चिदम्बर दीक्षित महागुरू स्वामीगळ : एक शिवयोगी

Submitted by Rutuja Acharya on 26 December, 2012 - 23:04

चिदम्बर दीक्षित महागुरू स्वामीगळ : एक शिवयोगी

कर्नाटकातील जामखिंडी जवळ मुरगोड केंगेरी नावाच्या गावी एक महान शिवयोगी चिदम्बर दीक्षित महागुरू स्वामीगळ यांचा मठ आहे . शिवयोग /सिद्धयोग आणि श्रीचक्र साधना यासाठी या महागुरूनी आपले जीवन वाहिले . त्यांचे वडील मार्तंड दीक्षित हे विद्वान पुराणिक /पूरोहित होते . लहानपणापासून चिदम्बर हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते .केवळ 8 वर्षे वयाचे असताना त्यांनी पहिला चमत्कार केला. हादगा –भोंडला व्रतच्या वेळी गजगौरी म्हणजे हत्तीच्या चित्राची रांगोळी काढतात ,चिदम्बर तिथे खेळत असताना त्यांनी गजगौरी व्रताच्या चित्राजवळ जावून प्राण-प्रतिष्ठा मंत्र म्हटला ,आणि आश्चर्य म्हणजे तो हत्ती सजीव होवून चालू लागला !

हे स्वामी वेद-विज्ञान आणि याज्ञिक पारंगत होते. त्यांनी आपल्या जीवन-काळात अनेक महायज्ञ केले .अक्कलकोटचे समर्थ स्वामी महाराज यांचे त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते . एकदा चिदम्बर स्वामींनी कोटीचंडी नावाचा महायज्ञ केला ,त्यावेळी अनेक महीने त्या व्रताचा एक भाग म्हणून रोज सुमारे 500 ते हजार लोकांना अन्नदान केले जाई . अशा वेळी एकदा तूप संपले म्हणून स्वामींनी शेजारून वाहणार्यार मलप्रभा नदीतून पानी भरून आणायला संगितले ,व आपल्या मंत्र-सामर्थ्याने त्या पाण्याचे तूप बनवले आणि वाढले! अशाच ब्राह्मण-भोजनाच्या वेळी एक जेवण करणारा आचारी आमटीच्या मोठ्या पातेल्यात पडला .गरम आमटीत पडून तो भाजून मेला ,असेच लोकांना वाटले ,परंतु स्वामींनी त्याला बाहेर काढून पाण्याने थंड आंघोळ घातली,आणि नंतर मंत्रसामर्थ्याने त्याला पुन्हा जिवंत केले .

शिवयोगी चिदम्बर स्वामींचे असे अनेक चमत्कार आहेत . त्यांच्या नामस्मरणाने अनेक लोकांचा उद्धार होतो.~शिवचिदंबर~ या महामंत्राचा जाप करून अनेक लोकांचे कल्याण झालेले आहे ,अशा या महागुरूंचा जयंती व रथोत्सव मार्गशीर्ष व पौष महिन्यात असतो.

चिदम्बर स्वामींनी शिवयोग आणि श्रीचक्र साधना याच गोष्टीची कास धरून आध्यात्मिक प्रवास केला, त्यांनी कोणतीही दीक्षा,साधना किंवा गुरूपरंपरा चालू केलेली नव्हती .आजही त्यांचे सातवे वंशज महागुरू हेच आहेत.त्याशिवाय अन्य कोणत्याही गुरु/शिष्य साधना त्यांनी स्वता: सुरू केलेल्या नाहीत .असे असतांनाही अनेक ढोंगी गुरु चिदम्बर दीक्षित यांचे नाव घेवून आम्ही सप्तशती—साधना /नवांर्ण मंत्र दीक्षा देतो असे सांगून शिश्यगण व सामान्य जनता यांची फसवणूक व दिशाभूल करीत असल्याचे उघडकीस आलेले आहे.

प्रत्यक्षात सदरचे ढोंगी गुरु हे वामाचारी आणि आसुरी शक्तींचे उपासक असून मूठ मारण/मोहन /वशीकरण/ भानामती/ सोनामती / केगामती/व्हुडू इत्यादि पाशवी कृत्ये करणारे आहेत.नवचंडी करून त्यात बळीचा बकरा म्हणून जीवंत माणसाचा प्रतिकात्मक बळी देण्याचा प्रघात या मंडलीनि रूढ केला आहे. आशा सर्व ढोंगी गुरुपासून सावध राहावे ही विनंती .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिदम्बर दीक्षित , सप्तशती—साधना /नवांर्ण मंत्र दीक्षा ...............

हे सारं ऐकल्यासारखं वाटतेय हो. माला वाटते याआधी चर्चा झालीये इथे अशा विषयावर.......पण संदर्भ लागत नाहीये बुवा.

