नवीन गॅस जोडणीबरोबर शेगडी घेण्याची जबरदस्ती

Submitted by अविकुमार on 12 December, 2012 - 02:36

मायबोलीकरहो!

सध्या एच पी ची नवीन गॅस जोडणीसाठी नंबर लावला आहे. एजन्सीला यासाठीचे शुल्क विचारले असता रु. ६०००/- एका सिलींडरसाठी, सांगण्यात आले. एवढे जास्त शुल्क कशासाठी असे विचारले असता शेगडीचे धरुन सांगीतले आहेत म्हणाले. माझ्याकडे आधीच शेगडी असल्याने ती नको असे सांगितल्यावर ती घ्यावीच लागेल असे सांगीतले.
"एच पी च्या साईटवर शेगडी कंपल्सरी नाही असे लिहीले आहे" असे सांगून पाहिले पण काही उपयोग नाही.

तसेच नवीन सिलींडर हे सबसीडीशिवाय मिळेल (म्हणजे ९५० रु.) कारण नवीन कनेक्शनच्या सबसीडीचा निर्णय अजून झाला नसल्याचे सांगण्यात आले. निर्णय झाल्यावर तुमच्या बँक अकाऊंट मधे जमा करु असे म्हणाले.

माझा या एअजन्सीच्या बोलण्यावर बिलकूल विश्वास नाही. कुणाला याविषयी माहीती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. तसेच एच पी मधे उच्चस्तरावर तक्रार करण्यासाठी काही कोन्टॅक्टस असल्यास जरुर कळवा.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"एच पी च्या साईटवर शेगडी कंपल्सरी नाही असे लिहीले आहे" असे सांगून पाहिले पण काही उपयोग नाही. >>>>> ग्राहक मंचा कडे तक्रार करा.......आणि त्या एजंसी ला सांगा "शेगडी कंपल्सरी आहे असे लिखत द्या"

हो हा फार इरिटेटिंग रुल आहे सगळ्याच एजन्सीजचा. आमचे एक फॅमिली फ्रेंड २- २ वर्षं बाहेर जावुन ३-४ वेळेला परत आले. त्यांनी २ वेळेला कनेक्शन सरेंडर केलं होतं. त्यांना आधीचं पुण्यातलं ओरिजिनल एक आणि नंतर दोन वेळेला घेतलेलं परत नविन कनेक्शन असे ३ गॅस स्टोव्ज घ्यावे लागले. तिसर्‍या वेळेस ते वैतागले आणि त्यांनी इण्डेनकडे चौकशी केली, पण त्यांनीही गॅस स्टोव घेणं मॅन्डेटरी आहे असं सांगितलं.

अविकुमार
मी सिलेंडर घेतले तेव्हा शेगडी घ्यायची नसेल तर त्याच किंमतीचे दुसरे काही तरी घ्यावे लागेल असे सांगण्यात आले. (कुकर, नॉन्स्टिक भांडी वगैरे)
मग आम्ही ते घेतले. पण आम्हालाही ते घ्यावेच लागेल असे सांगण्यात आले होते.

उदय, ग्राहकमंचाकडे जावुन तक्रार करत बसायला वेळ तरी असतो का रे प्रत्येक वेळेस? बदलीच्या शहरात आलं कि कधी एकदा घर मार्गी लागतं आहे असं झालेलं असतं. ग्राहकमंचाच्या निर्णयाची वाट पहात राहिलं तर तेवढे दिवस किचन बंद ठेवायचं का? आणि तुम्ही तुमच्या शहरात असाल तर ओळखीपाळखीचे लोक, नातेवाइक असतात. ग्राहकमंचाचं ऑफिस, नंबर माहित असतं. त्यांना कोलकत्याला हीच परिस्थिती फेस करावी लागली, तेव्हा ते कुठे शोधत बसणार होते. बिचारे गॅसचं कलेक्शन करुन आहेत. लोकांना गॅस स्टोव वाटत फिरत असतात.

त्यांनी इण्डेनकडे चौकशी केली, पण त्यांनीही गॅस स्टोव घेणं मॅन्डेटरी आहे असं सांगितलं.
>>>
मनिमाऊ
माझ्याकडे इण्डेनच आहे. बहुदा मॅन्डेटरी वगैरे काही नसावं मग. प्रत्येक distributor वेगळं सांगतो की काय?

