BCA,MCA,MCA,MCS,BSC Sci. फ्रेशर्स साठी इंटर्नशिप बद्दल..

Submitted by सूर्यकिरण on 12 December, 2012 - 00:22

BCA,MCA,MCA,MCS,BSC Sci. फ्रेशर्स साठी इंटर्नशिप बद्दल.. पुण्याजवळच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांबद्दलची माहिती हवीये? त्या इंटर्नशिपसाठी कसे Apply करता येईल? कॉलेजकडून काही सुविधा नसल्यास? वैयक्तिक पातळीवर काय करावे लागेल?

लवकरात लवकर सविस्तर माहिती दिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! सुकि, उत्तम धागा! माझ्या नणंदेच्या मुलीलाही ६ महिने इंटर्नशिप करायची आहे. तीही कंपनीच्या शोधात आहे. जे मायबोलीकर या क्षेत्रात आहेत त्यांनी प्लीज शक्य तेव्हढ्या लवकर मदत करा!

सूकि, कॉलेजवर अवलंबून राहता येत नसेल तर, कॉलेजवाल्यांना कामास लावावे. आधी सर्व students नी आपापला biodata तयार ठेवावा. कॉलेजचे profile तयार करावे. IT companies चे फोन नं घेवून कॉलेजच्या principal/HOD/sr. prof. यांच्याकडून फोन करून संबंधित कंपन्याना आमंत्रित करावे. यात सर्वांचा खूप फायदा होईल.

चिन्नु, धन्यवाद. पण कॉलेज कडून हे जमवणं फार अवघड आहे. फक्त एखादं लेटर देऊ शकतं कॉलेज.
वत्सला, तुला प्रवरा कॉलेज माहित असेलच ना.. माजी शिक्षण मंत्र्याचं कॉलेज आहे ते तरीही असं.

ऐकुन माहित आहे ते कॉलेज!

एखाद्या कंपनीत इंटर्नशिप करण्यापुर्वी अ‍ॅप्टिट्युड टेस्ट, इंटर्व्ह्यु, जीडी असे टप्पे असतात का?
अ‍ॅप्टिट्युड टेस्ट कोणत्या विषयावर आधारीत असते? त्यासाठी काही विशेष तयारी करावी का?

अ‍ॅप्टिट्युड टेस्ट कोणत्या विषयावर आधारीत असते? त्यासाठी काही विशेष तयारी करावी का?>> आनंदयात्री ह्यावर अधिकाराने बोलु शकेल.

सुकि, छान धागा.

माझेही दोन मित्र आहेत. त्यातील एकजण MCA आणि दुसरा MCS फ्रेशर आहे.

जे मायबोलीकर या क्षेत्रात आहेत त्यांनी प्लीज शक्य तेव्हढ्या लवकर मदत करा! >>>> प्लीजच.

एफ्.सी. रोडला एच्.सी.ल. करिअर डेव्हलपमेंट सेंटर आहे तिथे ६ महिने इंटर्नशिप करता येते. पण पैसे भरावे लागतात. ते सर्टीफिकेट देतात. एक प्रोजेक्ट देऊन तो पुर्ण करुन घेतात. जावा आणि डॉटनेट दोन्ही आहे.

सुकी माजी शिक्षण मंत्री किती दिवस तो पोर्ट्फोलिओ पहात होत? ईतर बाकीच्या सगळ्या कॉलेजला सगळ्यांच मुलांना ईंटरशिप कॉलेजकडुन्च मिळाली आहे का? बहुतांशी ईंटरशिप प्रायव्हेट कंपन्यांमधे केली जाते .... तिथे मंत्री काय करणार..... ज्या काही सरकारी संस्था आहेत या क्षेत्रातल्या तिथे अश्या ईंटरशिपसाठी किती जागा असतात? त्यात यांच्या कॉलेजच्या किती मुलांना आत्तापर्यंत संधी मिळाल्यात? ईंटरशिपसाठी लेखी आणि तोंडी परीक्षा पण असतात ना? की फक्त कॉलेजनी पाठवले आणि लगेच मिळाली अस असत?

