वॅक्युम क्लीनर बद्द्ल माहीती हवी आहे.

Submitted by टकाटक on 27 November, 2012 - 00:19

माझ्या एका मित्राला वॅक्युम क्लीनर घ्यायचा आहे त्याबद्द्ल माहीती हवी आहे. वॅक्युम क्लीनर रोजच्या कामात म्हणजे झाडु मारण्यासाठी वगैरे उपयुक्त ठरु शकतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात वापरायला सफाईसाठी छोटा, मजबूत सक्शन असलेला,ब्लोअर फंक्शन असलेला वॅक्युम क्लिनर कोणता आहे?
प्रत्येक व्हॅक्युम क्लिनरला ब्लोअर फंक्शन नसते का?

चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते?

तुमच्या शेजाऱ्याने विकत घेतली की

यात पहिला नंबर व्हॅक्युम क्लिनरचा लागतो

निदान भारतात तरी जेथे घरगुती कामगार/ मोलकरणी यांची सेवा खूप स्वस्तात उपलब्ध आहे.

माझाकडे पुर्वी मोठा व्हेक्युम क्लिनर होता. तो सुरवातीला उत्साहाने वापरला नंतर धूळ घात पडला. तो डोनेट केला. नंतर आता परत छोटा असावा असे वाटू लागले आहे.

प्रकाश, मिडीयम साईझ आणि दणकट काम यासाठी LG चे व्हॅक्युम क्लिनर बघा.(कितीही मोह झाला कार सोफे पडदे यासाठी तरी मिनी व्हॅक्युम क्लिनर घेऊ नका.लगेच लोड होतो. मांजरीच्या पिलासाठी भिंतीत वेगळे छिद्र करण्या सारखे होते ते.)
आमच्याकडे युरेका फॉर्ब्स वेट अँड ड्राय(ढोलू) आहे.तोही चांगला चालतो. नुसता व्हॅक्युम किंवा मुख्य समस्या फरशी वर धूळ आणि केस असेल तर चांगला चालतो.MI चा गिरक्या घेत सफाई आणि पोछा करणारा क्लिनर बाजारात आलाय, तोही बघा.

https://in.c.mi.com/thread-2181702-1-0.html?efe=pushtye9VN&mi_campaign=R...

( आणि खूप घाईच्या दिवशी मात्र कशाला ते यंत्र फिरवणे, पटकन झाडूने केर काढून टाकू असेही होते.चैनीची वस्तू असली तरी गाद्या, सोफे, ट्रॉली खाली वगैरे ला एक चांगला व्हॅक्युम क्लिनर घरात असलेला बरा पडतो.कधी हात कधी यंत्र.टीम वर्क.)

Robotic vaccum cleaner नको असेल तर निदान cordless घ्या. सध्या Dyson अत्यन्त famous आहे.

एल जी चा व्हॅक्युम क्लिनर 13 वर्षं व्यवस्थित चालला.
लॉकडाऊन मध्ये बिघडला.
युरेका फॉर्ब्स चा घेतला(तोही बंद दुकानाच्या मागच्या दारातून वगैरे दारू घेतल्या सारखा.)
आता आज पासून त्यात बॅग च्या आजूबाजूला धूळ साचते आहे.चालू केला की थोड्या वेळात आवाज वेगळा यायला लागतो.(ओव्हरलोड करत नाही.थोडा थोडा वेळ (साधारण 5 फूट) वापरून बंद करतो.)
एकंदर परत एकदा 'पूर्वीसारखी दणकट यंत्रं बनत नाहीत आता' म्हणावंसं वाटतं आहे.
युरेका फॉर्ब्स कॉल सेंटर वर इश्यू टाकलाय.

एकंदर परत एकदा 'पूर्वीसारखी दणकट यंत्रं बनत नाहीत आता' म्हणावंसं वाटतं आहे.>> कॉम्पिटिशन, प्राईस वॉर! मग किंमत कमी करायला कॉस्ट कटिंग, त्यात गुणवत्ता कॉम्प्रमाईझ होते.

उपकरणे पुन्हा पुन्हा घेतली जावीत म्हणूनच अशी बनवतात, त्यांचे सुटे भाग काही काळाने मिळेनासे होतात , जेणेकरून नवीन यंत्रच घ्यावे लागेल असा प्रकार वाटतो.

खरं आहे.एकच प्रॉब्लेम की नव्या गोष्टी विकताना जुन्या बाय बॅक करून परत घेणं हा प्रकार खूप कमी दुकानं करतात.
एकंदर कचरा वाढत जातो.
चांगली टिकणारी पण थोडी महाग यंत्रं बनवली तर पर्यावरण दृष्टीने जास्त चांगले.

युरेका फॉर्ब्स च्या माणसानं त्वरित सर्व्हिस दिली.
मूळ समस्या ही होती की बॅग फुल झालेली कळून आम्ही ती बदलेपर्यंत धूळ आजूबाजूला एस्केप झाली होती आणि मोटर निकामी झाली.त्याने मोटार बदलली.आम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा लवकर बॅग फुल होण्याइतका वेगाने कचरा करतो असा साक्षात्कार झाला.बॅग फुल झाल्यावर क्लिनर आपोआप बंद झाला पाहिजे.उरलेली धूळ मोटर मध्ये जाऊन मोटर खराब होण्याइतके एस्केप रूट बॅग ला कसे आहेत?
बॅग रेग्युलर वापर असला तर दर 10 दिवसांनी रिकामी कराच असे सांगितले आहे. 'वर्ल्डस मोस्ट सायलेंट व्हॅक्युम क्लिनर' असं त्यावर लिहिलं असलं तरी मोटार बदलल्यावर क्लिनर वापरून बंद करताना मांजरीची मान मुरगळल्या सारखा जोरात म्याव आवाज येतो आहे(फेकत नाहीये, आवाज टेप करून ऐकवून दाखवेन.)
एकंदर दणकट पणा कमीच आहे.सारखं मेल्याच्या भावना जपत काम करावं लागणार आहे.अर्थात एल जी घेतला असता तरी फार फरक पडला असता असे नाही.हल्ली उपकरणे परदेशातील धुळीचे स्टॅंडर्ड बघून डिझाईन होतायत असा मला दाट संशय येतोय.

Pages