पाकी मंत्री लाथांचा गोड प्रसाद देऊन गेला त्या संदर्भात

Submitted by शशिकांत ओक on 19 December, 2012 - 13:12

गर्दभ लीला!
एक जंगल होते. त्यातील एका भागात गाढवाचं राज्य होते. इतर अन्य भागात राहात. गर्दभांच्या राज्याची आपापसातील गोष्टी सोडवतानाची रीत नेहमीच खिंकाळण्याची व हमरीतुमरीवर येण्याची असे. एकदा अन्य रानातून गर्दभाच्या राज्याच्या महत्वाच्या व्यक्तीस पाहुणचारला बोलावले गेले. त्या गर्दभांनी प्रवेश करताच आपली गाऱ्हाणी गाऊन इतरांना उपदेश केले की चर्चेचा घोळ न घालता, आपापसातील समस्या गायन-नर्तनाच्या, क्रीडांगणातून कशा सुटतात असे आळवून सांगितले. ते ऐकून इतरांनी करतल रव करून 'अहो रूपम् - अहो ध्वनिम्, वाहवा म्हणुन प्रशंसोद्गार काढले. त्यामुळे अत्योल्लासाने शेफारून गर्दभराजांनी उपस्थितांच्या पार्श्वभागास लत्ता प्रहारांनी यथेच्छ लाली लाल केले. पण निमंत्रित मान्यवरांना खडसावायचे कसे अशी सभ्यता आड येऊन, तोंडावर संभावित हास्य व पार्श्वभूमीवर लत्ताप्रहारांच्या कळा दाबून पुन्हा क्रिडास्पर्धाचे निमंत्रण देऊन आपला पाहुणचार संपन्न केला व मिणमिणणारे दिवे हाती धरून विदा केले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गदर्भ असा योग्य शब्द आहे का ? मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतरांच्या खाजगी बाबतीत भोचकपणा करू नये असं वाटतंय. शुभेच्छा !

लिंबुटिंबू
माझ्या पोष्टी नीट न वाचणारेही तुम्ही पहिले, एकटे आणि शेवटचे नाहीत Proud असो. तुमची वकिली मी केलेली नाही ही पोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न (?) केल्यास लक्षात येईल Lol

ज्यांनी या लाथा खाल्ल्या त्यांना त्या खाण्याची आवड फार फार जुनी आहे. त्यामुळे त्यांनी यांना लाथा दिल्या नाहीत तर ते स्वखर्चाने तिकडे जाण्याची पराकाष्ठा करतील आणि त्यांचा तो गोड, लजीज प्रसाद खाऊन तृप्त होऊन येतील.