करू त्यासाठी काहीही

Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 25 December, 2012 - 04:20

व्यवहार आधी पहिला जातो, भावनांचे होईल काही ।
आधी त्यानेच मला हाय कारावे, चालेल जरी बोलला नाही ।।

भावना दोन्ही मनी सारखी, दृष्टीकोन माहित नाही ।
कुणी करी भावनिक व्यवहार, कुणी भावनांचा व्यवहार पाही ।।

का खेळावे कुणाचा मनाशी, जर आपणच तिथे राही ।
का चोळावे जखमेवर मीठ, त्रास होतो कळूनही ।।

मी पण ठरवले आहे आता, स्वतः हून काही बोलायचे नाही ।
खरच असेल कुणी आपले तर बोलावे त्याने पण काही ।।

ठेवावा थोडा विश्वास, बोलावे शब्द काही ।
ठेवनार विश्वास असेल कुणी तर करू त्यासाठी काहीही ।।

~ श्रीवल्लभ खंडाळीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभारी आहे

अनिल जी >>>>
टायपिंग त्रुटी सन्गाव्यात
पुधिल लेखनत कामि येतिल

मी पण ठरवले आहे आता, स्वतः हून काही बोलायचे नाही ।
खरच असेल कुणी आपले तर बोलावे त्याने पण काही ।।

सहमत..!

छान आहे. शेवटच्या पक्ती वाचून साई बाबाची वचने आठवली.
शिरडीस ज्याचे लागतील पाय | टळती अपाय सर्व त्याचे
माझ्या समाधीची पायरी चढेल | दु :ख हे हरेल सर्व त्याचे
जरी हे शरीर गेलो मी टाकून | तरी मी धावेन भक्त्तासाठी
नवसास माझी पावेल समाधी | धरा द्रुढ बुद्धी माझ्या ठायी
नित्य मी जिवत जाणा हेचि सत्य| नित्य घ्या प्रचिति अनुभवे
शरण माझे आला आणि वाया गेला| दाखवा दाखवा एसा कोणी
जो जो मज भजे जेशा जेशा भावे| तेसा तेसा पावे मीही त्यासी
तुमचा मी भार वाहीन सर्वथा| नव्हे हे अन्यथा वचन माझे
जाणा तेथे आहे सहाय्य सर्वास | मागे जेजे त्यास ते ते लाभे
माझा जो जाहला काया वाचा मनी | तयाचा मी रुणी सर्वकाळ
साई म्हणे तोची तोची झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायी
"ठेवणार विश्वास असेल कुणी, तर करू त्यासाठी काहीही " असेच बाबा सागतात.

जोशीजी आभारी आहे,
सीता,
मला वाटत आहे कि खूप उंचावर तुम्ही मला ठेवलेले आहे, आभारी आहे. पण हि कविता अगदी सहज आलेली आहे, कदाचित बोलविता परमेश्वरच आहे