आम्ही गेलोय या दिव्यातुन ३ वर्षापुर्वी.. .वणवण भटकलोय पुणे... Sad
हो सुकी.. आजकल मोठ्याच नाहीतर लहान कंपन्य मध्ये पण अ‍ॅप्टिट्युड टेस्ट, इंटर्व्ह्यु, जीडी फॉलो करतात..
अ‍ॅप्टिट्युड टेस्ट जनरल ऑब्जेक्टीव्ह+ टेक्निकल असते.

कॅम्पसमधून इंटर्नशिप मिळू शकत नसेल तर अवघड आहे. कारण या प्रकारात ओळखींवर अवलंबून रहावं लागतं. चॉईस नसतो. काही कंपन्यांमध्ये बिनपगारी काम करुन सर्टिफिकेट पदरात पाडून घ्यावं लागतं. हे निराशाजनक असलं तरी सत्य आहे. म्हणूनच अ‍ॅडमिशनच्या वेळीच 'कँपस' चांगला असणार्‍या कॉलेजांना प्राधान्य द्यावं लागतं, भरमसाठ पैसे भरुन.
सिलेक्शन बद्दल : खालील टप्पे एकामागून एक पास करावे लागतात.
१. काही ठिकाणी लेखी परीक्षा. यात टेक्निकल आणि अ‍ॅप्टिट्यूड.
या दोन्ही साठी भरपूर तयारी करावी लागते. टेक्निकल अर्थातच तुमच्या डिग्री अभ्यासक्रमात असतं त्यापेक्षा जरा वरच्या पातळीवरचे प्रश्न असतात. खास तयारीशिवाय नाही पास होऊ शकत. बेसिक्स प्रचंड पक्के लागतात. अ‍ॅप्टिट्यूड साठी आर्.एस. आगरवालचं (बहुतेक) पुस्तक प्रसिध्द असलं तरी ते प्राथमिक आहे हे विसरु नका. इंटरनेटवर सतत या टेस्ट देत रहा. उत्तरांचं लॉजिक वाचत रहा. उपयोग होतो.
२. टेक्निकल इंटरव्ह्यू १ /२/ किंवा ३ सुध्दा!
यासाठी इंटरनेटवर मिळतील तेवढे FAQ सतत वाचले पाहिजेत. ट्रिकी प्रश्न नोट केले पाहिजेत. वाचता वाचता 'इंटरव्ह्यूला जायच्या आधी' वाचायचे १०-१५ प्रश्न वेगळे तयार ठेवायचे. ऑपरेटिंग सिस्टीम्स, डेटाबेस, नेटवर्किंग मधले सुरुवातीचे चॅप्टर्स तोंडपाठ होतील इतके वाचायचे. त्याशिवाय बेसिक्स पक्के होत नाहीत. पुस्तकातही 'इंटरव्ह्यूला जायच्या आधी' वाल्या खुणा हव्यात. कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या लेखी परीक्षेतल्या उत्तरांची कारणमीमांसा विचारली जाते. तुमचं लॉजिक, बेसिक्स आणि थॉट प्रोसेस किती क्लिअर आणि पक्की आहे हे जोखले जाते. यात तुमचे एखादे उत्तर चुकले आहे हे कळले तरी तसे स्पष्ट सांगा, कवूल करा. चुकांचे समर्थन केल्यास फसलात!
३. ग्रुप डिस्कशन
हे सगळीकडेच नसते. पण यात टीम वर्क वर भर दिला जातो. दुसर्‍याचे म्हणणे ऐकून घेऊन स्वतःचे मुद्दे मांडणे, इतरांना आदर देणे, नेतृत्वगुण इ तपासले जाते. परीक्षेसाठी मुद्दाम रणधुमाळी माजवणारे विषय देतात. संयम महत्त्वाचा.
४. एचार
इथेही तुमचा सामाजिक कल, विचारांची धारणा पाहिली जाते. अमूक परिस्थितीत तुम्ही कसे वागाल हे पाहिले जाते, तुमचा प्राधान्यक्रम ओळखला जातो.
सर्व तयारी केलीत तरी एकदा इंटरव्ह्यूला कसे जावे, वागावे बोलावे याबद्दल इंटरनेट धुंडाळा आणि त्याचे पालन करा. शुभेच्छा!

सुशा मी मंत्र्याच्या कॉलेजात नव्हते रे पण इंटर्नशिप साठी केलेली पायपीट आठवली.. Sad
पुण्याचं तोंड त्याच कारणासाठी बघि तलं होतं पहिल्यांदा...

