मनातल्या मनात हे कुणी मला पुकारले?

Submitted by सतीश देवपूरकर on 26 December, 2012 - 23:50

(आमच्या रानफुले गझलसंग्रहातून)
समजून घ्यालच!

गझल
मनातल्या मनात हे कुणी मला पुकारले?
फिरून मोहरून अंग अंग हे शहारले!

लपेटुनी धुके, पहाट अंगणी उजाडली;
फुलाफुलात की, तुझेच स्वप्न हे दवारले?

तुझीच घेवुनी प्रभा, प्रभात रोज उगवते!
तुझ्यामुळेच हे वसंत एवढे फुशारले!!

मधेच ही झुळूक काय सांगते अशी अम्हा;
मनाचिया वनात पान पान का थरारले!

तिच्यासवे बराच काळ मी निवांत बोललो!
अजून आठवे न काय मी तिला विचारले?

बघून चित्र एवढी करू नकोस तू स्तुती;
तुझेच रंग घेवुनी तुलाच मी चितारले!

तुझी फुले, तुझीच बाग, हे वसंतही तुझे!
तरी स्वत:स तू उगाच का असे झुगारले?

जरा कुठे विसावण्यास थांबता तरूतळी;
डसावया अम्हावरी फणे कुणी उगारले?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chaan!

मनातल्या मनात हे कुणी मला पुकारले?
फिरून मोहरून अंग अंग हे शहारले!

लपेटुनी धुके, पहाट अंगणी उजाडली;
फुलाफुलात की, तुझेच स्वप्न हे दवारले?

तुझीच घेवुनी प्रभा, प्रभात रोज उगवते!
तुझ्यामुळेच हे वसंत एवढे फुशारले!!

मधेच ही झुळूक काय सांगते अशी अम्हा;
मनाचिया वनात पान पान का थरारले!

------------- हे सगळे सपाट शेर.

तिच्यासवे बराच काळ मी निवांत बोललो!
अजून आठवे न काय मी तिला विचारले?

------------- हा शेर चांगला आहे!

बघून चित्र एवढी करू नकोस तू स्तुती;
तुझेच रंग घेवुनी तुलाच मी चितारले!

तुझी फुले, तुझीच बाग, हे वसंतही तुझे!
तरी स्वत:स तू उगाच का असे झुगारले?

------------------ ठीक वाटले!

जरा कुठे विसावण्यास थांबता तरूतळी;
डसावया अम्हावरी फणे कुणी उगारले?

----------------- जाता जाता परत सपाटपणाच्या पूर्वपदावर...

के. गो.
धन्यवाद प्रांजळ प्रतिसादाबद्दल!
सपाट शेरांना उत्तुंग पर्याय द्याल काय?
वाचायला आवडेल!
खूपच जुनी गझल होती तशी मुद्दाम दिली!
आमच्या अगदी सुरवातीला गझलची तोंडओळख होता होता लिहिलेली गझल होती ती!
प्रा.सतीश देवपूरकर

सपाट शेरांना उत्तुंग पर्याय द्याल काय?
वाचायला आवडेल!
खूपच जुनी गझल होती तशी मुद्दाम दिली!
आमच्या अगदी सुरवातीला गझलची तोंडओळख होता होता लिहिलेली गझल होती ती!

----------- ह्या कशानेही भंकस गझल पाडणे जस्टिफाय होत नाही.... हे तुम्हाला कळत नाही, असे मला वाटत नाही आणि कळत असूनही तुम्ही असे वागत असाल तर गेट वेल सून सतीशराव.

प्रसाद् राव जाउद्या सोडा अता
काल्पासून मायबोलीवर काही वाचनीय गझला आल्या आहेत त्या वाचा ............तुम्हाला नक्कीच जास्त आनंद मिळेल इथे प्रतिसाद देत बसण्यापेक्षा तरी नक्कीच जास्त

शेवटी देवसराना काही सांगून काही म्हणजे काही उपयोग नाहीच आहे किनै??...... मग आपण आपला वेळ सत्कारणी लावा बघू .....सरांचा टाईम्पास करायला मी आहे ना इथे ?? Wink

के,गो.
मूळ मुदद्याला बगल देवून काही ठोस करायचे म्हटले की, चांगलीच धूम ठोकता की, राव तुम्ही! कमाल आहे बुवा!

मधेच ही झुळूक काय सांगते अशी अम्हा;
मनाचिया वनात पान पान का थरारले!<<<

अठराशे सालातल्या भावगीतासारखी गझल! एकीकडे म्हणायचे की गझलेचा सर्व डौल, तोल, नखरे, नाट्यमयता, सांकेतिकता, सूचकता, प्रासादिकता, कडेलोट, कलाटणी हे सांभाळून कामयाब शेर रचावा लागतो व हे म्हणे अनेक वर्षांच्या डोळस गझललेखनानंतर बनलेले मत आहे. आणि दुसरीकडे हे खालील शेर करायचे.

>>>मनातल्या मनात हे कुणी मला पुकारले?
फिरून मोहरून अंग अंग हे शहारले!<<<

नर्गीसच्या 'मेरा अंग अंग मुस्काया' या गीतात आणि या मतल्यात असा काय आशयगुणातील फरक आहे ज्यामुळे हा मतला (एक गझलतंत्र सोडले तर) गझलेचा भाव प्रदर्शीत करतो म्हणे?

या मतल्यात काय सूचकता आहे? कोणती सांकेतिकता यात लपली आहे? यात गझलेचा डौल, तोल, नखरे कसे काय आहेत? कडेलोट, कलाटणी, नाट्यमयता ही नेमकी कुठे आहे?

भाषणे देणे आणि 'बोले तैसा चाले' हे आचरणात आणणे यात फरक आहे. जग म्हणजे शिशुविहार नव्हे जेथे आपण कोणालाही शिकवू शकतो. येथे प्रश्न विचारले जातील, उत्तरे मिळाली नाहीत तर निव्वळ वाचाळवीराची बकबक बंद करण्यात येईल.

-'बेफिकीर'!

येथे प्रश्न विचारले जातील
वेडगळ, असंबद्ध व व्यक्तीद्वेषातून आलेल्या प्रश्नांची दखल घ्यायला आम्ही बांधील नाही!
कित्येक प्रतिसादात आम्ही तर निखळ प्रश्नांची मालिकाच आपणास दिली होती. काय झाले त्याचे?
ब-याच ठिकाणी आठवणही करून दिली होती! पलायनच केलेले दिसले!
बर बारकाईनेच समीक्षा करायची तर होवू द्याना कुणाच्याही गझलेची !
व्यक्ती पाहून प्रतिसाद देणे व सुमार शेराची दांभिक वाहवा करणे या प्राध्यापकाला तरी जमणे नाही!