पुणेरी पाटी
प्रस्तुत लेख काल्पनिक आहे, त्याचा वास्तवाशी कसलाही संबंध नाही.
या लेखात उल्लेख केलेल्या व्यक्तींचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही.(माबोशी असू शकतो).
कुणीही वास्तवाशी संबंध जोडायचा प्रयत्न करू नये. असे केल्यास लेखक जबाबदार राहणार नाही...
आदेशावरून,
-चकल्या
--------------------------------------------------------------------------------------------------------
२१ डिसेंबरला मायन दिनदर्शिका संपल्या आणि कालनिर्णयच्या दिनदर्शिका मार्केट मध्ये येण्याला टायम होता, तिकडे मल्ल्या गायब झाले आणि किंगफिशरचे कॅलेंडरही बोंबलले. त्यामुळे २१ डिसेंबर नंतर कुठलीही दिनदर्शिका नसल्याने, आणि तारीख तिथी उपास-तपास सण असे काहीच ठरले नसल्यामुळे, वेळापत्रकाप्रमाणे देवाजींनी जगबुडी करवली. सगळे अगदी सुरळीत पार पडले. लोकांनी फार गोंधळ घातला नाही , सगळे अगदी लायनीपरमाणे चित्तरगुप्ताकडे जाऊन उभे राहिले. चित्रगुप्ताचीही ही पहिलीच वेळ होती, पण त्याने ६ सिग्मा आणि इतर प्रोसेस ट्रेनिंग घेतली होती त्यामुळे एवढी मोठी गर्दी अगदी व्यवस्थित हाताळली. पोलीस संरक्षण चोख होते, हिवाळ्यात जगबुडी झाल्यामुळे लोकांना गर्दीत उन्हाचा त्रास झाला नाही, चहाची सोय केली नसल्याबद्दल बर्याच लोकांनी तक्रार वहीत तक्रार केली. काही जणांनी विडी काडी मागून बघितली पण स्मोक डिटेक्टर चे कारण देवून चित्रगुप्ताने सर्वाना गप्प केले.
कथा पाडणारे, ललित लिहिणारे , गझल सम्राट , प्रतिसाद लिहिणारे, टीका करणारे, मावळे, कवी, आणि कवीमुळे हैराण झालेले, कवींची कीव करणारे इ इ सर्वच जन होते तिथे. आत्तापर्यंत लपून राहणारे डु आयडी , वेगवेगळे रूप धारण करणारे तसेच या सर्वाना ब्लॉक करणारे अॅडमीन वेबमास्तर असे सगळेच तिथे होते. रोमात राहणारे, जहरी टीका करणारे, चित्रपट परीक्षण लिहिणारे असे सगळेच जमले होते. चित्रगुप्त काकांनी सगळ्यांचे बाड वाचले आणि बर्याच जणांचे जीवितकार्य माबोपुरतेच सिमीत असल्याने अशा सर्वांची पोस्टिंग एकाच ठिकाणी करण्यात आली. आणि तिथेच अडचणींना सुरुवात झाली. तिथे आंतरजालाची सोय अजून झाली नसल्याने आणि त्यामुळे माबोवर जाता येत नसल्याने सगळ्यांचीच चिडचिड होत होती. त्यात सगळ्यांना लिहायची नाहीतर वाचायची सवय, बोलायची तशी फारशी सवय नसल्याने अजूनच प्रोब्लेम. असो, जामच गोची झाली एकंदरीत.
गगो, कॉफीहाउस, विविध ठिकाणाचे धागे जसे पार्ले कोल्हापूर, हैदराबाद इ इ काही म्हणजे काहीच नसल्याने सगळे एकत्र असले तरी गप्पा मारायला हक्काची जागा गेल्याने सगळ्यांचीच तोंडे बघण्यासारखी झाली होती. बरे किती वाजले हेही कळायला मार्ग नव्हता त्यामुळे सुप्पर्भात म्हणावे की शुरा यावरही मंडळींचे एकमत होईना. तेवढ्यात कुणीतरी "मी जिवंत आहे " असे म्हटल्यावर चीत्रगुप्ताही हसले. बाकीचे मात्र एकमेकांना स्मायली कशा पोस्टायच्या असे विचारत होते. स्मायलीच नसल्याने पब्लिक हसले नाही. नंतर कळले "मी जिवंत आहे "असे म्हणणारे उड्डयन आहेत. यावर तो असेच म्हणतो असे एक-दोघेजण म्हणाले. घड्याळे कोणत्या time zone मध्ये सेट करायची यावर धागा उघडण्याची काही मंडळीना घाई झाली होती , पण ना मा यांनी आंतरजाल नाही तसेच वेळ वाचवून आणि बघून करायचे काय अशी मुलभूत शंका उपस्थित केल्याने तोही मुद्दा रद्दबादल झाला. यावर त्यांना तिथल्या तिथे पन्नासेक मोदक देण्यात आले.
