दोन मुक्तके

Submitted by सतीश देवपूरकर on 2 December, 2012 - 00:06

दोन मुक्तके
(उधळतोय!)

हृदयाच्या पडवीमध्ये किरणांचा वळीव आला!
अंधार प्रकाशामध्ये मनसोक्त अवेळी न्हाला!
अंधारच होता येथे, मी जन्म काढला तेव्हा;
आयुष्य संपले तेव्हा सूर्योदय येथे झाला!
..............................................................

दवडून वाफ तोंडाची मी उगाच वटवट केली!
सुकवून कंठ, डोक्याला मी माझ्या कटकट केली!
बदलले तसूभर नाही जन्मात कधीही कोणी;
जी करायची ती माझी दुनियेने फरफट केली!

---प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
त्यादिवशी प्रत्यक्ष तुमच्याकडून ऐकलीच होती
पण गझलेच्या विभागात अस्थानी आहेत सर कविता विभागामध्ये हलवा
सार्वजनिक करा सगळे वाचू शकतील

मुक्तके ही गझलेसारखीच असतात. दोन, दोन मुसलसल शेरांचे एक मुक्तक होते!
दोन मुक्तके म्हणजे दोन दोन मुसलसल शेर!

धन्यवाद वैभवा, भूषणराव!
भूषणराव! रुबाईबद्दल काही माहिती वा संदर्भ असल्यास सांगाल का?
काही रुबायांची वृत्ते माहीत असल्यास सांगाल का?
प्रा.सतीश देवपूरकर