सुके चिकन

Submitted by प्रगती जाधव on 8 December, 2012 - 03:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो चिकन,२ कान्दे, २ चमचे आल्/लसुन पेस्ट, अख्खा मसाला,हळद, आगरी मसाला,गरम मसाला,खोबर्याचे वाटन, कोथिम्बिरी, लिम्बु.

क्रमवार पाककृती: 

१) सर्वात प्रथम चिकन धुवुन घ्यावे. त्यात हळद, मिठ्,लिम्बु घालुन आर्धा तास मरिनेट करावे.
२)टोप ग्यस वर ठेवावे. त्यात तेल टाकवे. गरम झाल्यावर त्यात अख्खा मसाला टाकावा.आल्/लसुन पेस्ट टाकावी.चिरलेले कान्दे टाकावे. कान्दा गुलाबिसर झाला कि त्यात आगरी मसाला घालावा.
३) २ मिनिटे परतुन त्यात मरिनेट केलेले चिकन टाकावे.चान्गल्या प्रकारे मिक्स करावे.टोपावर झाकन ठेउन शिजवावे(पाणि न घालता).
४) ग्यस मन्द करावे.१०-१५ मिनिटा नन्तर चिकन चमच्याने वर्-खाली करावे.परत टोपावर झाकन ठेवावे.थोड्या वेळाने झाकन उगडुन बघावे.चिकन शिजले असेल तर चिकन मधिल पाणि आटु द्या.त्यात खोबर्याचे वाटन टाकावे.आता झाकन ठेउ नका.
५)चिकन टोपाच्या तळाला लगणार नहि याचि काळजी घ्या.
६) आता त्यात गरम मसाला घालुन चमच्याने वर्-खाली करावे.व ग्यस बन्द करावे.आता हे चिकन प्लेट मधे काढुन त्यावर कोथिम्बिरी घालुन व लिम्बुची फोड ठेउन भाकरी बरोबर खायला द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

पाणि न घालता बनवावे. फक्त वाफेवर शिजवावे.

माहितीचा स्रोत: 
स्वतः
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users