शहराभिमान!!!

Submitted by मी मधुरा on 14 December, 2012 - 06:49

मायबोलीकरांनो, जसे पुण्या बद्दल पेशवाई, शनिवार वाडा, तुळशीबाग, सारसबाग.....अशी अनेक वैशिष्ट्य सांगता येतात, किव्हा मुंबईबद्दल समुद्रकिनारा, मुख्य शहर, वेगवान दिनक्रम , शुटींग स्पॉट अशी अनेक वैशिष्ट्य सांगता येतात..... काय मग पिंपरी-चिंचवड करांनो,काय वैशिष्ठ सांगता येईल आपल्या शहराची ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंधुनो,पुणे आणि पिंपरी शहर हि वेगवेगळी गणली जातात रे........
आणि वैशिष्ट्य म्हणजे औद्योगिक शहर म्हणून ओळखल जात आपल शहर !!!

शहरातली दळभद्री तुम्ही, खुराड्यात जिंदगी जाती तुमची. चायला गचपनात जगायची सवय लागलीय तुम्हाला ,पन्नास लाखाच्या 1BHK खुराड्याची स्वप्ने बघणारे तुम्ही, तुम्हाला आमची खेड्यातली भव्यता काय कळणार...

शहरातली दळभद्री तुम्ही, खुराड्यात जिंदगी जाती तुमची. चायला गचपनात जगायची सवय लागलीय तुम्हाला ,पन्नास लाखाच्या 1BHK खुराड्याची स्वप्ने बघणारे तुम्ही, तुम्हाला आमची खेड्यातली भव्यता काय कळणार...

Mind your language Mr. प्रोफेसर ऑफ डुआयलॉजी. तुमच्या सारख्या लोकांमुळेच खेड्यातल्या लोकांच नाव खराब होत. आमच्या नावाने बोंब मारत बसा जन्मभर.....आम्ही चंद्रावर पोचलो आणि तुम्ही बसा 'चंदामामा, चंदामामा रुसलास का ' करत......तीच खरी लायकी आहे तुमची!!!!

गणराया पहिले वंदन. पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड्च्या मंगलमुर्तीला वंदन केल्याशिवाय या धाग्याला सुरवात कशी होणार ?

५०० वर्षे जुने स्थान महासाधु मोरया गोसावींच्या तपश्चर्येने पुनीत झाले आहे.

.....आम्ही चंद्रावर पोचलो आणि तुम्ही बसा 'चंदामामा, चंदामामा रुसलास का ' करत......तीचखरी लायकी आहे तुमची!!!!>>>>>ओहो, तुम्ही नील आर्मस्ट्रॉंगच्या नात्यातल्या आहात तर ,बर बरं चालु द्या, बाकि तुमचा खुराडा काय म्हणतोय?

फालतू पोस्टींकडे दुर्लक्ष करून अजुन ठिकाणं सांगा
मला वाटतं तुळापूर पण जवळच पडत असेल ना पिंचीला?
एक दिवसात बाईकवर फिरून होईल अस काय आहे पिंची किंवा पुण्यात?
सिंहगड सांगू नका प्लिज

मोरया गोसावी, वाड्यातला

मोरया गोसावी, वाड्यातला गणपती, मिटर नसलेल्या रिक्षा, भरपूर बागा(ग्रिन झोन), भक्तीशक्तीचे अप्रतीम शिल्प कितीतरी आहेत वैशिष्ठ्य

रिया बाइकवरुन सकाळी निघुन संध्याकाळपर्यंत परतायचे असेल तर बरीच ठिकाणे आहेत. खरे सांगतेय मी. कारण आम्ही सकाळी निघुन पुण्याजवळ हडशी येथे दुपारी १२ वाजता पोहोचलो. तिथले सत्यसाईबाबांचे मंदिर आणी विठ्ठल मंदिर मस्त आणी स्वच्छ.

. मंदिर काय पहाणार असे नका म्हणू, पण निसर्ग सौंदर्य रमणीय आहे. जवळ मस्त हॉटेल. चहा, नाश्त्याची सोय.

