Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 25 December, 2012 - 09:05
ना कधी वादात थोडा,काय झाले ?
वागलो वाह्यात थोडा, काय झाले?
ऐकल्या जेव्हा शिव्या अवघ्या युगाच्या,
बोललो रागात थोडा,काय झाले?
आसवांनी नाहलेली जिंदगानी
हासलो गालात थोडा, काय झाले?
बस्स झाली नागरीकरणे मनांची
राहिलो गावात थोडा, काय झाले?
जीवनाचा सूर तर 'भे'सूर आहे
नाचलो तालात थोडा,काय झाले?
हो,तसा ''कैलास'' तर नास्तीक आहे
दंगला गझलांत थोडा काय झाले?
-- डॉ.कैलास गायकवाड
टीप : मक्त्यात अलामतीची सूट घेतली आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली बोललो रागात... हा शेर
आवडली
बोललो रागात... हा शेर जास्त आवडला
हासलो गालात ....वरून माझा एक शेर आठवला
हासण्याचा मोह झालेली
आसवांची बाग होती ती
आसवांनी नाहलेली
आसवांनी नाहलेली जिंदगानी
हासलो गालात थोडा, काय झाले?
बस्स झाली नागरीकरणे मनांची
राहिलो गावात थोडा, काय झाले?
शेर आवडले!
ऐकल्या जेव्हा शिव्या अवघ्या
ऐकल्या जेव्हा शिव्या अवघ्या युगाच्या,
बोललो रागात थोडा,काय झाले?
आसवांनी नाहलेली जिंदगानी
हासलो गालात थोडा, काय झाले?<<<
छान
छान...
छान...
शिव्या आणि नागरीकरणे हे शेर
शिव्या आणि नागरीकरणे हे शेर मस्तच.
वाह
वाह
धन्यवाद मित्र हो.
धन्यवाद मित्र हो.
मस्तच !
मस्तच !
कैलास, बस्स झाली नागरीकरणे
कैलास,
बस्स झाली नागरीकरणे मनांची
राहिलो गावात थोडा, काय झाले?
हा शेर फार आवडला.
मस्तच गझल कैलासराव!
मस्तच गझल कैलासराव!