हृदयाची मशाल केली...घनदाट किती तम आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 17 December, 2012 - 08:40

गझल
हृदयाची मशाल केली...घनदाट किती तम आहे!
डोक्यावर मुळात माझ्या जगण्याची जोखम आहे!!

बेरीज, वजाबाक्यांची आकडेमोड ना केली.....
उरल्यासुरल्या श्वासांची मजपाशी रक्कम आहे!

टोळधाड पडते मजवर त्या अंबट शौकीनांची!
त्यांची न चूक काहीही....मी जात्या कोकम आहे!!

काळीज काढुनी माझे ठेवतो समोरी त्यांच्या....
बोलणे- वागणे ज्यांचे माझ्याशी मोघम आहे!

प्रत्येक मैफिलीमध्ये भरतोच रंग हा माझा!
मी आसपासही नाही, पण, माझा घमघम आहे!!

मज श्वास तरी घेवू दे....मग विचार तू काहीही!
वय उतार झालेला अन् थकलेला मी दम आहे!!

हातांची उशी,नभाचे पांघरूण करतो आम्ही!
अंथरण्यासाठी अवघ्या धरणीचे जाजम आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यावर तुटून पडती शौकीन अंबटाचे!
त्यांची न चूक काहीही....मी जात्या कोकम आहे!

वृत्त गंडले आहे प्रोफेसर.

मज श्वास तरी घेवू दे....मग विचार तू काहीही!
वय उतार झालेला अन् थकलेला मी दम आहे!!.......... यथार्थ शेर

धन्यवाद, कावळेराव!
धांदलीत मात्रादोष राहून गेला. निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे!
ताबडतोब दुरुस्ती करत आहे.

.........प्रा.सतीश देवपूरकर

धन्यवाद, कावळेराव!
धांदलीत मात्रादोष राहून गेला. निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे!
ताबडतोब दुरुस्ती करत आहे.

.........प्रा.सतीश देवपूरकर

काळीज काढुनी माझे ठेवतो समोरी त्यांच्या....
बोलणे- वागणे ज्यांचे माझ्याशी मोघम आहे! <<< वा, आवडला शेर!

प्रत्येक मैफिलीमध्ये भरतोच रंग हा माझा!
मी आसपासही नाही, पण, माझा घमघम आहे!!<<< दोन्ही ओळी स्वतंत्रपणे अधिक आवडल्या

मज श्वास तरी घेवू दे....मग विचार तू काहीही!
वय उतार झालेला अन् थकलेला मी दम आहे!!<<< पहिली ओळ मस्तच, शेर छान!

धन्यवाद!

धन्यवाद भूषणराव!
अवांतर.....
कोल्हापूर काय म्हणतय?