दुर्गवीर - वारस सह्याद्रीच्या गडदुर्गाचा

Submitted by मी दुर्गवीर on 17 December, 2012 - 11:02

दुर्गवीर म्हंटल कि गडकोट आणि गडकोट म्हंटल कि दुर्गवीर कारण हा दुर्गवीर आहे वारस गडदुर्गांचा!
दुर्गवीर हि संस्था नाही, हा आमचा परिवार आहे, गडकोटांच्या आजच्या अवस्थेला बघून ज्याचं काळीज पिळवटत अशा सर्व शिवभक्तांसाठी, माय मराठीच्या पूतांसाठी, महाराष्ट्राच्या वाघरांसाठी, गडकोट पुन्हा पूर्वीच्या वैभवात उभे करायचे स्वप्न घेऊन एकत्र येणाऱ्या प्रत्येकाचे हे कुटुंब आहे. दुर्गसंवर्धनाचा कठीण वसा हाती घेऊन उभा ठाकलाय दुर्गवीर! शिवशम्भूच्या चरणांशी शपथ वाहतोय दुर्गवीर
"हे राजे, आपण आपल स्वराज्य घडवलत ज्या गडकोटांच्या बळावर, आपण पांच क्रूर शाह्यांशी टक्कर दिलीत ज्या बळावर, त्या गडकोटांची आजची अवस्था बघून आमच काळीज तुटत. आपल्या चरणांशी आम्ही शपथ घेतो कि पुन्हा एकदा ह्या गडदुर्गाना जुने वैभव दाखवून देण्याचा, आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यानसाठी हा अमुल्य वारसा जपण्याचा वसा आम्ही प्राणपणाने पाळू.
हि साक्ष दुर्गवीरांची
लावू बाजी आम्ही प्राणांची
पुन्हा चमकवू गगनी
शान ह्या गडकोटांची ||"

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users