मागे कुणीतरी याच विषञावर धागा उघडला होता बहूतेक. मला आठवतंय त्याप्रमाणे त्या आयडीने गॅसकंपनीच्या वेबसाइटवरुन डिलरची तक्रार केली होती.

डिलरशी भांडावं लागेल, गॅस कनेक्शनबरोबर शेगडी कंपल्सरी नाहीये माझ्या माहितीप्रमाणे.

एच पी च्या साईटवर स्पष्ट शब्दांत लिहीलंय

Q4. Is it compulsory to buy hot plate (stove) and other accessories from distributor while availing new LPG connection?

A. No. Customer is at liberty to purchase them from any source provided it is approved by BIS

(http://www.hindustanpetroleum.com/En/ui/LPGFaqs.aspx#Q3)

तरीही या एजंसीज असा मनमानी कारभार कसा काय करतात काही कळत नाही.

उदय, ग्राहकमंचाकडे जावुन तक्रार करत बसायला वेळ तरी असतो का रे प्रत्येक वेळेस? >>>>>>>
.
.
तुम्हाला वेळ नाही मग...............गपचुप घ्या................
.
मग आपण लोकच "हे चुकीचे आहे" म्हणुन नंतर ओरडत बसतो........ थोडा वेळ जाईल पण असल्या प्रकारांना आळा तरी बसेल......एकाने तक्रार केली तर आपसुकच बाकीचे लोक सुध्दा तक्रार करणारच .....
आपण नाही विरोध करणार मग कोण करणार.......
शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्याच्या पोटी.........इथेच आपले घोडे अडते...

मागे कुणीतरी याच विषञावर धागा उघडला होता बहूतेक. मला आठवतंय त्याप्रमाणे त्या आयडीने गॅसकंपनीच्या वेबसाइटवरुन डिलरची तक्रार केली होती. >>अल्पना, मला पण पुसटसं आठवतंय वाचल्यासारखं. बरंच शोधूनही काही तो धागा मिळाला नाही म्हणून मग नाईलाजाने नवीन धागा उघडला.

अविकुमार, एच पी वाल्यांना मेलवर कन्फर्म करुन घ्या शेगडी कम्पल्सरी नाही हे. त्या मेलची प्रिन्ट आऊट दाखवा डिलरला. मी भारत गॅसवाल्यांकडुन असाच मेल घेतला होता. प्रिन्ट दाखवली की डिलर वरमुन जातो. खरंतर शेगडी कम्पल्सरी नाहीय एच पी किंवा भारत गॅसवाल्यांकडे.

अविकुमार, एच पी वाल्यांना मेलवर कन्फर्म करुन घ्या शेगडी कम्पल्सरी नाही हे. त्या मेलची प्रिन्ट आऊट दाखवा डिलरला.>> धन्स योडी. एच पी वाल्यांचा ई मेल आयडी उअपलब्ध नाही साईटवर. त्यांच्या कंप्लेंट पोर्टलमधून तक्रार टाकलीय. आता उत्तर कधी येते याची वाट पहात बसावे लागणार!

मागे कोल्हापुरच्या धाग्यावर श्री. अशोक पाटलांनी लिहिले होते कि त्यांनी नविन गॅस कनेक्शन घेतेले तेव्हा डिलरला सांगितले कि आम्हाला शेगडी नको आणि डिलरने ते मान्य केले.

मलाही नविन कनेक्शन घ्यायचे आहे त्यामुळे या धाग्यावर नजर ठेऊन असणार आहे Wink

सायबा,

कंप्लेण्ट करणे इ. गोष्टी करत बसण्यापेक्षा भ्रष्टाचार वाढविणारा एक इब्लिस सल्ला देतो.

एजंट तुम्हाला २००० रुपयाची शेगडी विनाकारण घ्यायला भाग पाडतो आहे. त्याला फारतर १५-२०% नफा त्यात होईल. त्याला म्हणावं, भाऊ, हे ५०० रुपये वरतून घे, शेगडी देऊ नकोस, अन तो तुझा 'रूल' बाजूला करून शिलिंडर दे. माझ्याकडे ऑलरेडी शेगडी आहे, नवी शेगडी काय करू?

