दाटते आहे निराशा फार हल्ली (तरही)

Submitted by इस्रो on 11 December, 2012 - 07:35

चेहरे बेजार दिसती फार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

नवनवे आजार होती माणसांना
वाढले आहे प्रदूषण फार हल्ली

सोंग पैशांचे कुणी आणेल कैसे ?
कर्ज घ्यावे लागते फार हल्ली

खेळण्या मैदान नाही आज कोठे
राहिली झाडे कुठे पण फार हल्ली

हासण्याचीही ठरविली वेळ त्यांनी
हास्यक्लब निघतात येथे फार हल्ली

विसरले शिकवण, गुणी नेत्यासही, अन
स्मारकाचा वाद त्याच्या फार हल्ली

शपथ घेती बोलण्यासाठी खरे, पण
बोलती ते लोक खोटे फार हल्ली

राजकारण, खून चोरी, जाहिराती
दैनिकांना विषय नाही फार हल्ली

बोलती "काका" मला जेव्हा तरुणी
वाटते मज जाहले वय फार हल्ली

भरवसाही राहिला कोठे कुणाचा
कुंपणेही शेत खाती फार हल्ली

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०,
ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहिदभाई!!........ ही नक्की गझलच आहे का ? 'फार हल्ली' ही फार्फार तर रदीफ्र होईल काफिये कुठेय्त मग?
गंडला आहात की काय असे प्रथमदर्शनी वाटते आहे पण असा नियम वगैरे असेल तर माहीत नाही
माझे काही चुकत असल्यास क्षमस्व !!