तिथुन खाली लवासाला जाऊ शकता. प्रवास विभागात हडशीचा मार्ग सापडेल. जवळ मुळशी तलाव. नंतर पुण्याजवळ भाटेघर धरण, महाड वगैरे आहेच.

बाकी जाणकार भर टाकु शकतील. बाकी माहिती आठवेल तशी टाकेनच.

चिमुरी, हडशीचे मंदिर आणि सोमाटणे फाट्याजवळचं प्रतिशिर्डी वेगवेगळ आहे.
सोमाटणे फाट्याचा मोठा गणपतीही पहाण्यासारखा आहे.

पण हे सगळ शहरा बाहेरच झालं. तस बरच आहे आसपास.

चिमुरी, हडशीचे मंदिर आणि सोमाटणे फाट्याजवळचं प्रतिशिर्डी वेगवेगळ आहे.>>>>> हे माहित आहे.. पण सोमाटणे फाट्याजवळ जे मंदीर आहे तेच प्रतिशिर्डी ना असं विचारायचं होतं मला Happy

हाडशी, प्रतिशिर्डी आणि प्रतिबालाजी आम्हालाच पकले असतील आता Proud
इतक्यांना जाऊन झालय Happy
पण लावासा चालेल
कस आहे?

लवासा छान आहे असं ऐकलय,
बनेश्वर, निळकंठेश्वर ट्राय करा.
हडशीच्या पुढेच दुधीवरेखिंडीत सातारकरांचे प्रती पंढरपुर आहे.
नुकतेच हार्पेन ने सासवडचे फोटो टाकले होते.
http://www.maayboli.com/node/39349

बनेश्वर करायचा विचार आहे
पण आता हिवाळ्यात जाण्यासारखं आहे का ते ठिकाण?
सध्या लावासा, बनेश्वर ही दोन ठिकाणं लिस्ट वर आहेत

@रिया:
लव्हासा खरच छान ठिकाण आहे.......मी जाऊन आली आहे. उंच डोंगरावर गेल न कि, आकाशात ढगांमध्ये असल्याचा अनुभव येतो. खूप मस्त.....स्वर्ग सुख म्हणाल न तरी चालेल. So, एकदा तरी नक्की जाऊन ये. Happy

नितीन तुम्हीच पिंची ची ठिकाणे लिहा. आम्ही पूणेकर एवढे कसे खोलात सांगणार? Sad

ते लिंबुटिंबु कुट्ट गेले? पिंची चे हायेत ना त्ये? त्येन्ला इच्चारा आता.:फिदी:

एच डी एफ सी कॉलनीच्या बाजूच्या खाणी पक्षांसाठी डेव्हलप केल्या होत्या. आता काय परिस्थिती आहे त्यांची?

जो एस तुम्ही बर्ड वॅली बद्दल बोलताय का?
तस असेल तर तिकडे नको त्या बर्ड्सच प्रमाणच वाढलय
ओरिजनल बर्ड्स दिसतच नाहीत आता

एक वर्ष पुण्यात राहिली मी तेव्हा पिंपरी चिंचवड- चाफेकर चौक यात भागात आणि नंतर निगडीत राहायची
खूप सुंदर शहर, रस्ते..... प्राधिकरण तर खूपच छान ...फक्त एकच समस्या ......... मध्य पुणे ला जायचे असेल तर बस ने प्रवास करणे म्हणजे एक भयानक काम.
एकदा मी निगडी स्टॉप वर कोथरूड बस ची वाट पाहत होती.... २ तास बस नाही शेवटी गेलीच नाही
पण ज्यांकडे स्वतःची गाडी आहे त्यासाठी पिंपरी चिंचवड उत्तम

सध्या मोरया गोसावी मंदिराशेजारी उत्तम बाग/ उद्यान तयार केले आहे. Happy

हो, जिजाऊ उद्यान ना ! Happy मागे एका साखरपुड्या निमीत्त आले होते तेव्हा रिक्षातुन जातांना दिसले. प्रवेशद्वार तरी भव्य आहे. मुलांना खेळायला सोयी आहेत ना? म्हणजे वन डे ट्रिप निश्चीत होईल.

