मी ..

Submitted by कमलाकर देसले on 12 December, 2012 - 09:39

मी ...

तुला पाहिले मी ;
तुला पूजिले मी ...

फुलांचे हृदय हे ;
तुला वाहिले मी ..

तुझे गूण सांगू ;
किती गाइले मी ..

पुजेतुन स्वत:ला ;
तुला अर्पिले मी ..

तुझी मेहदी बघ ;
कशी रेखिली मी ..

तुझी कोर भाळी ;
अता कोरिली मी ..

तनाने मनाने ;
तुझी राहिली मी ..

प्रतिक्षेतली बघ ;
किती काहिली मी ..

तुझे सर्व सारे ;
तुला रे दिले मी ..

तुझी जाहल्याने ;
किती साहिले मी ..

- कमलाकर देसले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे शेर नाही आवडले या वेळी
एकतर मीटर एव्ह्ढेस्से त्यात काफिया रदीफही पाळायचे खयालही दर्जेदार वाटायला हवा ......खूप कसरत करावी लागते नै !!.........
असो

पुजेतुन स्वत:ला >पूजा हा शब्द पुजा असा केल्याने अगदीच कसनुसे वाटले हा र्‍ह्स्व कै मला 'पचला' नाही देसले साहेब क्षमस्व

मी इथे असा बदल करून पाहिला(.........देवसरांच्या कृपेने ;))
स्वतःहुन स्वतःला
तुला वाहिले मी !

रेखिली ,कोरली ,राहिली....इथे टायपो आहे बहुधा ! प्रत्येक जागी शेवटी "ले " हवे असा माझा आपला एक अदमास आहे Happy

आता काही एडिशन करून वरचा प्रतिसाद लिहिला आहे पाहिलेत का ?
अहिराणी गझलेचे काय झाले ?...............काहीतरी कराच त्या बाबत !