काय तो वदणार मजला पाठ आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 18 December, 2012 - 11:35

गझल
काय तो वदणार मजला पाठ आहे!
बिनकण्याचा तो....तरीही ताठ आहे!!

मी असा दिसतो, नको जाऊस त्यावर........
जाण तू पडली कुणाशी गाठ आहे!

बोलणे अगदी मऊ, लोण्याप्रमाणे!
मात्र करताना कृती तो राठ आहे!!

ही न ओहोटी नवी, नवखी न भरती......
तू मना सागर! तुझा मी काठ आहे!

केवढा हा गर्व बुद्धीचा म्हणावा!
हा म्हणे मतिमंद....तो तर माठ आहे!!

दांडगाई, माज, मस्ती केवढी ही....
पोलिसी वेषातला तो लाठ आहे!

काय रेड्याचा तरी उपयोग येथे?
म्हैसही प्रत्येक इथली वाठ आहे!

चाखल्यावरतीच फळ, समजेल गोडी!
मी हपूसाचीच अस्सल बाठ आहे!!

काम, नुसते काम, तेही बेहिशोबी....
याद कोठे राहते वय साठ आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हा' 'तो' अशी संबोधने एकाच गझलेत वारंवार आल्यामुळे सलग वाचताना रसभंग होतो आहे असे फक्त मलाच वाटत असावे. असो.

गझल एकंदरीत छान.

या गझलेत मात्र काफियानुसारीत्व अनैसर्गीकरीत्या अधिक जाणवल्यासारखे वाटले. क्षमस्व!

=)) =))

कसल्या दणकून हगल्या हे आपल हजला /गझला होतात हो तुम्हाला

कुठलं चूर्ण घेता , जरा प्रमाण कमी करा , दिहाय्द्रेषण होईल .

--प्रा. बन्या शैतान पुर्र्रर्र कर


बिनकण्याचा तो....तरीही ताठ आहे!!

"बिनकण्याचा ताठ" ह्म्म्म हॅ हॅ

अगदी मऊ, लोण्याप्रमाणे!
मात्र करताना कृती तो राठ आहे!!

हॅ हॅ अगदी अगदी Lol

काठ -माठ -लाठ - वाठ - साठ

वा वा, काय यमक जुळवली आहेत , असाच अभ्यास करा

चाखल्यावरतीच फळ, समजेल गोडी!
मी हपूसाचीच अस्सल बाठ आहे!!

खि खि
असोच
-- बन्या कोन्द्के

च् च् च् च् !!

किती ठरवलं नाही अभिप्राय द्यायचा नाही तरी, तुम्ही लिहायलाच लावलंत!

वृत्त चालवा .. काफिये-रदीफ पाळा... पाडा गझल..!

काही लिखाणात दम असो वा नसो... कैच्याकै.. गझलची इतकी वाताहात पाहिली नाही कधी.

चालू द्या.... तुम्हाला 'होत' असतील तर काय करणार !

अविकुमार!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
गझलेतील 'हा' 'तो' यांना वेगवेगळे संदर्भ असू शकतात/असतात.
प्रत्येक शेर वेगळी कविता असते!
बहुधा आपण वेगवेगळ्या शेरांची सांगड घालत असावेत, म्हणून रसभंग वाटत असावा!
काही चुकीचे असल्यास क्षमस्व!
प्रा.सतीश देवपूरकर

भूषणराव!
या गझलेत मात्र काफियानुसारीत्व अनैसर्गीकरीत्या अधिक जाणवल्यासारखे वाटले.
<<<<<<<<
या गझलेतील काफिये (काही) दुर्मिळ वापरातील असल्याने असे वाटत आहे काय?
की, शेरात काही खटकते आहे? असल्यास बदल सुचवाल काय?
टीप: टकारान्ती व ठकारान्ती काफिये कानास गोड लागत नाहीत. त्यामुळे आम्ही देखिल असे काफिये टाळतो!
पण काल कोण जाणे कसे पण ही गझल झपाटल्यासारखी लिहून झाली!
काही चुकले असल्यास क्षमस्व!
काही काफियांचे अर्थ द्यायला हवेत काय?
प्रा.सतीश देवपूरकर

के.गो.
किती ठरवलं नाही अभिप्राय द्यायचा नाही तरी, तुम्ही लिहायलाच लावलंत!
जय/पराजय......आपला की आमचा?
वृत्त चालवा .. काफिये-रदीफ पाळा...<<<<<<हे प्रत्येक गझलकाराला करावेच लागते!
ते मान्य नसणा-यांनी भावगीते, मुक्तछंद वगैरे लिहावेत!
पाडा गझल..! <<<<<<<आगंतुक सल्ल्याबद्दल धन्यवाद!
आपला लेखनउजेड पडू द्या मग गझल पाडण्याचे पुढे पाहू या!
काही लिखाणात दम असो वा नसो...<<<<<<<
हल्ली डासही तोफ रणगाड्यांची भाषा करू लागले तर!
कैच्याकै..<<<<<<पसंद अपनी अपनी! प्रत्येकाला आवडणे/नावडणे.....याचा अधिकार असतोच!
आम्ही त्याचा आदर करतो!
गझलची इतकी वाताहात पाहिली नाही कधी.<<<<<<चष्मा लागलेला दिसतोय, लावत जा की तो जरा!
चालू द्या....<<<<<<
आपल्या म्हणण्यावर चालायला जग थोडेच चावीचे खेळणे असते?
तुम्हाला 'होत' असतील तर काय करणार !<<<<<<<
आपणास काय होत आहे ते पहावे माणसाने!
आपल्या साहित्यिक भाषेत बोलायचे झाल्यास १ पाडलेला/पडलेला शेर (वातहतीवरून आठवल्यामुळे) देत आहे............

ही घडी बसण्यास सारी जाळली मी जिंदगानी.....
पापणी लवते न लवते तोच वाताहात होते!

............प्रा.सतीश देवपूरकर