फुकाट त्याला नियम बियम शिकवून नंतर तो शिलिंडर॑चा नंबर लावायला त्रास देईल तुम्हाला. तेव्हा सात्विक संताप वै जाऊ द्या, अन आपले काम पूर्ण करून कामाला लागा.

अविकुमार....

मी या जंजाळातून [यशस्वीपणे] गेलो आहे. वर आबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे मलाही नवीन कनेक्शनच्यावेळी गॅस शेगडी घेण्याविषयी भारत गॅसच्या डीलरने सुचविले होते [सक्ती नव्हती]. पण मी ते सौम्य भाषेत नाकारले....अधिक वादाची तयारी ठेवली होती. कदाचित त्यानी मग शेगडीऐवजी 'प्रेस्टिज'च्या तीन नॉनस्टिक तव्यांचा सेट घेण्याची जी विनंती मी केली होती ती मानली असल्याने पुढील प्रश्नच मिटला. त्यातच तो नॉनस्टिकचा सेट माझ्या घरी हवाच असल्याने एजन्सीने माझ्या गळ्यात मारला अशी तक्रार करण्यासही जागा नव्हती. दोन्ही बाजूकडून शांतपणे गॅस कनेक्शन डील पार पडले.

वर डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे १५-२०% नफ्याची रक्कम देवू करणे हा खुश्कीचा मार्गही योग्य वाटतो. पण अशा देवाणघेवाणीला डीलर कचरतो. कदाचित समोरील ग्राहकाने अगोदरच अ‍ॅन्टीकरप्शनला सूचना दिली असल्याची शक्यता त्याच्या मनी उतरते.

त्यापेक्षा एक हजारपर्यंत तुम्ही कुकिंगवेअर्स तिथूनच खरेदी करण्याचा विकल्प त्यांच्यासमोर द्यावा. ग्राहक मंच, कलेक्टर कचेरी, शिधा पुरवठा अधिकारी तक्रारी कितीही परिणामकारक वाटत असल्या तरी त्या फार वेळखावू आहेत.

अशोक पाटील

http://www.maayboli.com/node/22818 इथे वाचा. एचपीच्या साईटवर ज्या काही कॉमन तक्रारींची यादी आहे त्यात 'गॅस शेगडीची सक्ती' ही तक्रारही आहे. त्या एजन्सीला गॅसशेगडी कंपलसरी घ्यावी लागेल असं लेटर लिहून त्या तुमच्या लेटरहेडवर असं सांगा. नाहीतर चक्क एचपीच्या वेबसाईटवर मी नाव नोंदवून ही तक्रार करणार आहे असं सांगा.

http://www.hindustanpetroleum.com/En/UI/LPGFaqs.aspx इथे चार नंबरचा FAQ वाचा. त्या पानाचा प्रिंटआऊट घेऊन जा. चुपचाप कनेक्शन देतील.

अशोक, नॉनस्टिक पॅन, इतर भांडी तरी का घ्यायची? अगदी घरात हवी असतील तरी हव्या त्या ब्रँडची, हव्या त्या क्वालिटीची, हव्या त्या बजेटची आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या चॉईसची घेऊ की! कोणीही आपल्या गळ्यात कोणतीही भांडी वाटेल त्या दरात मारतील, ती का म्हणून घ्यायची.

करेक्ट या धाग्यावरच्या समुच्या पोस्ट्स आठवत होत्या मला. Happy

मामी, तू धागा उघडला होतास हे आठ्वलंच नाही. समूच्या प्रोफाइलमध्ये पण जावून आले धागा शोधायला. ::फिदी:

भारत गॅसवाल्यांनी '५ किलो तांदुळ आहेत. ते घ्या मग' असं सांगितलं होतं आम्हांला. तांदुळ न घेता त्याचे पैसे कमी करा असं सांगितल्याबरोबर लगेचच ऐकला होता माझा डिलर. होता होईतो नॉनस्टीक/किंवा इतर वस्तु नकोच ह्यावर अडुन बसावं लागेल जरा.

