भगवंता

Submitted by वैभव फाटक on 3 December, 2012 - 13:44

शरण आलो तुला, पण संपला ना त्रास भगवंता
तुझ्या असण्यावरी ठेवू कसा विश्वास भगवंता ?

प्रपंचातून जर आहे दिला मी वेळ भक्तीला
कशाला सांग मी घेऊ उगा संन्यास भगवंता ?

नको छेडूस प्रश्नाला "पुरे की आणखी देऊ ?"
मनुष्याने कधी म्हटलेच नाही 'बास' भगवंता

कधी कळणार लोकांना, कसे जिंकायचे तुजला ?
मनी अंधार वसला अन घरी आरास भगवंता

जगाची सर्व दु:खे दूर करणे शक्य का नाही ?
कदाचित तोकडे पडले तुझे सायास भगवंता

वैभव फाटक ( ३ डिसेंबर २०१२)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/12/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मनी अंधार वसला अन घरी आरास भगवंता<<<

निवडक दहातील ओळ!

एकंदर संपूर्ण गझल फार सुरेख आहे.

सर्व शेर उत्तम! अभिनंदन वैभव!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

जगाची सर्व दु:खे दूर करणे शक्य का नाही ?
कदाचित तोकडे पडले तुझे सायास भगवंता >>>>

भक्तिमय रचना.... इन माय टेन Happy

अशक्य सुंदर.

सुरेख, छान, अप्रतिम....सर्व विशेषणे फिकी पडतील अशी जबरी रचना.

अगदी म्हणजे अगदीच जमलेली रचना.

सर्वांगसुंदर गझल. अतिशय आवडली.

रदीफ अत्यंत उत्कृष्टरीत्या निभावलेली आहे.

अजून येऊद्यात.

सर्वच शेर सर्वांगसुंदर...

मस्त गझल

नको छेडूस प्रश्नाला "पुरे की आणखी देऊ ?"
मनुष्याने कधी म्हटलेच नाही 'बास' भगवंता

कधी कळणार लोकांना, कसे जिंकायचे तुजला ?
मनी अंधार वसला अन घरी आरास भगवंता

सुंदर... अप्रतिम....