आहो Rutuja Acharya | रमेश भिडे/(आणि कोण बरे? जे जे कोण माहितगार आहेत ते ) फारच भयानक आहे हे. तुम्हाला ह्या विषयाची जर माहिती आहे तर तुम्ही ताबडतोब पोलिसात गेले पाहिजे. आणि जर काय तुम्ही ती माहिती पोलिसांना दिली नाही तर माहिती दडवली याआधारे तुम्हालाच अटक होऊ शकते. त्यामुळे काय ते ठरवा बुवा आणि वेळीच सावध व्हा.

यांची फसवणूक व दिशाभूल करीत असल्याचे उघडकीस आलेले आहे. >>>>
म्हणजे विषय तुम्हाला माहित आहे. त्यामुळे तुम्हाला हा सर्व तपशील येथे किंवा पोलिसांना द्यावा लागेल.

अ‍ॅडमिन या धाग्यावर कृपया लक्ष ठेवा.

आहो मिस्टर आविनाश 1 ,तुम्ही कोण व कुठले ?

मी फक्त त्या संस्थान मध्ये मुरगोड ल नियमितपणे जात असते ,तिथे झालेल्या चर्चेत जे विषय निघाले ते इथे मांडले आहेत .
त्यात पॉलिसी कारवाई च प्रश्नच कुठ आला?

आहो मिस्टर आविनाश 1 ,तुमी चिदम्बर दीक्षित च भक्त आहात काय? की त्यांच्या नावाने दुकान चालवणारे कुणी गल्लाभरू?

तुमच्या नाकाला का एवेढ्या मिर्च्या झोंबल्या? खाई त्याला खवकवे म्हणतात तसे नाही ना तर तुमचे?

आहो बाई(!) तुमचीच भाषा मिरची झोंबल्यासारखी आहे. कोणीही सांगावे की माझी वाक्ये मिरच्या झोंबल्यासारखी आहेत का ते.
तुम्हीच मूठ, मारण/मोहन /वशीकरण/ भानामती/ सोनामती / केगामती/व्हुडू , पाशवी कृत्ये , बळीचा बकरा, जीवंत माणसाचा प्रतिकात्मक बळी, हे शब्द वापरलेले आहेत म्हणून मी म्हणालो की अंधश्रद्धानिर्मूलनाचा कायदा आता कठोर होत आहे त्यामुळे येथे लिहिण्याऐवजी पोलिसात तक्रार केलेली बरी. उद्या जर काही घडले आणि असा प्रकार तुम्हाला माहीत होता पण तुम्ही त्याविषयी पोलिसात सांगितले नाही असे आढळले तर उद्या तुमची पोलीस चौकशी होऊ शकते एवढेच मी म्हणालो. आता तुम्ही नकळत मुरगोड संस्थानाला येथे ओढलेले आहे. त्यामुळे कोणाचीही नावे घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करा एवढेच माझे म्हणणे आहे.

आशा सर्व ढोंगी गुरुपासून सावध राहावे ही विनंती......
??????????????

ऍडमिन आता येथे लोकांची नावे येऊ लागलेली आहेत. धागा सेंसिटीव्ह होत आहे तरी लक्ष असुद्या.

अरे व्वा ,इकडे पब्लिक फारच अॅक्टिव असल्याचे भासत आहे. मिस्टर 1 वैगेरे जे कोनी आहेत, ते फारच सेंसेटीव्ह झालेले दिसत्तात . अहो मुंबईला गेला नाही का कधी तुमी म्हणते मी?

तिथे सगळीकडे अशा मुठकरणी वाळया बाबांच्या जाहिराती लावलेल्या असतात. कुठे काय वाकडे केले तुमच्या अंधश्रद्धानिर्मूलनाचा कठोर कायदा ने ? ओ तुमाला काय एवडा फर्‍क पडतो कुणी बोलले म्हणून?

तुमचं काही लागेबांधा आहे का या मंडळीशी ? जे मूठ, मारण/मोहन /वशीकरण/ भानामती/ सोनामती / केगामती/व्हुडू , पाशवी कृत्ये , बळीचा बकरा, जीवंत माणसाचा प्रतिकात्मक बळी,इत्यादि काम करतात ?

उगाच एडमिन ना कशाला बोलवता जिथे तिथे? मी कोणाचेही नाव नाही घेतले आहे.

अरे व्वा ,इकडे पब्लिक म्हणजे तुम्ही कुठे आहात? परदेशात का? वा छान
उगाच एडमिन ना कशाला बोलवता जिथे तिथे? मागचा काही संदर्भ आहे का? असेल तर कृपया येथे द्यावा.
मी कोणाचेही नाव नाही घेतले आहे. उलट मी म्हणतो लोकांनी सावध राहावे म्हणून त्यांच्या भल्यासाठी जर हा धागा लिहीला असेल तर काय ते स्पष्ट लिहा म्हणजे तुम्ही म्हणता ते खरेच असेल तर लोकांना सावध तर राहाता येईल.

