तुझिया प्रेमाचा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 December, 2012 - 12:41

तुझिया प्रेमाचा पडो न विसर
ऐसे हे अंतर तद्रूप व्हावे ll १ ll ll
जळो संसाराची व्यर्थ तळमळ
नाभिशी नाळ जुळावी पुन्हा ll२ ll
सार्थक व्हावे शिणल्या कायेचे
खेळ हे मायेचे कळो यावे ll ३ ll
आलो मी जेथून यावे ते कळून
उगमी न्हाऊन व्हावे कृतार्थ lll ll ४ ll
सर्वांगी ओंकार अवघा जागवा
विरून जावा अहं कल्लोळ ll ५ ll

विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मरुनी जावा नादी विप्र>>>>याचा अर्थ सांगाल का विक्रांतजी ..........इतकाच काय तो समजला नाही बाकी समजले आहे
काव्य उत्तम आहे

मरुनी जावा नादी विप्र>>>>> उशिरा बद्दल क्षमस्व ,
विप्र= अस्मादिक=मी=अहं .
नादी =ओमकाराच्या नादाने=अनाहत ध्वनीने.
खर तर मलाही शेवट नीट जमला नाही असेच वाटते .थोड थांबायला पाहिजे होते.
धन्यवाद .

धन्यवाद

नाभिशी नाळ जुळावी पुन्हा >>>>या ओळीवरून आज पुन्हा एकदा तुमची कविता वाचतना माझ्या एका कवितेतील कडवे आठवले ............नीट आठवत नाहीये क्षमस्व.......काहीसे असे होते

रे जशी गूढ कल्पांता
मेळते नदी उगमासी
मी तसाच संपिन काय
सावळ्या उद्या तुजपाशी

धन्यवाद

सुंदर

रे जशी गूढ कल्पांता
मेळते नदी उगमासी
मी तसाच संपिन काय
सावळ्या उद्या तुजपाशी>>>>>>>>>>वाह वा!

शशांक धन्यवाद

सुंदर.

विप्र बदलला तर बरं, अर्थ स्पष्ट होण्याऐवजी अर्थांतर होतेय. .
वैभव,तुमच्या चार ओळीही आवडल्या..

प्रार्थना अगदी मस्त जमलीय.

अध्यात्मात प्रगती होण्यासाठी आपण नक्की काय करायला पाहिजे हे कळणे म्हणजे विवेक. तर जे कळले ते वळायला लागले की त्याला म्हणतात वैराग्य. ही वैराग्याची वाटचाल सुरू झाली की मग सुरू होतो यश व अपयशाचा सापशिडी चा खेळ. हा खेळ संपता संपत नाही व घर काही सापडत नाही. मग प्रयत्नांबरोबर यशासाठी प्रार्थना सुरू होते. या प्रार्थनेत असते आर्तता, व्याकूळता, आर्जव व प्रेम. आणि हे सगळे आले की कोमलता येतेच.

पण गंमत म्हणजे सगळे कळलेले असूनही वळत नाहीये म्हणून स्वतःचाच आलेला राग त्यात सामील झाला की मात्र एक वेगळेच रसायन तयार होते.

शाम दोन वर्षांनी माझी ही कविता मी पुन्हा वाचली ..माझ्या साठी पुन्हा नवा अर्थ घेवून आली .तुमचे लिहिणे म्हणजे दुधात साखर .