तेवढ्यात मंडळींचे लक्ष स्वताच्याच तंद्रीत कसल्यातरी फिकिरीत असणार्याकडे गेले. ते तपकीर असल्याचे कळले. तपकीर यांना तेवढ्यात कुणीतरी चमन कधी पूर्ण करणार असे विचारून घेतले. त्यांच्या २४ पैकी उर्वरित ९ प्रकरणाविषयी मात्र काही जणांना अजूनही शंका आहे. शुचँप यांनी चीत्रागुप्ताकडे मानवीय हा धागा काढण्याची विनंती केली. त्यावर प्रत्येकाला कुठल्याशा मानवाची बाधा कधीतरी झाल्याचा साक्षात्कार झाला. पण प्रतिसाद द्यायला जागाच नसल्याने सगळेच शांत बसले. बरं, विपुचीही सोय नसल्याने खाजगी गप्पा मारण्याचीही सोय नव्हती. नावालाही धागा नसल्याने भलताच गुंता झाला होता एकंदरीत. असो. सगळ्यांचे वय सारखेच असल्याने शिशु-साहित्य, चाळीशीनंतर काय, रोज रात्री शोडषेला, आणि अॅडल्ट साहित्य लिहिणार्यांना काय करावे असा प्रश्न पडला? यावर कोणीतरी धार्मिक धागा काढण्याची उपसूचना मंडळी, त्यावर बर्याच वेळ इकडे तिकडे बघून शांत बसणाऱ्या दोघा-तिघांना भलताच उत्साह आला. दोघा तिघांना त्यांनी केळी, पाणीप्या , खंबा, खंबा१, खंबा२ अशी नावे सांगितली पण तरीही कुणालाच अर्थबोध होईना. इक्कीस्बीस कि कुणीतरी 'इक्कीस्बीस' ची मज्जा खरी ओळख लपवण्यातच आहे असेही सांगत होते. त्यावर शेव शेव असे नक्की नक्की कि कुणीतरी म्हणत राहीले. इतर मंडळी अमृताच्या अमलाखाली असल्याने फक्त माना डोलवत होती.
पार्ले नसल्याने आंबट शौकीन फारच निराश झालेले दिसले. वर येताना ट्रफिकचा त्रास याविषयी धागा काढायची इच्छा मात्र काहींनी बोलून दाखवली. काही मावळे उडीबाबा शॉट कुठे काढता येतील या विचारात होते, तसेच दुर्गभ्रमण करायचे प्लॅन आखत होते. त्या ग्रुप मध्ये सारखा 'जळला जळला' असा काहीतरी चाललं होतं. इथे जाळ करायचा नाही अशी सक्त सूचना चित्रगुप्ताकाकांनी दिल्यावर मात्र ग्रुप शांत झाला. दादा यांनी शेवाळ्याची भेट असा काहीतरी चालू केला, त्यावर दगडीकाचा यांनी प्रोफेसर देवसोड यांचा उल्लेख करून पाहिला, देव हे नाव ऐकल्याबरोबर कुणीतरी गझलेला सुरुवात केली, मग गझलेला पूर आल्यावर कर जोडूनी समस्त जनता पूर ओसरण्याची वाट बघत थांबली. लोकांनी पर्यायी देवून पहिले परंतु काहीच फायदा झाला नाही. शेवटी कुणीतरी गर्भ-शास्त्र विषयावर बोलायला सुरुवात केल्यावर गझला ओसरल्या. तोपर्यंत मंडळी पूर्ण घायाळ झाल्याने पुढे काही बोलायच्या मनस्थिती नव्हती.
कुणीतरी शटरडाऊन म्हटल्याने मंडळीनी सवयीप्रमाणे निद्रादेवीची आराधना करायला घेतल्याने अचानक झालेले गटग सफळ संपूर्ण झाले
पार्ले नसल्याने आंबट शौकीन
पार्ले नसल्याने आंबट शौकीन फारच निराश झालेले दिसले.>>>>>>>> हे कळ्ळं नाही
>>>
तिथे कधी कधी रात्री भजनी मंडळ असते म्हणुन लिहिलय ते
छानच हसून हसून गडबडा
छानच हसून हसून गडबडा लोळण
आणखी लिहायच होतत. स्मित
>>>
इच्छा होती पण थोडक्यात उरकले
मस्तच......................चि
मस्तच......................चिखलेश्वर........
.
.
अजुन जरा मायबोलीवर फिर.... अजुन तुला जास्त स्वभाव, वाक्य मिळतिल
>>>
माहित असुनही नाही लिहिले.
बेफाम.. भन्नाट... अचाट येताय
बेफाम.. भन्नाट... अचाट

येताय ना रे सगळे २२ डिसेंबरला ?
धन्स चाफ्फा
धन्स चाफ्फा
ठ्ठोऽ ! गटग शीर्षक वाचून
ठ्ठोऽ !
गटग शीर्षक वाचून धागा उघडलाच नव्हता मी. मग दिसलं अरे, विनोदी मधे आहे. तर हे दिसलं!
