दोनेक वर्षांपूर्वी आम्ही ज्या कोणत्या वेळेला तोरण्याला जायचे नक्की केले जायला निघालो होतो ती वेळ म्हणजे खरोखरच एक उत्तम मुहुर्त असावा. त्या मुहुर्तावर ठरवलेले कुठलेही कार्य निर्विघ्नपणे, विनाविलंब, विनासायास, सफल संपूर्ण झालेच असते.....
सगळे कसे जुळून आले होते.
सकाळी ५ ला निघायला ठरवून आणि एकूण १०-१२ जणं वेगवेगळीकडून येणार असतानासुध्दा निघायला अजिबात न झालेला उशीर...
पावसाळा असताना देखिल पावसाने न दिलेला त्रास.....
खूप म्हणजे खूप प्रमाणावर फुललेली रानफुलं....
आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अत्यंत अनपेक्षितरित्या दिसलेले इन्द्रवज्र....
बघा ही प्रकाशचित्रे आवडताहेत का ते!
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
मस्त आहे. मला तो १८वा फोटो
मस्त आहे. मला तो १८वा फोटो आवडला. गोगलगायीचा एकदम मस्त आहे,
इंद्रवज्र पन भन्नाट
बरोबर आहे. खरं तर अशा रोज गड
बरोबर आहे. खरं तर अशा रोज गड चढणार्या / उतरणार्या माणसांमूळेच गडावरील लोकांचे जीवन सुसह्य झाले असणार.
आजही रत्नागिरीच्या बाजारात, आजूबाजूच्या डोंगरावारच्या गावातून बायका येतात. ( पण येताजाता आपल्या पूर्वजाला शिव्या घालतात. )
०००
पण एक नक्की, या बीबीवरच्या फोटोंचे अँगल हे नेहमीच्या दूर्गभ्रमण करणार्या मंड्ळींच्या अँगल्सपेक्षा खासच आहेत
धन्यवाद नंदिनी, "पण एक नक्की,
धन्यवाद नंदिनी,
"पण एक नक्की, या बीबीवरच्या फोटोंचे अँगल हे नेहमीच्या दूर्गभ्रमण करणार्या मंड्ळींच्या अँगल्सपेक्षा खासच आहेत"
धन्यवाद दिनेशदा - पण तुम्हाला कसं कळलं की फोटो काढताना मी एक डोळा मिटून घेतो ते!
@ सेनापती.... "...कारण गड
@ सेनापती....
"...कारण गड उतरून-चढून येणे यात त्याकाळी फार मोठी गोष्ट नसेल....."
~ हा मुद्दा पटला. त्याला कारण म्हणजे 'त्याकाळी' च नव्हे तर आम्हाला अगदी चक्क २००४ मध्ये भुईकोट आणि गडेकोट येथील बाजार दरात तसेच तेथील वस्तीतील लोकांच्या गड चढणे वा उतरणे या वृत्तीत काही फरक जाणवला नव्हता. अनुभव असा की, किल्ले रायगड आम्ही आठ मित्र चढून वर गेलो.... दोन अडीच तास तर लागले असतील....गरगरीत कोल्हापुरी मित्रमंडळी असल्याने दर आठदहा मिनिटांनी शॉर्ट रेसेस असायचीच. तर रात्री ८ वाजता गडावर पोचलो आणि मुक्कामही तिथेच ठरला. आमच्याशिवाय तिथे अन्य टूरिस्ट दिसले नाहीत. त्यावेळी कॅन्टीन्सची आज आहे तशी जास्त सुविधा नव्हती. गडावर असलेल्या एका छोट्या कॅन्टीनमधील मोरे नामक एका गृहस्थाने आणि त्याच्या कुटुंबाने आम्हाला जेवण करून द्यायचे कबूल केले. ताटाचा दरही मान्य करण्याजोगाच असल्याने तिथेही तक्रारीला वाव नव्हताच. चांदणे पिठूर असल्याने थोडा वेळ तिथेच भटकत राहू असा विचार आम्ही करत असतानाच मोरेंचाच अंदाजे दहाएक वर्षाचा मुलगा मोठी पिशवी हातात घेऊन घरातून बाहेर पडताना मला दिसला. सहज करायची म्हणून चौकशी केली की तो कुठे चाललाय ? तर मोरेनी उत्तर दिले, "आठ जणांना पुरेल एवढा तांदूळ नाही, म्हणून पोरग्याला गडाखाली गावात पाठवतोय...". मी आणि दुसरे दोन मित्र चक्क हादरलोच. म्हणजे आता रात्री ८ वाजता तो दहा वर्षाचा मुलगा असा बिकट गड उतरणार....तांदूळ घेणार आणि परत गड चढायला सुरू करणार ? बाप रे ! आम्ही तात्काळ त्या गोष्टीला नकार दिला आणि 'जी काही भाकरीभाजीपिठलं करा आणि असेल तितकेच आम्हाला वाढा....पण पोरग्याला अशा अवेळी भातासाठी खाली पाठवू नका..." असे स्पष्ट सांगितले. मोरेना आमच्या विनंतीचे आश्चर्य वाटत होते असे दिसले, कारण त्यांच्या तसेच त्या मुलाच्याही दृष्टीने त्या वेळीही गड उतरणे तसेच पुन्हा चढणे ही काही फार मोठी गोष्ट नव्हती हे स्पष्टच दिसत होते. तरीही मुलाला आम्ही जाऊ दिले नाहीच पण माझ्या लक्षात आले नसते तर तो नक्की तांदळासाठी खाली गेला असताच.