कॅम्पसमधून इंटर्नशिप मिळू शकणारी पुणे विद्यापीठात BCA/MCA ची किती कॉलेज आहेत?
त्यातली पुणे शहरातली किती आणि बाहेरची किती?
माझा अनुभव आहे कि पुण्यातल्या अगदी मोजक्या कॉलेजला कॅम्पस ईंटरव्ह्यु होतात.... बाकी बाहेरच्या कॉलेजला नाममात्र....
सुकी तुम्हाला प्रवेश घेण्याआधी हे माहीत नव्हत का की प्रवरा कॉलेज काही मदत करत नाही म्हनुन? माहीत नव्हत तर तुमची चुक झाली , माहीती न घेताच तुम्ही प्रवेश घेतला. मग म्हणाल त्यावेळेस तुम्हाला माहीत नव्हत की अस काही असत तर तुम्ही चुकीचा कोर्स निवडला. जर माहीत होत तरी तुम्ही प्रवेश घेतला तर आता कॉलेजच्या नावान खडे फोडण्यात काय अर्थ आहे.
बर्याच वेळेस आपण दुसर्याच्या नावान फक्त ओरडतो ... पण तिथली सत्य परीस्थिती कधीच जाणुन घेत नाही काय प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सोडवता येतिल ?

कॅम्पसमधून इंटर्नशिप मिळू शकत नसेल तर अवघड आहे. कारण या प्रकारात ओळखींवर अवलंबून रहावं लागतं. चॉईस नसतो. काही कंपन्यांमध्ये बिनपगारी काम करुन सर्टिफिकेट पदरात पाडून घ्यावं लागतं. हे निराशाजनक असलं तरी सत्य आहे.
>> आशुडी अनुमोदन. विश्वास बसणार नाही, पण २००२ च्या वेळेस MCA ची ईंटर्नशिप करण्यसाठी ( बिनपगारी) मी स्वतः एकुण ४७ ईंटरव्ह्यू दिले होते. ( त्यावेळेस वाय२के चा प्रॉब्लेम ही होता आणि रिसेशनही)

४८ च्या वेळी बिनपगारी म्हणून लागलो नंतर हळूहळू पगार सूरू झाला... Happy

आता मात्र आय.टी. स्किल्स ला चांगली मागणी असल्याने इंटर्नशिप मध्ये ही वेतन मिळते.

पण ओळखी ने जे काम त्वरीत होते तेवढे गुणवत्तेने होत नाही हे मात्र अजुनही खरे

सूकि कॉलेजचे सिनीयर विद्यार्थी यात मदत करु शकतात जे ऑलरेडी ईन -जॉब आहेत... त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवा...

दिपाली तु कुठे केली होतीस इंटर्नशिप ते पण सांग म्हणजे बाकिच्याना पण फायदा होईल. शेवटी सर्टीफिकेट कुठुन तरी मिळवावेच लागते.

मला पण रीसेशन प्रॉब्लेम फेस करावा लागला सो मी पिंपरीला GKS या मेकॅनिकल कंपनीमध्ये इंटर्नशिप केली पण कंपनी आय.टी नसल्यामुळे ते लोक रिसोर्स अ‍ॅव्हेलेबल करु देऊ शकले नाहीत. ( मशीन) त्यामुळे आम्ही घरातुन प्रोजेक्ट करुन रिव्ह्यु साठी त्यांना दाखवायला न्यायचो.

Thanks Ashudee and Prafullashimpi for good inputs!

पुण्यात MCA चे चांगले कॉलेज कुठले आहे? माझि भाचि MCA ला अ‍ॅडमिशन घेते आहे. तिला गरवारे, मॉडर्न, डि वाय पाटिल मधे मिळायचे चान्सेस आहेत असे म्हणते आहे. यातले चांगले कुठले कॉलेज आहे. प्लेसमेंट आणि फी चा अंदाज आहे का कोणाला. MCA बद्दल चर्चा आहे म्हणुन इथेच विचारले.

आमच्या Gwangju Institute if Science and Technology साठी पण प्रयत्न करता येइल. येण्याजान्याचे तिकिटही मिळू शकते आणि आंतरराष्ट्रिय संस्थेतील अनुभवही.

ewww.gist.ac.kr बघा