मला ही भारतचे नविन गॅस कनेक्शन बरोबर शेगडी घ्यावीच लागली. डीलरशी भांडुन काही उपयोग झाला नाही. कंप्लेंट केली आहेच, पण थोड्या दिवसात उत्तर नाही आलं तर ग्राहक मंचात जाण्याचा विचार आहे.

सखी-माऊली, http://www.ebharatgas.com/pages/FAQ/FAQ_whatislpg.html#connection इथे भारत गॅसचेही FAQs आहेत. त्यातील हा भाग वाचा :

How do I get a new LPG connection?
New LPG Connections are now available on demand in most of the parts of the country. All you need to do is approach the nearest Bharatgas Distributor catering to your area with a proof of identity and proof of your residence address. In case there is a waiting list for new connection at any place, the distributor will register your name for a new connection and give you a waiting list number. Thereafter, he will send you an intimation letter as soon as your turn matures.

The various documents accepted as proof of identity and proof of residence is as under:

Proof of Identity*

Proof of Address*

Voters Identification Card
Passport
Driving Licence
PAN Card
Any Photo identification issued by State Government
Aadhaar Number allotment letter

Voters Identification Card
Ration Card
Electricity Bill ( within last three months)
Telephone bill( within last three months)
Employers Certificate
Rent Receipt (Last two months)
LIC Policy (Validity to be checked)
Flat allotment letter
House Registration Papers
Aadhaar Number allotment letter

*In case the State Government insists on any other document or procedure the same shall be fully complied with under the EC act applicable to the State. The above list is only illustrative and not exhaustive.

Distributors stock only ISI certified hotplates. However, it is not mandatory for you to buy your hotplate or any other items from the Distributor. Any make of your choice will suffice as long as it bears the ISI mark.

आम्ही आजवर ज्या ज्या डीलरकडे बघितलय तिथे कंपनीकडून मोठ्या अक्षरामधे "शेगडी घेणे गरजेचे नाही" अशा सूचना लावलेल्या आहेत. अशा सूचना नसतील तर डीलरच्या बापाकडे (डीलरच्यावरचा माणूस) तक्रार नोंदवू शकता. ग्राहक मंचापेक्षा हा पर्याय जवळचा पडेल.

फुकाट त्याला नियम बियम शिकवून नंतर तो शिलिंडर॑चा नंबर लावायला त्रास देईल तुम्हाला. तेव्हा सात्विक संताप वै जाऊ द्या, अन आपले काम पूर्ण करून कामाला लागा.
>> इब्लिसभाऊ, आता सिलेंडरचे नंबर डीलरकडे लावले जात नाहीत. वेगळी सिस्टीम बनवली आहे. यामुळे सिलेंडरच्या काळा बाजाराला आळा बसेल म्हणे.

अविकुमार... तुम्ही समु ह्या आयडीला संपर्क करा... त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल..

नवीन कनेक्शन घेताना शेगडी कम्पल्सरी नाहीच.. फक्त ती शेगडी विकल्यावर डिलरला कमिशन मिळत असल्याने ते मागे लागतात आणि कम्पल्सरी आहे असे सांगतात..

आत्ताच "आपण आग्रही ग्राहक" हा बाफ आणि समुची संपूर्ण लढाई वाचली. त्यामूळे मी पण आता माझ्या शस्त्रांना धार लावायला सुरुवात केली आहे. समुची अडवणूक वाचून रक्त ऊसळत होते. ग्राहकांना नाडून स्वतःची तुंबडी भरणार्‍या असल्या संधीसाधूंना अद्दल घडवलीच पाहीजे.

तसेच नवीन सिलींडर हे सबसीडीशिवाय मिळेल (म्हणजे ९५० रु.) कारण नवीन कनेक्शनच्या सबसीडीचा निर्णय अजून झाला नसल्याचे सांगण्यात आले. निर्णय झाल्यावर तुमच्या बँक अकाऊंट मधे जमा करु असे म्हणाले. >> या बद्दल कुणालाच माहीती नाही का? ४५० चं सिलींडर ९५० ला घ्यायचं यात पण मला एजन्सीचा काळा बाजार दिसतो आहे.