मुलांना खेळायला सोयी आहेत ना? >>>>> हो, आहेत ना. व्यायामाची साधने पण आहेत आणि फिरायला, बसायलाही छान आहे.

कडेला खाऊगल्ली सारखेही आहे. Happy

________
पण तिकडचे सार्वजनिक शौचालय चुकूनही वापरू नका आणि वापरू देऊ नका. ( वन डे ट्रीप म्हणालात म्हणून सांगितले.) फार अस्वच्छ असते ते.

ही बाग आहे तिथे पूर्वी पवनेचे कोरडे पात्र होते. त्याला लागून सुखकर्ता अपार्टमेंट (चिंचवडातली  बरीच जुनी हौसिंग सोसायटी). शेजारीच मोठी बाग. बाग समतल नाहीये काही भाग खाली आहे ज्याला आम्ही खालची बाग म्हणत असू आणि ह्या बागेतून कसरत करून डायरेक्ट मोरया मंदिरात उतरता यायचे. जो भाग वर होता त्याला वरची बाग किंवा फरशीची बाग म्हणत कारण इथे शहाबादी फरशी घातली होती ह्या वरच्या बागेला लागून एक बुरुज होता आणि त्या बुरुजावरून खाली उतरलं कि आज ही नवीन बाग केली आहे तिथे पोचत असू. तिथे अबोलीची खूप झाडी होती. 

तुम्ही जी खाऊ गल्ली म्हणत आहात तिथे फक्त २-३ भेळ, आईस्क्रीमच्या गाड्या लागत. कॉर्नरला रबडे फॅमिलीचा अत्रिकुल बंगला आहे. त्याला लागून बावळ्यांचा वाडा, मग भारडीया बिल्डिंग, मग आमचा पुरंदरे वाडा, मग गोविंद रबडेंचा वाडा, मग हिरवे /गुरवांचा वाडा (ह्या वाड्याला लागून डॉ. श्री श्री घारेंच क्लिनिक होतं आणि इथेच ठाकूर मामा राहत, जे मोठे ज्योतिषी होते) आणि शेवटी अविस्मृती चाळ. हे वाडे बर्यापैकी उंचीवर आहेत/ होते कारण समोरच पवना नदी आहे. कितीही पूर आला तरी फारतर २-३ पायर्या पाणी येई (१९८९ च्या पुराच्या वेळी ४ पायऱ्या पाणी आले होते). ह्या भेळगाड्यांच्या इथे २ चिंचेची मोठी झाडे होती आणि त्याना चांगला मोठा पार पण होता. नंतर ही झाडे पाडली.

फार सुंदर गाव होत चिंचवड.     

लहानपणीच्या आठवणी रम्य असतातच. त्याला मोठेपणी व्यवहाराची झालर लागते आणि मग गेले ते दिन गेले ची हळहळ सुरू होते.

मी जुने चिंचवड न बघितल्याने माझ्याकडे या आठवणी नाहीत. पण जिथे माझे बालपण गेले, तिथेही आज झालेले बदल मलाही पचतच नाहीत. त्यामुळे आठवणी छान आहेत असे म्हणत पुढे जायचे. त्या तशाच राहणार नाहीतच.

चिंचवड मध्ये आत्ता म्हणाल तर सुंदर राम मंदिर आहे, मंगलमूर्ती वाड्यातलं मोरया मंदीर आहे. जिजाऊ उद्यान, श्रीधरनगर ची बाग, दत्त मंदीर, केजुदेवी उद्यान, दुर्गा टेकडी, भक्ती शक्ती उद्यान हे सगळे आहेच. पण मला जे प्रेम वाटते ते अशासाठी की चिंचवड अजूनही गाव वाटते, त्याचा पिंपरी कॅम्प झाला नाही अजून. मला पिंपरी मात्र अजूनही अनोळखीच वाटते. मेन रोड ची दुकाने फक्त ओळखीची आणि फूल आणि भाजी मार्केट असलेला शगुन चौक आवडीचा.

