जलपरी.... ज्वलंत विषयाचे सुंदर सादरीकरण

Submitted by मी कल्याणी on 18 December, 2012 - 05:32

मध्यंतरी 'जलपरी' हा लघुपट बघितला.. मनापासुन आवड्ला.. आजही भारतात मोठ्या प्रमाणावर स्त्रीभ्रुण हत्या होत आहेत.केवळ जन्माआधी मारूनच नाही, तर अत्यंत निर्दयीपणे म्रुत गर्भाची विल्हेवाट लावून.. जगलीच तरी स्त्रीचा मुलगी, आई, पत्नी या सर्वच रूपात अपमान करणे , म्हणजे देखील एका प्रकारे स्त्रीत्वाची हत्याच नाही का??

डॉ. देव (प्रवीण दबास), त्याची आई (सुहासिनी मुळे ) आणि मुलं श्रेया (लहर खान) व सॅम (क्रिशांश त्रीपाठी) राजस्थानातील एका मागास खेड्यात जातात. सुट्टी घालवण्याशिवाय त्या खेड्यात आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ दवाखाना बांधण्याचा देव चा मानस असतो..
गावात पाण्याची टंचाई असते. पाण्याचा एकुलता एक स्त्रोत -तळं चेटकिणीने झपाटल आहे आणि ती मुलींना अन तळ्याकडे जाणार्‍याना मारून टाकते, अशी गावकर्‍यांची धारणा असल्याने त्याकडे कोणी फिरकत नसतं.
श्रेया अन सॅम.. देव ची धीट अन हुशार लेकरं!! श्रेया टिपीकल टॉमबॉय असुन तिला पोहायची प्रचंड आवड!! त्यामुळे ती तळ्याकडे जायला उत्सुक असते..पण तिच्या आजी आणि बाबांचा य गोष्तीला विरोध असतो... का????? श्रेया तळ्याकडे जाते का? तिचा चेटकिणीशी सामना होतो का??? हे सर्व चित्रपट पाहून कळेलच..

आवर्जुन पहावी अशी कलाक्रुती... ज्या मातीत मुलीची देवी म्हणुन पूजा करतात त्याच मातीत तिला केवळ ती एक स्त्री म्हणुन मारुनही टाकतात.. हा विरोधाभास दिग्दर्शिका नीला पंडा यांनी समर्थ्पणे दाखवला आहे..
शबरी आणि बॉक्सर या व्यक्तीरेखाही कथानकाचा प्रभाव वाढवतात...
सर्वच कलाकारांचा अभिनय संयत अन उत्तम आहे.. लहर अन क्रिशांश तर बेश्टच!!!!!!!!!
सामाजिक विषय असुनही मांड्णी अत्यंत आकर्षक आहे.. नक्की बघा!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users