मनाच्या गुदगुल्या

Submitted by ह.बा. on 26 December, 2012 - 22:49

..........................................................
..........................................................
मनाच्या गुदगुल्या

मनाच्या गुदगुल्या मोडून गेल्या हासणे सरले
जगाच्या अंगणी मग जीवनाचे प्रेत अंथरले

कितीदा तोल ढळलेला तरी संसार मी केला
जिचा ढळला पदर नाही तिने अलवार सावरले

गव्हाची लोंबती लोंबी म्हणाली जन्मदात्याला
भुकेशी भांडण्याआधीच माझे भावही ठरले?

तमाचे राज्य या मानू खरे मी का इथे जेव्हा
मराठीच्या नभावर सुर्य होउन संत वावरले

अशा करतो तशा करतो कश्या भन्नाट मी गझला
असे म्हणताच माझ्यासारखे पन्नास अवतरले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..!

<<अशा करतो तशा करतो कश्या भन्नाट मी गझला
असे म्हणताच माझ्यासारखे पन्नास अवतरले<<< सही!!! Happy

हबा... कित्ती दिवसांनी!

गव्हाची लोंबती लोंबी म्हणाली जन्मदात्याला
भुकेशी भांडण्याआधीच माझे भावही ठरले?....व्व्व्वा!

अशा करतो तशा करतो कश्या भन्नाट मी गझला
असे म्हणताच माझ्यासारखे पन्नास अवतरले...सहीय हा Happy

गव्हाची लोंबती लोंबी म्हणाली जन्मदात्याला
भुकेशी भांडण्याआधीच माझे भावही ठरले?

हा शेर अधिक भावला. छान.

धन्यवाद! विजयराव आणि डाँ. कैलासजी, मी परत आलोय हे सांगितल्याबद्दल आभार आणि गझलेबद्दल काहिच न सांगितल्याबद्दल मी आपला नेहमीप्रमाणे साशंक आहे!

चांगली गझल आहे हबा. आवडलीच...... या मधल्या काळात झालेल्या गझला पोस्ट कराव्यात ही ''णम्र'' विनंती.

णम्र Biggrin

''णम्र'' विनंती सुधारून >>>> मधल्या काळात झालेल्या गझला दमादमाने पोस्ट कराव्यात.

सांविधानिक इशारा(असेच असावे बहुदा)- उगाच स्पर्धा सुरू झाली तर आवरणे आमच्या हातात नाही.

हबा,

गझल छानच, लोंबी आणि अलवार हे शेर मस्त.

खरे म्हणजे 'हबा इज बॅक' असे म्हणताना फुगलेली छाती तुला दिसली नाही म्हणून गझलेबद्दल बोललो नाही असे वाटले असेल तुला. Happy

तमाचे राज्य या मानू खरे मी का इथे जेव्हा
मराठीच्या नभावर सुर्य होउन संत वावरले
>>>
छान !

अशा करतो तशा करतो कश्या भन्नाट मी गझला
असे म्हणताच माझ्यासारखे पन्नास अवतरले
>>>
ह्या शेरात किती पक्षी मारले आहेत ह्याचा हिशेब अजुन चालु आहे