म्हणजे जे लहानपणी पाहिले आहे, जसे ते तेन्व्हा होते तसे आता खचितच नाही.>>>>>> अगदी अगदी! आमच्या एका नातलगांकडे येत असू, त्यावेळचे चिं.स्टेशन एकदम झकास होते.बरीच चिंचेची आणि इतर झाडे होती.समोर पेरूची बाग होती.कालौघात बरेच बदल झालेत.पूर्वी टेल्को,मोरया गोसावीला जाईपर्यंत शांत्,निवांत असायचे.आता अपरिहार्य बदल झाले आहेत.
मोरया गोसावी मंदिर पूर्वी छान दगडी बांधकामाचे दिसायचे.आता त्या दगडावर ऑईलपेंट मारून देवळाचे देऊळपण घालवलेय. मंदिरात फारशी गर्दी नसायची.आता बकालपण वाढलंय.चिंचवडच्या रिक्शा हा वेगळा विषय आहे. मीटर नाही,तोंडाला येईल तो भाव! दुपारी १ ते ४.३० पर्यंत रिक्शा नसणे ही कटकटीची बाब होती.ओला,उबरमुळे आता हा त्रास जाणवत नाही.चिंचवड धड शहर नाही की गाव नाही.त्यामानाने निगडी सुरेख आहे.पण फारशी माहिती नाही.पिंपरीतही बरीच सुधारणा वाटते.

देवकी पूर्ण पोस्टला +१११११

मी जुने चिंचवड न बघितल्याने माझ्याकडे या आठवणी नाहीत. >> बदल होणारच की पण ते फार चांगल्या पद्ध्तीने झाले नाहीत. मोरया गोसावी मंदीर आता दिसते तसे अजिबात नव्हते. काहीही रंगरंगोटी करून पार वाट लावली आहे.

राम मंदीर परिसरात माझे बालपण गेले. मी ज्या वाड्यांची नावे लिहिली आहेत त्यान्ची पुढची बाजू म्हण्जे राम आळी, जिथे राम मंदीर होते आणि तिथेच मंदिराच्या बाजूला क्रां. चापेकरांचा वाडा. राम मंदीरात बरेचदा मुंजी ई. छोटे समारंभ होत. लाकडी मंदीर होते तेंव्हा. आता पूर्ण झगझगीत केले आहे. पूर्ण आळिची मोठी होळी तिथे होत असे राम मंदीरापुढे. आणि चक्क मोठमोठ्याने बोंबा मारल्या जाई नावानिशी. Happy चापेकरांच्या वाड्यात शाळा भरे . ७वी पर्यंत वर्ग होते. टी म वी च्य संस्कृत परिक्षापण होत इथे. एक्दम शेवटी व्यायामशाळा होती, एक विहिरपण होती. तिथेच पुढे मोकाशांचा मोठा वाडा होता हे बाबासाहेब पुरंदरेंचे मावस की आते बंधू. जरा पुढे हनुमानाचे आणि नवग्रहाचे मंदीर. तिथे अजिबात गर्दी नसे आणि आम्ही तिथे खूप धुडगुस घालत असू, त्या मंदीरात मोठा लाकडी पेटारा होता आणि तिथे आत लपता येत असे. आता म्हणे तो नवसाला पावणारा मारुती झालाय. बक्कळ गर्दी असते आता.

ह्यात सगळ्यात जास्त वाईट वाटते ते मंगलमूर्ती वाड्याचे. काय सुंदर बांधकाम होते. मोठी बकुळ होती आणि एक विहिरपण. तिथे विघ्नहरी देव आणि त्यांचे कुटुंब रहात असे आणि संस्कृतचे वर्ग घेत. आत्त जे सिमेंटचे बांधकाम दिसते ते पूर्ण लाकडी होते. तिथे लाल पेरूची २/३ झाडे होती. एक छोटीशी बाग होती. त्यात फणस, ब्रह्मकमळ, कर्द्ळ आणि काय काय झाडे होती. आणि तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग होत Happy पाऊस नसला की आणि एकाच वेळी २/३ परिक्षांची मुले असली की काही मुलांचा तास बागेत काहिंचा महाराजांच्या घरात. जोरदार पाऊस असला की कधीतरी चक्क मुख्य मंदिराच्या सभामंडपात पण शिकवणी चाले. बाहेर धो धो पाऊस आणि आत आम्ही तालात श्लोक, स्तोत्र असे काहीबाही म्हणत असू. काय भारी नाद तयार व्हायचा. इथेच सभामंडपात आषाढात संस्कृत दिन होत असे दरवर्षी मोठ्या धडाक्यात. संस्कृत गाणी, स्तोत्र आणि सगळ्यांच्या आवडत्या सुभाषितांच्या भेंड्या Happy आणि खाउ असे फोडणीचे पोहे जे द्रोणात मिळत. Happy षष्ठी प्रसादाची भाजी पण ईथेच वाड्यात निवडली जाई.

