काय करायला पाहिजे मुलीनी?

Submitted by छोटी on 19 December, 2012 - 00:03

कालची बातमी वाचली असेल सगळ्यांनी, "धावत्या बसमध्ये युवतीवर बलात्कार"... काय वाटलं... परत एकदा राग उफाळून वर आला ना आणि नेहमी सारखा उतू गेला का?.... फाशी झाली पाहिजे त्या गुन्हेगारांना,त्यांना रस्त्यावर मारलं पाहिजे अस केल पाहिजे... तस केल पाहिजे..ह्याहून-त्याहून खूप सारे सल्ले आणि नंतर म्हणजे दुसर्या क्षणाला 'यार टीम इंडिया नेहमीच का हरतो','तू तुझ्या आई वडलांना एवढ् महत्व का देतेस','आपला बंटी तुझ्यामुळे बिघडला' ह्या सारख्या मोठ्या प्रश्नावर लक्ष द्याला सुरुवात केली असेल नक्कीच(नेहमीप्रमाणे ).....
कारण ती मुलगी आपली कोणीच नाही आहे ना... त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही रोजच्या आयुष्यात. हो ना... पण मला भीती वाटते, अगदी रोज... तिच्या जागी मी असती तर... आज संध्याकाळी घरी जाताना मी घरी पोहचेन ना.... खरच बातमी वाचताना मनात येत होत बाई ग,सुखाने मरून जा...जगलीस तर त्या रात्री भोगलास ना त्यापेक्षा हजारपट जास्त दुख तुझ्या समोर वाढून ठेवली असती...कोर्ट कचेरी ...तो घटला..न्याय मिळाला तरीही तुझ्या आयुष्याच काय..हि "शेवटी आगीजवळ गेल्यावर लोणी वितळणार" मानसिकतेची लोक तुला माफ करतील... जरी तू त्यांच्याकडे माफी मागायला नाही जाणार तरीहि ...
काय करायला पाहिजे मुलीनी? घरात बसून घरातले अत्याचार सहन केले पाहिजे? आपल्या शिक्षणाचं, आपल्या प्रतिभेचं लोणचं घालायला पाहिजे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users