कारण नवीन कनेक्शनच्या सबसीडीचा निर्णय अजून झाला नसल्याचे सांगण्यात आले. निर्णय झाल्यावर तुमच्या बँक अकाऊंट मधे जमा करु असे म्हणाले. >>>>>>> सप्टेंबर पर्यंत जे जे सिलेंडर दिले तो पर्यंत सबसिडी होती पुढील सिलेंडर वर नाही आहे....... नविन वर सध्या मार्च पर्यंत नाही आहे .असे वाचले आहे

@ मामी....

"....नॉनस्टिक पॅन, इतर भांडी तरी का घ्यायची?...."

मुद्दा योग्यच आहे. पण एकतर घरी किचनसाठी ती तीन भांडी आपण घेऊ या असा विचार गॅस कनेक्शन येण्यापूर्वीच सुरू झाला होता, म्हणजे त्याची आवश्यकता होती असे मानू या. पण मी कनेक्शन मिळेपर्यंत थांबलो एवढ्यासाठी की मलाही "शेगडी गळ्यात मारणे" प्रकाराबाबत स्थानिक पातळीवर ऐकीव बातमी मिळत होतीच. दुसरे असे की, माझा स्वभाव काहीसा नेमस्त असल्याने एका विशिष्ट मर्यादेच्या आतच मी वादाची पातळी ठेवत असतो. जेव्हा एजन्सीच्या ऑफिसमध्ये गॅस शेगडीचा मुद्दा समोर आला त्यावेळी मॅनेजरला मी नम्रपणे "मला त्या ऐवजी तुमच्या शो-रुममध्ये दिसत असलेला तो प्रेस्टिजचा सेट द्या' असे सुचविले तर ते तात्काळ मान्य झाल्याने मग किंमतीचा मुद्दा मीही ताणून धरला नाही. शिवाय प्रेस्टिजच्या पॅकिंगवर जी किंमत प्रिन्ट केलेली दिसली, तीच डीलरच्या क्लार्कने घेतली.

ग्राहक मंच्याकडे जायच्या अगोदर कं फोन करा ऐरीया मॅनेजरला. २ मिनिटात काम होउन जाइल.
स्वानुभव आणि (एच पी साठी व इंडेन साठी पण)

तुमच्या ईथे पाईप गॅस नाही पोचलाय का अजून? असेल तर तोच घ्या...

शेगडी घ्यायची गरज नसते. आवाज चढवायची आणि भांडायची तयारी ठेवा... सर्व नीट होते.

एचपी च्या कस्टमर सर्विस सेलचा नंबर एजन्सी मध्ये लिहिलेला असतो. तिथे फोन करा एजंतच्या समोरच. दोन मिनिटात बिना शेगडी कनेक्शन मिळेल
एजंटशी पंगा घ्यायचा नसल्यास घरुन फोन करा एजंट स्वतः फोन करेल.

शिवाय प्रेस्टिजच्या पॅकिंगवर जी किंमत प्रिन्ट केलेली दिसली, तीच डीलरच्या क्लार्कने घेतली.>> हो पण तोच पॅक बाहेर कमी किमतीला मिळतो.
अर्थात अशा वेळी आपण स्वयंपाक करण्यास दुसरा मार्ग नसल्याने हतबल असतो.
मी बरेच भांडण केले होते डिलरशी. तो महाचालु होता. नाइलाजाने त्याच्याकडे शेगडी घ्यावी लागली.
अर्थात आता इन्डक्शन प्लेट उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच्याशी भांडण्यात वेळ गेला तरी चालेल अशी परिस्थिती आहे. शिवाय आता ऑनलाइन पोर्टल्स आहेत त्यावरच्या तक्रारीची दखल घेतली जाते. अगदी डिलरने सिलिन्डर घरी देताना घेतलेल्या ५-१० रु एक्स्ट्रा काढण्याच्या प्रकाराचीही दखल घेतली जाते.