एल्प्रो कंपनी समोर लाकडाची वखार होती आणि आम्ही तिथून बंबासाठी लाकडे आणत असू. टेल्को कं. समोर वीज बील भरणा केंद्र होते तिथे जाताना चालत जायचे आणि येताना बसने Happy आमची सहल म्हणजे श्रीधरनगरची बाग, तिथे डबे घेऊन जायचे महिन्यातून एखाद्या रविवारी आणि लांबची सहल म्हणजे दुर्गा देवी टेकडी Happy डॉ. श्रीधर श्री घारे बहुदा पहिले नगराध्यक्ष पिंचिचे. त्यांचा एक दवाखाना आमच्या वाड्याजवळ होता. एकदम जड हात. इंजेक्षन दिले की पोरग जोरजोरात रडणारच.

चिंचवडात फार लहान लहान रस्ते आणि गल्ल्या होत्या त्यामुळे जशी लोक्संख्या वाढली तसे नीट नियोजन व्हायला हवे होते जे अजिबात झाले नाही. गांधी पेठ, पॉवर हाउस चौक ई. तर कसेही वाढले/ बदलले आहे.

बाकी पिंपरीमध्ये आवडण्यासारखे काही नाही बकाल आहे खूप पूर्वी पासूनच. आम्ही रविवारी भाजी आणायला जात असू तिथे पी सी एम सी बस ने कारण तिथली मंडई खूप मोठी होती आणि चांगली भाजी मिळे Happy

निगडी प्राधिकरण, जिथे मी आता रहतो, त्याबद्द्ल पुढच्या पोस्ट मध्ये.

Devulwada ani tyamadhe aslele Bakuliche zaad! Maze sugandhi baalpan... .
Devnagari naslyamule, jast motha pratisaad det nahiye.

मस्त वाटले हा धागा बघून.. माझे माहेर निगडी प्राधिकरण ! त्यामुळे अगदी जिव्हाळ्याचा विषय.
वैशिष्ट्य म्हणजे मोठे रस्ते, प्राधिकरणातले बंगले, कमी रहदारी (पुण्यापेक्षा तरी).
खुप आठवण येते नेहमी तिथली. भेळचौक, गिता पावभाजी, दुर्गा टेकडी, सावली हॉटेल, भक्ती शक्ती ही माझी आवडती ठिकाणं. Happy

सोमाटणे फाट्याचा मोठा गणपतीही पहाण्यासारखा आहे...

तो डोंगरावरचा का? एक्स्प्रेसवे वरून जाताना पाठमोरा दिसतो.

दुर्गा टेकडीला खूप वर्षापूर्वी एकदाच गेले.खूप छान अहे.
अप्पूघरपर्यंतच जायचो.पण नियोजन झकास आहे तेथले बंगले बघण्यासारखे आहेत.

मी पिंपरी मध्ये राहते 3 वर्षांपासून, आधी कोथरुडात त्यामुळे इकडे रुळायला खूप वेळ गेला अजूनही नवऱ्याला गमतीत म्हणत असते की मी तुझ्यासाठी खेड्यात आले शहरातून.
इथले वेगवेगळ्या जागा नेहमी शोधत असते, वरती बऱ्याच प्रतिसादात दुर्गा टेकडीचा उल्लेख आलाय. नेमकं कुठेय हे ठिकाण? अजून पाहिलं नाहीय.