भानामती/ सोनामती / केगामती/व्हुडू

Proud

या धाग्यावर अजून ते मं . का. कसे आले नाहीत? Proud

मुंबईला ....सगळीकडे अशा मुठकरणी वाळया बाबांच्या जाहिराती लावलेल्या असतात. कुठे काय वाकडे केले तुमच्या अंधश्रद्धानिर्मूलनाचा कठोर कायदा ने ? ओ तुमाला काय एवडा फर्‍क पडतो कुणी बोलले म्हणून?

म्हणूनच म्हणतोय कोणाला काहीच फरक पडणार नसेल तर तुम्ही कशाला डोक्याला ताप करून घेता. आणखीन एकाची भर पडली म्हणायची आणि सोडून द्यायच. अन्यथा तुमच्या स्त्रीसुलभ हळव्या मनाला मूठ, मारण/मोहन /वशीकरण/ भानामती/ सोनामती / केगामती/व्हुडू , पाशवी कृत्ये , बळीचा बकरा, जीवंत माणसाचा प्रतिकात्मक बळी, असले शब्द नाही झेपायचे. रात्री दचकून जाग यायची.

या धाग्यावर अजून ते मं . का. कसे आले नाहीत>>>>>
ते साळसूदपणे येऊन प्रतिसाद देऊन गेले देखील ? तुमच्या कसं काय लक्षात आल नाही बुवा?

अरे देवा ........ धागा कुठला आणि हे लोक भांडतायत कशावरून?

रच्याकने ......हे मंका कोण बुवा?

Rutuja Acharya << ढोंगी गुरु हे वामाचारी आणि आसुरी शक्तींचे उपासक असून मूठ मारण/मोहन /वशीकरण/ भानामती/ सोनामती / केगामती/व्हुडू इत्यादि पाशवी कृत्ये करणारे आहेत.नवचंडी करून त्यात बळीचा बकरा म्हणून जीवंत माणसाचा प्रतिकात्मक बळी देण्याचा प्रघात या मंडलीनि रूढ केला आहे. आशा सर्व ढोंगी गुरुपासून सावध राहावे ही विनंती >> हे मात्र खरे आहे ..........

असलेच भोंदू बाबा बापू आजकाल बोकाळले आहेत , तिकडे एकजण तर बलातकर्‍यांना भैय्या म्हणायला शिकवतोय ............ आता चिपळूण च्या साहित्य सम्मेलनात देखील असले बाजारबुणगे आपली कर्मठ पोथीवादी पुस्तकांची बाडे विकायला येतीलच !

गायवासरू छाप गोमूत्र | 10 January, 2013 - 01:50
रच्याकने ......हे मंका कोण बुवा?

माझ्याकडे मंकाचे सर्व डिटेल्‌स आहेत, अगदी फोननंबर सकट. येथे टाकू का? हा फुटो नक्की आपलाच आहे ना? नाहीतर घोळ काहीतरी घालून ठेवाल? पण एकंदरीत मेक ओव्हर अगदी छान जमलेला आहे. नाव तर एकदमच फंडू जमलं आहे. पाहुया आता नवीन इनिंग कशी पडती ते. पण कोणीही यावं टिकली मारून जावं असं पूर्वीसारखे आता सोपे राहिलेले नाही.

अविनाश१ , तुम्ही कोण आता आणखी बुवा? चिपळूण च्या साहित्य सम्मेलनात आपली कर्मठ पोथीवादी पुस्तकांची बाडे विकायला येणारे बाजारबुणगे का?

गायवासरू छाप गोमूत्र | च्यावतीने तुम्ही बोलताय असे समजायचे का?
तस सांगा मग पुढची उत्तरे देतो

mag ratriaparatri chiplunla phone karun tras dyayach pap ka kelat?
Mandar yethe faltu charcha नको. लोकांना प्रतीसाद दिसला की तो उघडाला जातो आणी आपली वैयक्तिक चरचा पाहावी लागते. तू सेपरेट धागा काड मी तुला तुझ्या प्रश्नांचि सर्व उत्तरे तेथे जाहिरपने देतो.

ऋतुजा आचार्य मॅडम ,चुकताय तुम्ही . असे सगळ्याच गुरूंचे सैतानशी लागेबांधे असतात . ते सैतानाशी करार करून येतात आपला धंदा उघडण्यासाठी.

जो माझं ऐकेल ,मला पैसे देईल त्याला त्रास देवू नकोस,असा साधा सोपा करार असतो. त्याबदल्यात हे ढोंगी बाबा सैतानाला बळी म्हणून जीवंत माणसे देतात ,म्हणजे त्यांचा वध करीत नाहीत शब्दश: ,पण असे बळी चे बकरे सैतनाला अर्पण केले जातात व सैतानी शक्ति त्या बकर्‍याचे पुण्य ,एक्टोप्लाजम ,एनर्जी वगैरे खेचून घेते, त्यालाच energy vampire असे म्हणतात