. आत्ताच त्यांना इमेल केली आहे. पाहुया काय उत्तर येतय ?

हे विधान करणार्‍या सिंग साहेबांच आणि त्यांना अनुमोदन देणार्‍यांची मुले कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकत असावीत ... ?

. डॉक्टरेट मिळवलेला सरकारी सनदी अधिकारी बेसलेस विधाने करेल अशी शक्यता वाटत नाही.
----- हे कशाच्या आधारावर ? हा गैरसमज आहे असे माझे मत आहे.

त्यांच्या जवळ डेटा आहे किंवा नाही हे मला माहित नाही, पण डेटा आहे असे आपण काही काळ गृहित धरु. असे गृहित धरले तरी सर्व अत्याचारी घटनांची नोंद होतेच असे नाही. ९४ % घटनांत परिचयाच्या व्यक्ती कडुनच अत्याचार होतात.... असे माझे वाचन सांगते. इंग्रजी शाळेत शिकल्या मुळे धिट पणा येतो आणि म्हणुन ते नाव खराब होण्याची तमा न बाळगता गुन्ह्यांच्या नोंदी होण्यासाठी पाठपुरावा करतात. घराची इंभ्रत, लज्जा, नाव खराब होणार या भितीने बिगर- इंग्रजी माध्यमांत शिकलेली मंडळी तुलनेने घटनेची वाच्यता होणार नाही हे बघतांत. गुन्ह्यांच्या नोंदीही होत नाहीत. हा एक (बेसलेस) तर्क आहे, त्याला आधार कुठलाही आधार नाही आहे.

कुठल्याही statistics डेटा मधे थोड्याफार त्रुटी या असणार असे मानले तरी मोठ्या प्रमाणांत गुन्ह्यांची नोंदच होत नसल्याने ह्या विषयावरचा डेटा हा अपुर्ण असणार आहे. मी त्रुटी हा शब्द टाळतो आहे - तो अयोग्य वाटतो.

माझे शिक्षण इंग्रजी शाळेत झालेले नाही किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा मी पाठपुरावा करतो आहे असेही नाही. पण येथे शाळेचे माध्यम आणि गुन्ह्यांच्या घटना यांची सांगड घालणे पचत नाही.

गुन्हे परप्रांतियांमुळे वाढतात, हे अल्प उत्पन्न गटातील लोक झोपडपट्टीत वगैरे राहतात दारु वगैरे पितात आणि गुन्हे करतात व स्वराज्यात पळुन जातात. त्यांच्यावर कायद्याने बंधने आणल्यास गुन्हे कमी होतील. आता हे सर्व त्या असत्यबाबुला ठाऊक असेलच पण तो बोलणार नाही.

