चालले ते ठीक आहे! छान आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 11 December, 2012 - 23:21

गझल
चालले ते ठीक आहे! छान आहे!
आज जगण्याचे तरी मज भान आहे!!

पावती अध्यापनाची हीच आहे!
आज विद्यार्थ्यांत माझा मान आहे!!

हे न विद्यार्थी, अरे, माझी मुले ही....
जाणतो मी काय माझे स्थान आहे!

एवढी टीका, टवाळी ऐकली की,
जाहला तैय्यार माझा कान आहे!

थोर जे होते खरे ते गप्प होते.....
थोर लोकांचा कुठे सन्मान आहे?

लोकहो! बसवू नका मखरात मजला;
एक मी तुमच्यातला इन्सान आहे!

हा भले सत्तेत...तो आता विरोधी....
आतुनी त्यांचे जुने संधान आहे!

व्याप पाठीशी तरी लिहितोच गझला!
छंद जपण्याचे मला व्यवधान आहे!!

ही प्रशंसा ना कुण्याही कामिनीची;
ईश्वराचे हे सरळ गुणगान आहे!

दाखवू कोठून आता स्वामिनिष्ठा?
दाखवाया फक्त येथे श्वान आहे!

खायला उठते महागाई अम्हाला!
दोन वेळा जेवणे आव्हान आहे!!

कोणत्याही पिंज-याचे भय न मजला;
मज भरारी घ्यायचे वरदान आहे!

आजवर मी फक्त डोळेझाक केली!
पाहिले ना मान की, अवमान आहे!

कोण मी? कोठून आलो? अन् कसा मी?
एक मी अद्यापही अनुमान आहे!

माझियासम फक्त येथे मीच आहे!
मीच उपमा, मीच अन् उपमान आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !! अनेक शेर मस्तय्त
अनेक मिसरे खूप आवडले
वरदान ,अनुमान ,उपमान, अधिक आवडले गुणगान सर्वाधिक आवडला
__________________________________________
उपमान वरून माझा व्याकरणसंज्ञा वापरलेला एक शेर आठवला

विठ्या तुझ्याविण कसा सोडवू
उभय-अन्वयी समास माझा

कोण मी? कोठून आलो? अन् कसा मी?
एक मी अद्यापही अनुमान आहे!

<< भारी शेर आहे हा, आवडला.

कोण मी? कोठून आलो? अन् कसा मी?
एक मी अद्यापही अनुमान आहे!..................क्या बात है!!!

चांगली झाली आहे गझल.

''इन्सान'' तेवढा खटकला.

Rofl

ह्या चौकटी कसल्या आहेत ज्या मला दिसताय्त प्रत्येक् प्रतिसादात?? अन् त्याखाली असलेल्या "+" वर टिच्की मारली की चौकटीत एक अंक येतो !

का- य -आ -हे -हे -कु -णी -सां- गे -ल -का..........प्लीज!

खटका लागणे=????

डिक्षनरीतला सविस्तर अर्थ शोधून सांगीतला नाहीत तरी चालेल नेहमीच्या वापरातला नेमका अर्थ हवा आहे

वैभव बाळा विचार कर!
बरेच अर्थ आहेत खटका शब्दाला.......
१) मी म्हणजे जणू काठी किंवा चाबकाचा फट् असा होणारा आवाज आहे का?

२) मी म्हणजे कुणी भांडण किंवा झगडा आहे का?

३) मी म्हणजे कुणी झटका देवून निर्माण केलेला मिश्र आवाज आहे का?

४) मी म्हणजे कुणी अडकण आहे का?

५) मी म्हणजे कुणी खट् असा आवाज करणारे मळसूत्र आहे काय?

६) मी म्हणजे कुणी मनात आलेला वा राहणारा संशय आहे का?

७) मी म्हणजे कुणी पुजेचे साहित्य करणारा माणूस आहे का?

वगैरे, वगैरे.......


.............प्रा.सतीश देवपूरकर