मी म्हणालो, आहे यंदा पंचवीसावे लागते (कैच्याकै हज़ल?)

Submitted by A M I T on 28 November, 2012 - 07:21

बेफींच्या पंधराव्या लागलेल्या शोडषेवर माबोवर जी विडंबनांची लाट आली, त्याच लाटेवर स्वार होऊन...

ती जुन्या गोष्टी उकरूनी मजसंगे भांडते
कालचेच कारण मजला आठवावे लागते !

मी तिच्या पश्चात चोरूनी सिगरेटी फुंकतो
मेन्टॉसने तोंडाला मग बाटवावे लागते

फासतेस तोंडास जेव्हा पावडर नि फावडर
उगाचच माझ्या जिभेला साखरावे लागते

डझनाने येतात तुझिया मैत्रिणी जेव्हा घरी
माझ्याच घरी मला अनोळखी वावरावे लागते

काय सांगू मालिकांनी काव कित्ती आणिला !
रोज सायंकाळी रिमोट लपवावे लागते

केस नसले म्हणूनी का बाळगू नये कंगवा?
केव्हातरी गुपचुप मिशीला विंचरावे लागते

शेजारच्या शालूने माझे वय मजला पुसता
मी म्हणालो, आहे यंदा पंचवीसावे लागते

हाय ! इतुके टणक कैसे लाडू तू बनविले
चावा घेण्याआधी दातांस पाजवावे लागते

चार दिस माहेरी जातेस जेव्हा तू फायनली
त्या खुशीत इतुके पितो की सावरावे लागते

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते खाण्यासाठी दात मजला पाजवावे लागते !!!

आधीच मला बारीक नजरेचा, म्हणून नाव पडलेय. त्यात असे काही म्हणजे !!!

अनिलभाई, हत्यार पारजणे हे बरोबर आहे तसेच हत्यार पाजवणे हे ही बरोबरच आहे. हे दोन्ही शब्द वापरात आहेत.

मला खटकलं ते "ते खाण्यासाठी दात मजला पाजवावे लागते"

ईथे दात पाजवावे लागतात असं हवं. म्हणूनच अमितला हात फिरवावा लागेल असं म्हंटलय वरती.

बागुलबुवांशी सहमत. हत्याराला धार देणे यासाठी हत्यार पाजवणे हा शब्द सहसा ग्रामीण भागात सर्रास वापरला जातो.

ते "दात पाजवावे लागतात" असं हवयं, हे ही मान्य.

मोठमोठे गझलकार कशात ना कशात सुट घेतात, तर मी जरा व्याकरणात सुट घेतली तर काय बिघडतयं. Wink Biggrin

असो. बघतो. त्या ओळीचं कायतरी करतो. प्रतिसादकांचे धन्यवाद.

फायनली पाजवावे प्रकरण मार्गी लावलयं.

प्रतिसादकांचे पुनश्च आभार Happy

नंतर अ‍ॅडलेल्या या ओळी

चार दिस माहेरी जातेस जेव्हा तू फायनली
त्या खुशीत इतुके पितो की सावरावे लागते