....अन् आयत्यावेळी आमच्यासाठी त्याला जावे लागले असते म्हणून 'ताटा'चा दर मोर्यांनी जादाचा लावला नसता याचीही खात्री होती.
@ हर्पेन.....'इन्द्रवज्र' ने मोहिनी घातली आहे. 'तोरण्या' ला भेट दिली होती पण पावसाळ्यात नाही...त्यामुळे आज हे पावसाळी हरिताचे फोटो पाहताना मन एकदम प्रसन्न झाले आहे.
अशोक पाटील
तुमच्या प्रचितून एका
तुमच्या प्रचितून एका निसर्गरम्य ठिकाणाची सफर झाली.. धन्यवाद.
अशोकदा.. आपण कधी जायचे एकत्र
अशोकदा.. आपण कधी जायचे एकत्र रायगडी?
हर्पेन.. नजर सरावली ना आता
हर्पेन.. नजर सरावली ना आता माझी
अशोक / सेनापती.
गडावरच्या प्रत्येक गरजेचा विचार करुन बघा, खुप प्रश्न पडतात.
रात्री गडाच्या प्रत्येक महाली / बुरुजावर मशाली असणार. पहारेकरी / गस्त घालणारे, सगळ्यांच्याच हाती. म्हणजे तेवढे तेल पाहिजे. ते तेल कसले ? त्या तेलाच्या घाणी गडावर असतील, तर पेंडेचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर होत असणार.
घोड्यांना चारा पाहिजे. तो पण खालूनच आणायला पाहिजे ( आजही माथेरानसाठी हिच प्रथा आहे. )
कोष्टी असतील, तर त्यांचे माग गडावर असतील का ? एवढे सगळे गडावर करण्यापेक्षा, खालूनच बस्ते आणणे सोपे.
लोहार असणार, शस्त्र निर्मिती, डागडुजी साठी, पण त्यांचा कारखाना गडाखाली असणार.
वैद्य नक्कीच असणार, पण त्यांची औषधे आणण्यासाठी गडाखाली जायला पाहिजे.
देवपूजेसाठी फुलझाडे असतील, बेलाचे एखादे झाड पण नक्कीच. पण बाकीची फळझाडे ?
काय फळे खाल्ली जात असतील. केळी, पेरु, सिताफळे, रामफळ, कवठ.. आजही आठवडी बाजारात हिच
फळे असतात. करवंदे, जांभळे, बोरे नक्कीच असतील.
ज्योतिषी, पुजारी कायमचे असतील. कारण त्यांचे भांडवल म्हणजे बुद्धीमत्ता व अनुभव. पण बाकी बहुतेक
जणांना काही कच्चा माल लागणारच.
सुतार असतील तर ते गडावरच ओंडके आणत असतील का खालच्या गावात काम करत असतील ?
सर्व कामासाठी चर्मकार हवेतच. ( जोडे, पखाली, खोगीर ) पण कातडी कमावण्याचे काम, गडाखालीच
करत असतील.
चुन्याच्या घाणीशिवाय ठळक असे काही दिसतच नाही ? किती कमी जाणतो आपण, त्या काळाबद्दल !
मी टाटा ऑईल मधे ट्रेनिंग घेत होतो त्यावेळी त्या कंपनीच्या आवारातच सगळे असायचे. दुरुस्तीसाठी बाहेर क्वचितच जावे लागे. इतकेच काय, पशुखाद्य वगैरे ट्राय करण्यासाठी गायी, कोंबड्या पण होत्या.
असा काही विचार गडाबाबत केला जात असेल का ? रसद साठवायची म्हणजे या सगळ्याची सोय करावी लागणार ना ? आणि रसद तोडायची म्हणजे सगळेच तोडायचे !
दिनेशदा, हे खास आपल्यासाठी
दिनेशदा, हे खास आपल्यासाठी असल्यासारखे आजच्याच महाराष्ट्र टाईम्स मधे आलेले निवेदन
दुर्ग अभ्यास वर्ग - भारत ईतिहास संशोधक मंडळातर्फे येत्या १० ते १९ डिसेंबर या कालावधीत किल्ले या विषयावर दुर्ग अभ्यास वर्गाचे आयोजन दररोज सायंकाळी ६:३० ते ८:३०, किल्ल्यांचे बांधणी, किल्ल्यांवरील व्यवस्थापन, वनस्पती जीवन, सह्याद्री आणि दुर्ग आदी विविध विषयांवर तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. या वर्गासठी शुल्क आकारले जाणार आहे. संपर्क -०२० २४४७२५८१, ९४२३००५६७९
दिनेशदा.. त्याकाळी मुख्य आणि
दिनेशदा.. त्याकाळी मुख्य आणि मोठ्या गडांवर बारा महाल आणि अठरा कारखानें या करिताच असायचे की. लहान गडांवर ते पायथ्याच्या गावात किंवा नजिकच्या मोठ्या ठिकणी असु शकतील.
गडाला वेढा पडल्यास वर्ष-२ वर्ष गड तग धरू शकेल इतके धान्य, चारा, तेल असे सर्व गडावर असायचे. पाणी राखले जायचेच.
Pages