२ आठवडे प्रशिक्षण

Submitted by जाईजुई on 30 November, 2012 - 04:30

माझ्या डच व्यवसायबंधूची १५ वर्षे वयाची मुलगी द्विभाषिक शिक्षण घेत आहे (डच आणि इंग्रजी). त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांना २ आठवडे एकाद्या इंग्रजी भाषिक देशात काम करणे आवश्यक आहे.

११ फेब्रुवारी ते १ मार्च २०१३ ह्या काळात ती माझ्याकडे (ठाणे) रहाणार आहे.

तिच्यासाठी मी योग्य प्रशिक्षण संधीच्या शोधात आहे.

गरजा -
१. ठाणे/मुलुंड परिसरातील व्यवस्थापन
२. सुरक्षित व्यवस्थापन
३. इंग्रजी भाषेचा दैनंदिन वापर
४. प्रशिक्षण संपल्यावर तिच्या अहवालावर स्वाक्षरी

कामाचे स्वरुप -
१. शाळेत/ बालवाडीत मुलांबरोबर शिकवणे, गोष्टी सांगणे
२. डिस्पेन्सरी, हॉस्पिटल, पार्लर, स्टुडिओ, व्यवस्थापन येथे रिसेस्पशनिस्टचे काम
३. एकाद्या NGO मध्ये मदतनिसाचे काम

कोणी यासाठी मदत करू शकेल काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर आयडू यांना संपर्क करून पहा, ते एच आर / रिकृटिंग क्षेत्रात आहेत. त्यांच्या ओळखीत काम मिळू शकेल.
शिवाय रैनाला विचारू शकता. ती देशात नसली तरी तिचे काँटक्ट्स भरपूर असणार.