जालावर भागवतांच्या भाषणाचा मसुदा मिळाला. तो असा आहे -
‘‘इंडिया में जो यह घट रहा है, बढ़ रहा है वह बहुत खतरनाक और अश्लाघ्य है। लेकिन ये भारत में नहीं है। यह इंडिया में है। जहां इंडिया नहीं है, केवल भारत है वहां ये बातें नही होती, आज भी। जिसने भारत से नाता तोड़ा उसका यह हुआ। क्योंकि यह होने के पीछे अनेक कारण हैं। उसमें एक प्रमुख कारण यह भी है कि हम मानवता को भूल गये, संस्कारों को भूल गये। मानवता, संस्कार पुस्तकों से नहीं आते, परंपरा से आते हैं। लालन-पालन से मिलते हैं, परिवार से मिलते है, परिवार में हम क्या सिखाते है उससे मिलते हैं।
पारिवारिक संस्कारोंकी आवश्यकता
दुनिया की महिला की तरफ देखने की दृष्टि वास्तव में क्या है?दिखता है की, महिला पुरुष के लिए भोगवस्तु है। किन्तु वे ऐसा बोलेंगे नहीं। बोलेंगे तो बवाल हो जाएगा। किन्तु मूल में जा कर आप अध्ययन करेंगे तो महिला उपभोग के लिए है, ऐसा ही व्यवहार रहता है। वह एक स्वतंत्र प्राणी है, इसलिए उसे समानता दी जाती है। किन्तु भाव वही उपभोग वाला होता है। हमारे यहां ऐसा नहीं है। हम कहते हैं कि महिला जगज्जननी है। कन्याभोजन होता है हमारे यहां, क्योंकि वह जगज्जननी है। आज भी उत्तर भारत में कन्याओंको पैर छूने नहीं देते, क्योंकि वह जगज्जननी का रूप है। उल्टे उनके पैर छुए जाते हैं। बड़े-बड़े नेता भी ऐसा करते हैं। उनके सामने कोई नमस्कार करने आए तो मना कर देते हैं,स्वयं झुक कर नमस्कार करते हैं। वो हिंदुत्त्ववादी नहीं है। फिर भी ऐसा करते हैं। क्योंकि यह परिवार के संस्कार हैं। अब यह संस्कार आज के तथाकथित एफ्लुएन्ट परिवार में नहीं हैं। वहां तो करिअरिझम है। पैसा कमाओ, पैसा कमाओ। बाकी किसी चीज से कोई लेना-देना नहीं।
शिक्षा से इन संस्कारों को बाहर करने की होड़ चली है। शिक्षा व्यक्ति को सुसंस्कृत बनाने के लिए होती है। किन्तु आजकल ऐसा नहीं दिखता। शिक्षा मानवत्त्व से देवत्त्व की ओर ले जाने वाली होनी चाहिए। किन्तु ऐसी शिक्षा लगभग शिक्षा संस्थानों से हटा दी गई है। समाज में बड़े लोगों को जो आदर्श रखने चाहिए वो आदर्श आज नहीं रखे जाते। उसको ठीक किया जाना चाहिए। कड़ा कानून बिलकुल होना चाहिए। इसमें कोई दो राय नहीं है। कड़ी सजा दोषियों को होनी ही चाहिए। इसमें कोई दो राय नही है। फांसी की होती है तो हो। विद्वान लोग विचार करे और तय करे। लेकिन केवल कानूनों और सजा के प्रावधानों से नहीं बनती बात। ट्रॅफिक के लिए कानून है मगर क्या स्थिति होती है?जब तक पुलिस होती है, तब तक कानून मानते है। कभी-कभी तो पुलिस के होनेपर भी नहीं मानते।जितना बड़ा शहर और जितने अधिक संपन्न व सुशिक्षित लोग उतने ज्यादा ट्रॅफिक के नियम तोड़े जाते हैं। मैं कोई टीका-टिप्पणी नहीं कर रहा हूं। केवल ऑब्जर्व कर रहा हूं। मैं विमान में बैठा था। पास में एक सज्जन बैठे थे। मोबाइल पर बात कर रहे थे। विमान का दरवाजा बन्द हुआ। किन्तु उनकी बात बन्द नहीं हुई। एअर होस्टेस चार बार बात बन्द करने के लिए कह गई। इनके लगातार फोन काल आ रहे थे। अबकी बार एअरहोस्टेस को आते हुए देख वे भड़क उठे और कहने लगे, ‘२८ इंजिनिअरिंग संस्थानोंमें डिसिप्लिन रखने का जिम्मा मेरे उपर है, और आप मुझे डिसिप्लिन सिखा रही है! ’अब अगर २८ संस्थाओं में डिसिप्लिन रखने की जिम्मेदारी जिस पर है, वह एरोप्लेन में दी जानेवाली सामान्य सूचनाओं का पालन नहीं करता तो उसे हम क्या कहे?इसके विपरीत हमारे वनवासी क्षेत्रों में चले जाएं। जहां अनपढ लोग हैं, गरीब लोग हैं। उनके घर का वातावरण देखो। कितना आनन्द होता है। कोई खतरा नहीं। बहुत सभ्य, बहुत सुशील। (वहां परंपरा, परिवार की शिक्षा कायम है। शहरों में) शिक्षा का मनुष्यत्त्व से नाता हमने तोड़ दिया इसीलिए ऐसा होता है।
बिना संस्कार कानून असरदार नहीं
कानून और व्यवस्था अगर चलनी है, उसके लिए मनुष्य पापभीरू होना है, तो उसके लिए संस्कारोंका होना जरूरी है। अपने संस्कृति के संस्कारों को हमें जल्द जीवित करना पड़ेगा। शिक्षा में कर लेंगे तो परिस्थिति बदल पाएंगे। तब तक के लिए कड़े कानून, कड़ी सजाएं आवश्यक है। दण्ड हमेशा होना चाहिए शासन के हाथों में और वह ठीक दिशा में चलना चाहिए। वह इन सबका प्रोटेस्ट करने वालों पर नहीं चलना चहिए। उसके लिए उनका संस्कार भी आवश्यक है। वो वातावरण से मिलता है। पर वो भी आज नहीं है। हम यह करें तो इस समस्या का समाधान पा सकते हैं।
मातृशक्ति है भोगवस्तु नहीं
हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। वे भोगवस्तु नहीं,देवी हैं। प्रकृति की निर्मात्री है। हम सब लोगों की चेतना की प्रेरक शक्ति है और हमारे लिए सबकुछ देनेवाली माता है। यह दृष्टि जब तक हम सबमें लाते नहीं तब तक ये बातें रुकेगी नहीं। केवल कानून बनाने से काम नहीं चलेगा। वो होना चाहिए किन्तु उसके साथ संस्कार भी होने चाहिए।’’

टीआरपी वाढवण्यासाठी वादग्रस्त ठरेल अस भाषणातील एखादेच वाक्य हेडलाईन म्हणून वारंवार दाखवण्याच्या प्रसारमाध्यमांच्या प्रवृत्तीचा विचार करता " सरसंघचालकने कहा- महिला पुरुष के लिए भोगवस्तु है।" अशी बातमी न दिल्याबद्दल संघाने खरतर प्रसारमाध्यमांचे आभार मानले पाहिजेत. आपल्या या भाषणात भागवतांनी इण्डिया/ भारत एवढाच नाही , अनेक विचार मांडले आहेत ज्याबद्दल आपल मत बनवण्यास मायबोलीकर समर्थ आहेत.