कारण नवीन कनेक्शनच्या सबसीडीचा निर्णय अजून झाला नसल्याचे सांगण्यात आले. निर्णय झाल्यावर तुमच्या बँक अकाऊंट मधे जमा करु असे म्हणाले. >>>>>>> सप्टेंबर पर्यंत जे जे सिलेंडर दिले तो पर्यंत सबसिडी होती पुढील सिलेंडर वर नाही आहे....... नविन वर सध्या मार्च पर्यंत नाही आहे .>>>>

निर्णय झाल्यानंतर मार्चपर्यंत ३ सिलेंडर सब्सिडाइज्ड किमतीमध्ये मिळतिल असं वाचलं होतं. मी सप्टेंबर पासून २ सिलेंडर घेतलेत. दोन्ही नेहेमीप्रमाणे ४९० लाच मिळाले. (पहिल्या वेळी माझ्याकडून मला ४९० रु ला सिलेंडर मिळालं असं एका फॉर्मवर लिहून घेतलं होतं आणि दुसर्‍या वेळी मला गॅसचं कार्ड मागितलं...तेच ते निळं कार्ड. ते त्यावेळी माझ्याकडे नव्हतं तर पुढच्या वेळी नक्की दाखवा त्यावर नोंद करावी लागेल असं सांगितलं. )

"....हो पण तोच पॅक बाहेर कमी किमतीला मिळतो....."

....असेलही झकास. पण मला नाही वाटत की अगदी डोळे विस्फारून टाकणारा फरक असेल दोन्ही ठिकाणातील किंमतीबाबत.

[शिवाय तो व्यवहार झाल्यावर त्याच क्लार्कने कनेक्शनचे सिलेन्डर, त्यासोबत मिळणार्‍या अ‍ॅक्सेसरीज आणि त्या प्रेस्टिजच्या सेटचे पॅकेज....सारे काही त्यांच्या डिलिव्हरी व्हॅनसोबत माझ्या घरी पाठविले....अगदी तिसर्‍या मजल्यापर्यंत. एरव्ही तो सेट मला स्वत:ला बाजारात जाऊन रिक्षाने आणावा लागला असता.....ते घेऊन तीन मजले चढावे लागले असते.....असा एकंदरीत विचार केल्यास माझे काही फारसे आर्थिक नुकसान झाले नसावे असे वाटते.]

इब्लिस | 12 December, 2012 - 13:56 नवीन

सायबा,

कंप्लेण्ट करणे इ. गोष्टी करत बसण्यापेक्षा भ्रष्टाचार वाढविणारा एक इब्लिस सल्ला देतो.

एजंट तुम्हाला २००० रुपयाची शेगडी विनाकारण घ्यायला भाग पाडतो आहे. त्याला फारतर १५-२०% नफा त्यात होईल. त्याला म्हणावं, भाऊ, हे ५०० रुपये वरतून घे, शेगडी देऊ नकोस, अन तो तुझा 'रूल' बाजूला करून शिलिंडर दे. माझ्याकडे ऑलरेडी शेगडी आहे, नवी शेगडी काय करू?

फुकाट त्याला नियम बियम शिकवून नंतर तो शिलिंडर॑चा नंबर लावायला त्रास देईल तुम्हाला. तेव्हा सात्विक संताप वै जाऊ द्या, अन आपले काम पूर्ण करून कामाला लागा.

बेकायदेशीर गोष्टी करायला प्रोत्साहन दिल्याबद्दल या सल्याचा निषेध. इतर ठिकाणी सदवर्तनाची द्वाही फिरवणारे इथे हे असे बोलतात?

