पेंच नॅशनल पार्क

Submitted by _सचिन_ on 5 December, 2012 - 07:08

आम्ही येत्या २६ तारखेला पेंच च्या जंगलात ३-४ दिवसांसाठी जाणार आहोत. तेथे रहाण्याची चांगली व्यवस्था (हॉटेल्स) कोठे होउ शकेल (खुप खर्चीक नको पण रुम्स a/c असल्यास उत्तम)? ४ लोकांसाठी साधारण कीती खर्च येइल?
अनुभव/ माहीती असेल तर नक्की कळवा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेंच नॅशनल पार्क २५७ कि.मी क्षेत्रफळ असलेले सातपुडा पर्वत रांगांत वसलेले हे भारताचं २५ वे नॅशनल पार्क व टायगर रिझर्व आहे.पेंच नदीवरून ह्या पार्कला पेंच नॅशनल पार्क हे नाव पडले आहे. पर्वत रांगा व दर्‍याखोर्‍यांत वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

नागपूर पासूनचे अंतर ८० कि. मी.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे.
फोन नं. ०७१२-२२५३३२५