किल्ला

Submitted by तुषार जोशी on 11 December, 2012 - 14:16

दिवाळीचे किल्ले पाहून
किल्ला करायची आयडिया आली
आईला विचारून कंपाऊंडच्या
भिंतीबाहेरची जागा ठरली

मैत्रीणीच्या आणि बहिणीच्या
मदतीने मग माती जमली
दगड पाने काड्या आणले
कामे करून सगळी दमली

स्प्राइटच्या बाटलीत पाणी
माती सारवली पाण्याने
किल्ला सजवून झाल्यावरती
सगळी नाचली आनंदाने

आईला ओढूनच आणले
बाबाला किल्ला दाखवला
गालामध्ये हसला बाबा
म्हणाला किल्ला खूप आवडला

तुषार जोशी, नागपूर
(कविता चिंगूचिंटू साठी)
भुर्रध्वनी: +९१ ९८२२२ २०३६५
१२ नोव्हेंबर २०१२, १४:००

Group content visibility: 
Public - accessible to all site users