चतकोर

Submitted by कौतुक शिरोडकर on 17 December, 2012 - 06:49

अताशा अमावस्या दररोज येते
उंबर्‍यावरील चांदण्या हटकून नेते
जेव्हा एखादी पणती
सुर्य होऊन जळते
हमखास तुझी आठवण
काळीज कापून घेते
स्वप्ने मात्र अजुनही
दारं खिडक्या वाजवून जातात
कालचे रातकिडे नव्याने
मनात किरकिर करू लागतात
रात्रीचं वय झालं
की आसमंत निथळू लागतो
मी हाताच्या मुठी
तेव्हा घट्ट आवळून झोपतो
न जाणो कोणत्या क्षणी
चंद्र निसटून जायचा
चतकोर कवडसाही
अंधार पिऊन निजायचा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह

आवडली

गुलजारच्या कवितेसारखी वाटली कविता, शब्दप्रधान, अर्थपूर्ण, तसाच दर्द! आणि प्रत्येक वाचनात अनेक नव्या अर्थांचे पदर उलगडत जाणारी...
मस्त.

सुंदर !