भारतात हेल्थ इन्श्युरन्स आणि वार्षिक आरोग्य तपासणी प्लॅन

Submitted by सावली on 6 December, 2012 - 12:03

भारतात हेल्थ इन्श्युरन्स घेऊन फायदा आहे का? लोक घेतात का? आणि महत्वाचे म्हणजे त्याचा उपयोग होतो का?
या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स मधे वार्षिक आरोग्य तपासणी फ्री / कमी चार्जेस मधे होते का?

भारतातल्या हेल्थ इन्श्युरन्स बद्दल तुमची मतं आणि चांगले वाईट अनुभवही इथे लिहीलेले चालतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कंपनीथ्रू घेतलेली पॉलिसीच वापरतो. हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस क्व्हर आहेत. त्याआढीच्या कंपनीत आजारपणात घालवलेल्या दिवसांचा बेसिक पण मिळायचा. पण कुठेही हॉस्पिटलाझेशन हवेच (२४ तासांपेक्षा जास्त)

एकंदरीत खूप कागदकाम आहे यात. कंपन्यांच्या ग्रुप पोलिसीज असल्याने बरं पडतं. सध्या स्टार ईन्शुअरन्सचं नाव चांगल ऐकतोय पण बाकिच्या बर्‍याच कंपन्या ड्याम्बिस आहेत.

सगळ्याच कंपन्या ड्यांबिस आहेत.
i am on the other side of the table.

डॉक्टर म्हणून सांगतो. पॉलीसी घ्यायची. अन त्या एजंटची गच्ची धरायची तयारी ठेवायची. हे कराल तरच उपयोग आहे.
पॉलिसी घेताना कोणतेही आधीचे आजार लपवू नका. पॉलिसी नीट वाचा. उदा. मला बीपी आहे, तर माझे बायपासचे बिल पास होईल की नाही? प्यारालिसिस झाला तर काय? हे विचारा, अन लिहून घ्या. मगच पॉलिसी घ्या.

तुम्हाला पेशंट म्हणून पैसे देताना, अन मला डॉक्टर म्हणून पैसे देताना, दोन्हीवेळा तितकाच त्रास देतात हे लोक. अती हलकट. अन मधे एक TPA प्रकार घातला आहे. या टीपीए-वाल्यांना त्यांच्या माताभगिनींची आठवण करून दिल्याशिवाय बर्‍यांचदा काम होत नाही. (संपादक, माफ करा) आधीपासूनच ऑफेन्सिव्ह वर रहावे, हे उत्तम.

तरीही,
हेल्थ इन्शूरन्सची गरज आहेच.
त्याशिवाय तुमची वाट लागणार आहे.
मा. आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य एक नवा कायदा पास करू पहात आहेत, जो स्टेट लेव्हलला इम्प्लिमेंट होईल, (केंद्राने चेंडू ढकललाय, अन एम्पी वै स्टेटसनी रिजेक्ट केलाय) हा आला, तर सर्दी खोकल्यासाठी वोखार्ड्ट गाठावे लागेल हे ध्यानी असू द्या. आम्ही डॉक्टर म्हणून रान उठवतो आहोतच, पण एकंदर विधानसभेत बिलं पास करण्याची पद्धत पहाता हे बिल जर आले, तर आपल्या प्रगत महाराष्ट्राट तुमचे डॉक्टरचे बिल आभाळ फाडून वर जाईल हे ध्यानी ठेवा Wink (परवा सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनात हे बिल 'टेबल' होईल)

(each year 3% of population is pushed below poverty line because of paying medical bills in India. : WHO stats)

इन्श्युरन्स कंपन्या इमानदार नसतात हे जरी खरे असले तरी अजिबातच कव्हर नसण्यापेक्षा नक्कीच बरे . इतर प्रायव्हेट कंपन्यंपेक्षा न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी जास्त भरवशाची आहे.

हेल्थ इन्शुरन्स घ्या. नाही घेतला म्हणून आपण आपल्या आधीच्या पिढ्यांना बोल लावतो, ती संधी आपल्या पुढच्या पिढ्यांना अजिबात देऊ नका Proud

बाकी, कुठल्याही हॉस्पिटलात गेलात तरी पहिला प्रश्न असतो, 'इन्शुरन्स आहे का?'. असेल तर डॉक्टरांचे विशेष प्रेम आपल्याला लाभते हे लक्षात घ्या. Wink

ओरिएन्टल इन्शुरन्सचे प्लान चांगले आहेत असे वाटते. आणि ग्रूप पॉलिसींचा चांगला उपयोग होतो.

इब्लिस म्हणतात तसे सूक्ष्म अक्षरांत लिहिलेली असली तरी पॉलिसीची प्रत्येक अट स्वतःच्या डोळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या, 'ओह माय गॉड!' व्हायला नको.

मेडीक्लेम ब-याच प्रमाणात उपयुक्त ठरतो. पण त्यात सुद्धा रोग ठरलेले असतात, प्रत्येक वेळेस पॉलीसी कामाला येतेच असे नाही. कॅशलेस इन्शुरन्स सुद्धा उपयोगी आहे.

tataaig general insurance lifetime gurranted renewal with no capping pocily det ahe jar kuni interested asel tar mala smaprk kaeu shakata....

ओरिएन्टल इन्शुरन्सचे प्लान चांगले आहेत असे वाटते. आणि ग्रूप पॉलिसींचा चांगला उपयोग होतो. > ओरिएन्टल इन्शुरन्स प्रिमिय्म कॅल्क्युलेटर ची कोणाला माहिती आहे का ? त्यांच्या वेब्साईट वरची लिंक ओपन होत नाहीये .

काही nationalize बँका जर खाते असेल तर स्वस्त दरात हेल्थ इन्श्युरन्स देतात. PNB चे खाते असेल तर ५ लाख रुपयाचे family ओरिएन्टल इन्श्युरन्स ६७०५ मध्ये मिळते. (https://www.pnbindia.in/en/ui/Content.aspx?Id=247) Bank of Baroda account holder will get you new India assurance. They have clear terms and conditions on website.

मी माझ्या आई वडला साठी २००७ मध्ये बँक औफ ईडिया मधुन हेल्थ इन्श्युरन्स घेतला होता. २०१२ मध्ये आईला cancer treatment साठी इन्श्युरन्स चे पुर्ण पैसे वापरले. पुर्ण व्यवहार cashless झाला. ( cashless is available for in network hospitals only). जशी हॉस्पिटल ची बिले येत होते तसे पैसे जात होते. आजुनही वडलाकडे तिच पॉलिसी आहे. वयाच्या ६५ वर्षापर्यन्त पोलिसी घेउ शकतो ( बाबानी ६४ वर्ष १० महिने असताना घेतली आहे. ) . वयाचा ८० वर्षा पर्यन्त पॉलिसी renew करु शकतो.

हेल्थ इन्श्युरन्स घेताना सगळ्या अटी वाचुन घेणे. cashless कुठल्या hospitals मध्ये आहे ते पण पहाणे.

Emergency मध्ये सुरवातिचे एक दोन दिवस रोख रक्कम भरावी लागु शकते. TPA फक्त सोमवार ते शुक्रवार काम करतात. जर शुक्रवारी रात्री Emergency मध्ये admit केले तर मंगळवार पर्यन्त चा खर्च रोख द्यावा लागत्तो.

‘Insurance is a subject matter of solicitation.’ It essentially means that insurance has to be requested or asked for, not sold