इक्कीसबीस म्हंजे अस्मादिक काय हो?
छान चाल्लंय! चालू द्या.
हा हा हा.. बाकीचे मात्र
हा हा हा..
बाकीचे मात्र एकमेकांना स्मायली कशा पोस्टायच्या असे विचारत होते. स्मायलीच नसल्याने पब्लिक हसले नाही. हे सगळ्यात ब्येष्ट होते....
रच्याकने, खरी नावे वापरली असतीत तरी काहीसुद्धा हरकत नव्हती..
खरी नावे वापरली असतीत तरी
खरी नावे वापरली असतीत तरी काहीसुद्धा हरकत नव्हती..
<<
अणु मोदक
-अमृताच्या अमलाखालील )इब्लिस(
" त्यावर शेव शेव असे नक्की नक्की कि कुणीतरी म्हणत राहीले. इतर मंडळी अमृताच्या अमलाखाली असल्याने फक्त मना डोलवत होती. "
जबरी ....!!!
जबरी ....!!!
इक्कीसबीस म्हंजे अस्मादिक काय
इक्कीसबीस म्हंजे अस्मादिक काय हो? डोळा मारा
>>
१० पैकी १० तुम्हाला
बाकीचे मात्र एकमेकांना
बाकीचे मात्र एकमेकांना स्मायली कशा पोस्टायच्या असे विचारत होते. स्मायलीच नसल्याने पब्लिक हसले नाही. हे सगळ्यात ब्येष्ट होते....
>>>
धन्स
खरी नावे वापरली असतीत तरी काहीसुद्धा हरकत नव्हती..
>>>
खरी नाव वापरली असती तर लेख खुसखुशीत नसता झाला. म्हणुन
मस्त मस्त ..भन्नाट कल्पना.,
मस्त मस्त ..भन्नाट कल्पना.,
कसे काय हे मिसले मी कोणास
कसे काय हे मिसले मी कोणास ठाऊक.....
मस्तच लिहिलेयस रे...
छान
छान
१० पैकी १० तुम्हाला<< चला,
१० पैकी १० तुम्हाला<<
चला, माबोवरच्या दखलपात्र 'गुन्हेगारांत' माझा पण फोटू लटकलाय तर
धन्स सर्वाना
धन्स सर्वाना
चिखल्या (की चकल्या म्हणू?),
चिखल्या (की चकल्या म्हणू?), मस्त कल्पना!
आ.न.,
-गा.पै.
चिखल्या एक गंमत.. सिमीलर
चिखल्या एक गंमत.. सिमीलर पोस्ट त्या २१ डिसेंबरच्या बाफवर टाकलेली
Kiran झणझणीत | 9 December, 2012 - 21:24
२२ तारखेला खालीलप्रमाणे नवीन ग्रुप्स सदस्यांना जॉईन करावे लागतील.
१. कैलासवरचे हितगुज
२. वैकुंठातले हितगुज
३. स्वर्गातले हितगुज
४. नरकातले हितगुज
५. पाताळलोकीचे हितगुज
सदस्यांना वाहती पाने सुरू करता येतील. त्यासाठी मा. प्रशासक श्री. चित्रगुप्त यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्येक ग्रुपचे संचालक नेमलेले असून त्यांचा शब्द अंतिम राहील. कैलास हितगुज ग्रुपचे श्री महादेव त्रिनेत्रीकर हे संचालक आहेत. वैकुंठाचे संचालक श्री विष्णूपंत सुदर्शनवाले असून त्यांच्या अनुपस्थितीत श्री शेषनाग अष्टमुखे यांचेकडे संपर्क साधण्याची इथे सोय असेल. स्वर्गाचे नियंत्रण श्री इंद्रसेन पाटील यांच्याकडे आहे तसेच इतरही हितगुज बाफचे नियंत्रण परिस्थितीनुसार ते करू शकतात. नरक आणि पाताळीचे संचालक श्री प्राणनाथ स्वामी हे आहेत. त्यांची यम या पदी नेमणूक असल्याने इतर विभागातही त्यांचा संचार असून नवे सदस्य पकडून आणण्याचे आणि गरजेनुसार एका विभागातून दुस-या विभागात सदस्यांची बदली करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील. यासाठी ऑडीटर जनरल श्री चंद्रगुप्त हसबनीस यांच्या चोपडीतल्या नोंदींचा आधार घेतला जातो, श्री चंद्रगुप्त हेच कॅगचे प्रमुख असल्याने सर्व व्यवहारांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. एखाद्या सदस्याच्या गंभीर गैरवर्तणुकीचा त्यांनी अहवाल सादर केल्यास त्या सदस्याची रवानगी इक्वाक्षूशी हितगूज या ग्रुपमधे करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
हुकूमावरून.
जाहीरात
जगबुडी साडी सेंटर
आजच भेट द्या !
धन्स
धन्स
(No subject)
Pages