मी सुद्धा ह्या प्रसंगातुन गेलो आहे, मला तर "कनेक्शन नाही मिळणार काय करायचंय ते कर" अशी डीलर कडल्या एका माणसाने धमकी सुद्धा दीली होती. सुदैवाने HPCL कडुन आमची कंपनी LPG घेते त्यामुळे आम्ही आमच्या purchase dept च्या लोकांना सांगुन HPCL मध्ये complaint केली. HPCL वाल्यांनी आमच्या customer च्या employees ना कनेक्शन देत नाही व HARRASE करता , पुन्हा असं केलं तर dealership रद्द केली जाईल असा ईशारा दिला. त्यामुळे मला एका दिवसात कनेक्शन मिळालं. माझ्याकडे शेगडी होती मी म्हणालो मी पुन्हा शेगडी घेणार नाही तर त्यांनी माझ्याकडे असलेल्याशेगडीचं ईन्स्पेक्शन केलं आणि ओके म्हणुन शेरा दिला. दुस-या सिलेंडरचे पैसे भरुन एका कनेक्शनवर २ सिलेंडर्स सुद्ध मिळाली. आणि ६०००/- ही रक्क्म हा डीलरच्या मनाप्रमाणे आहे, मुळ कींमत ही २०००-२५०० इतकी असेल जास्तीत जास्त. आणि आत्ताही आम्ही सिलेंडरसाठी नंबर लावला की लगेचच सिलेंडर मिळतं.

(मुख्य म्हणजे तो डीलर माझ्या वडीलांचा खुप वर्षा पासुनचा मित्र होता पण तो आमच्याशी असं वागला मग आम्हालाही असं पाउल उचलावं लागलं)

@ इब्लिस
प्रतिवाद करता आला नाही की आयडी खरा की डू याची चर्चा सुरू होते Proud
रच्याकने, माझा डू कशावरून? तुम्हीच कुणाचेतरी डू नाही कशावरून? Light 1
सोडा हो इतरांना बेकायदेशीर वागायला प्रोत्साहन द्यायचे आणि स्वतःवर शेकले की डुआयडी म्हणून बोंब ठोकायची.

रच्याकने, माझ्या पोस्टींना फाट्यावर मारायचा निर्धार इतक्यातच गळून पडला.....की लागली त्यालाही भ्रष्टाचाराची वाळवी Rofl

निर्णय झाल्यानंतर मार्चपर्यंत ३ सिलेंडर सब्सिडाइज्ड किमतीमध्ये मिळतिल असं वाचलं होतं>>ओके. म्हणजे खरंच असा निर्णय व्हायचा आहे असे दिसतंय. रु. ९५० ला सिलिंडर घेण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणा की!

१९९९ मध्ये आमच्याकडे कनेक्शन आले तेव्हाहि असाच अनुभव आला होता. वाशिमधल्या HPCL च्य कार्यालयात तक्रार करुन तिथुनच फोन करवला डिलरला आणी शेगडी नाहि घेतलि.
HPCL च्या स्थानिक कार्यालयातुन फोन जाउद्या मग एकतिल.

अरे, या धाग्यावर अपडेट्स द्यायचे राहूनच गेले.

माझ्याकडे शेगडी होती मी म्हणालो मी पुन्हा शेगडी घेणार नाही तर त्यांनी माझ्याकडे असलेल्याशेगडीचं ईन्स्पेक्शन केलं आणि ओके म्हणुन शेरा दिला. दुस-या सिलेंडरचे पैसे भरुन एका कनेक्शनवर २ सिलेंडर्स सुद्ध मिळाली.>> +१

अडूनच राहिल्यामूळे आणि वारंवार फोन करत राहिल्यामुळे शेवटी त्यांनी ईन्स्पेक्शनला माणूस पाठवला. त्याने ओके केल्यावर सुमारे महिन्याभराने म्हणजे जानेवारी अखेरीस कनेक्शन मिळाले. तेही २ सिलिंडर सहित, तेही दोन्ही मिळून चक्क ४९००/- रुपयांत!

सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार.

मला पण पुण्यात इंडेन च्या एजन्सी कडून शेगडी घ्यावीच लागते असं सांगितलं आहे. परवा जाऊन 'साहेबां'शी बोलायचय. शिवाय २ गॅस मिळत नाहीत आता असं आधीच सांगितलय त्यांनी. २ गॅस हा काय प्रकार आहे ते मला कळलं नाही सो मी जास्त विचार केला नाही त्या बद्दल. आधी एक गॅस तरी येउ दे Happy

मला पण एच पी चं नविन कनेक्शन घ्यायचे आहे. दोन सिलींडर साठी ७,३०० रु भरायला सांगितले.
शेगडी बद्द्ल काही सांगितले नाहि. मला हि शेगडी नकोच आहे म्हणा पण एवढे पैसे भरायला लागतात?