आम्ही का नको?

Submitted by मोहन वैद्य on 23 December, 2012 - 01:29

सफरचंदाचे खाणे डॉक्टरे केले शहाणे
पेरू चिकू काय कोणी कधी खाणेचि ना?

मधुबालाचे हसणे जग झाले दिवाणे
नूतन माधुरीने काय कधी हसावेचि ना?

वैजयंतीचे चालणे, तेच म्हणे ठुमकणे
टुन टुन ने काय मग चालावेचि ना?

किशोर रफीचे गाणे धुंदीचे तराणे
आम्ही काय न्हाणीत गायचेही ना?

सूर्याची किरणे म्हणजे डोळ्यांचे दिपणे
तिचे हसून पाहणे, आम्ही काय दिपावेचि ना?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users