http://samvada.org/2013/news-digest/hindi-mohan-bhagwat-silchar/
असम के सिल्चर में प्रबुद्ध नागरिकों के साथ हुए वार्तालाप कार्यक्रम में उपस्थित एक सज्जन ने डा. भागवत से प्रश्न पूछा, ‘‘ये जो इंडिया में आजकल जो अट्रॉसिटीज अगेन्स्ट विमेन, रेप्स, मॉलेस्टेशन बढ़ रहे है, इनमें हिंदुओंपर ज्यादा अत्याचार होते दिख रहे है। यह हिन्दुओंका मानोबल नष्ट करने का प्रयास लग रहा है। इसके संदर्भ में आपके क्या विचार हैं?’’
इस प्रश्न के उत्तर में डा. भागवत ने कहा – ‘‘इंडिया में जो यह घट रहा है, बढ़ रहा है वह बहुत खतरनाक और अश्लाघ्य है। लेकिन ये भारत में नहीं है। यह इंडिया में है। जहां इंडिया नहीं है, केवल भारत है वहां ये बातें नही होती, आज भी। जिसने भारत से नाता तोड़ा उसका यह हुआ। क्योंकि यह होने के पीछे अनेक कारण हैं। उसमें एक प्रमुख कारण यह भी है कि हम मानवता को भूल गये, संस्कारों को भूल गये। मानवता, संस्कार पुस्तकों से नहीं आते, परंपरा से आते हैं। लालन-पालन से मिलते हैं, परिवार से मिलते है, परिवार में हम क्या सिखाते है उससे मिलते हैं।

त्या सहांपैकी एखादा तरी 'इंडिया'तून आलेला होता का? दिल्ली इंडियात आहे असे मानले तर हरयाणातून त्याआधी रोज येणार्‍या बलात्काराच्या बातम्या 'भारता'तून येत नव्हत्या का?

दीपांजली, you missed the whole point. पण आता विषय निघालाच आहे, म्ह्णून एक सांगतो. प्रश्न युधिष्ठीराचं चुक किंवा बरोबर हा नाहीये. त्याची कृती आणि सभेतल्या बाकी बघ्यांची कृती निर्विवाद पणे असमर्थनीय होती. पण म्हणून दु:शासनाचं वागणं समर्थनीय होऊ शकत नाही. शिवाय हे एक उदाहरण होतं...मुद्दा नाही.

मुळात मुद्दा मानसिकतेचा आहे. स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणारी ही मानसिकता कुठ्ल्याच पातळीवर समर्थनीय ठरत नाही.

<<गुन्हे परप्रांतियांमुळे वाढतात, हे अल्प उत्पन्न गटातील लोक झोपडपट्टीत वगैरे राहतात दारु वगैरे पितात आणि गुन्हे करतात व स्वराज्यात पळुन जातात. त्यांच्यावर कायद्याने बंधने आणल्यास गुन्हे कमी होतील. आता हे सर्व त्या असत्यबाबुला ठाऊक असेलच पण तो बोलणार नाही>>.

+ १००

गुन्ह्यचा संबंध शिक्षण पध्दतीशी लावण निव्वळ मुर्खपणा आहे,

अस असत तर पुर्वीच्या काळी गुन्हे घडलेच नसते, गुन्हे पुर्वीपासून होतच आहे फक्त ते उघडकीस येण्याचे प्रमाण आता वाढले आहे तो एक सामाजिक बदल आहे पुर्वीच्या काळी कित्येक वेळा सावकाराच्या कर्जासाठी अब्रु गहाण ठेवली गेली आहे या काळात पंचायतेसमोर जायचे धाडस कोणी करत नव्हते कारण आपलेच दात आपले च ओठ तक्रार केली तर आपले गावात राहणे अवघड होईल असा समज होता.

कॉन्हेंटचे शिक्षण असंस्कूत असते अस म्हणणे म्हणजे शिक्षण या शब्दाचाच गैर अर्थ घेतल्यासारखा होईल, शिक्षण म्हणजे अपेक्षित बदल वर्गामध्ये शिक्षण देताना सर्वांना सारखेच दिले जाते मग एखादा प्रशासकिय अधिकारी,एखादा व्यावसायिक किंवा एखादा गुन्हेगार होण्यामागे शिक्षणाचा संबंध कसा असू शकेल,

पुर्वीचे शिक्षक फार शहाणे होते आणि आताचे नाहीत असही अजिबात नाही उलट माझ्या मते पुर्वीचे शिक्षक उगाच अति शिस्तीचा बडगा उचलायचे ज्यामुळे काही विद्यार्थी शाळेत जायलाही घाबरायचे शाळेतील गळतीचे प्रमाण वाढण्यासाठी हे मुर्ख शिक्षकही तेवढेच जबाबदार आहे.

शाळेच्या माधमांनी माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही

@ रेव्ह्यु
सगळे बलात्कारी कॉन्वेंटशिक्षित आहेत बरं का काकू बाई!!!
पुर्ण असहमत (कॉन्हेंटमध्ये असले शिक्षण देले जाते का - काहीही काय)

Pages