आजकालच्या मालिका

Submitted by मी मधुरा on 13 December, 2012 - 11:46

आजकालच्या मालिकांचे काय चालू आहे ते माहितीच आहे सर्वांना........नव्याने सांगण्याची गरज नसावी त्यामुळे सरळ मुद्द्यालाच हात घालते......काय आहे, आजच्या मालिका, सिनेमे हे आपल्या जीवनावर,मानसिकतेवर किती प्रभाव टाकतात हे मी माझ्या रोजच्या जीवनात अनुभवल आहे. आणि अश्या साठी मला वाटत कि या मालिकेतील पात्र, त्यांचे संवाद, एकमेकांशी असलेली नाती ह्या गोष्टी कितीही अमान्य केल तरी आपल्या हृदयाच्या खूप जवळची असतात.
आता हेच उदाहरण पहा ना... काही दिवसांपूर्वीच माझी मामी आली होती. गोंडे लावलेली ओढणी, झालर लावलेली बाही आणि झगझगीत कापड असा अवतार पाहून तिला विचारलं तर म्हणाली त्या 'इस प्यार को क्या नाम दु?' मालिकेतल्या 'ख़ुशी' सारखी fashion केली आहे म्हणून. आणि तिन मला धर्म संकटात टाकल....हे विचारून कि 'कशी वाटली?'.....झाली का पंचाईत!!! तिच मन राखायला म्हणून हाताची दोन बोट (अंगठा आणि करंगळी ) जुळवून 'छान' आहे अस दाखवलं.
घरात तर रोज 'तू तिथे मी' मधल्या सत्यजित-मंजिरी आणि प्रिया बद्दल चर्चासत्र, विचारविनिमय चालूच असतात.....आज मंजिरी अस म्हणाली, काल सत्यजित तस ओरडला, प्रियानी हे नाव कारस्थान केल, मंजिरीन ४-५ लिटर आश्रु गाळले...वगैरे-वगैरे .
बर नुसत एव्हडच नाही, त्या मालीकांची पुन्हा पुन्हा Recaps पाहून पाहून त्या पात्रांचे संवाद इतके पाठ झालेले असतात कि त्या कलाकारांऐवजी या लोकांना उभ केल तरी काही बिघडणार नाही.....असो, विषयांतर नको.
म्हणजे तात्पर्य काय, तर या मालिका खूप जास्त व्यापून टाकतात आपल्या जीवनाला. म्हणजे काय तर, एखादी गोष्ट केली कि ती कोणत्यातरी मालिकेतल्या कोणत्यातरी पकाऊ पात्राप्रमाणे केली आहे अशी Comment सहसा ऐकायला मिळतेच......तूझ बोलण-वागण एकदम 'राधा'सारख आहे,तू अगदी 'घनश्याम'सारख ओरडतेस, तू अगदी त्या 'देवयानी'सारखी हेअरस्टाईल केली आहेस.....अशी ५५० उदाहरण आहेत पण तेवढा वेळ न माझ्याकड आहे ना वाचकांकडे.

महत्त्वाच अस कि ह्या मालिका ज्या सामान्य माणसाच्या देखील इतक्या जवळच्या बनून जातात त्या तितक्याच चांगल्या असायला पाहिजेत अस मला वाटत. नाती जपण, एकपत्नी असण, स्त्रीमुक्ती ला पाठींबा देण, सत्याचा विजय दाखवण हे त्या मालिकांच ध्येय असायला हव, अस माझ ठाम मत आहे.

तुम्हाला काय वाटत????

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे,पण मालिकांमध्ये जे दाखवत आहेत ते पाहून जगात काही चांगले उरले आहे असे अजिबात वाटत नाही. दादा होळकर नावाचे पात्र बायकोवर

जे अत्याचार करते, प्रिया खाल्या घराचे जे वासे मोजते, [तशीच ती आत्यापण ] , मंजिरीला घराबाहेर काढण्याचा विचार करणारा सत्यजित स्वतः प्रियाशी जे वागतो ते सर्व पाहून

जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चालला आहे. थोड्या फार फरकाने बरयाच मालिका याचेच कित्ते गिरवत आहेत. सध्या तो आशिष नवीन काहीतरी कल्पना शोधण्यात मग्न असावा.

असे रोमिओ रोजच्या पेपरात किस्से बनून यातच असतात !

उगाच फालतु पणा सुरु आहे ह्या मालिकेत.......सुरुवातीला मस्त सुरु होती हि मालिका......