घराचे दार वा-याने जरासे हालले होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 26 November, 2012 - 10:45

गझल
घराचे दार वा-याने जरासे हालले होते!
मघाशी काळजाचे या धडकणे थांबले होते!!

कुणाची हाक ती होती? कुणाला साद मी देतो?
विसरलो सर्वकाही मी मघा जे ऐकले होते!

चितेवर लेटल्यासम मी बिछान्यावर अरे, निजतो!
मला प्रेताप्रमाणे या जगाने जाळले होते!!

चितेवर काय तो डोळा जरासा लागला माझा......
मला या जिंदगानीने कुठे झोपू दिले होते?

जसा निष्पर्ण मी झालो, तसा मी एकटा पडलो!
सुगीचे सोबती सारे कधीचे पांगले होते!

पुसे वार्धक्य तारुण्यास माझ्या प्रश्न हा साधा....
कुणी मज टाळले होते, कुणी फेटाळले होते!

मला श्वासांमधे आता तुझी ये जाच जाणवते!
तुला दाही दिशांना मी उगा धुंडाळले होते!!

जशी आली तशी गेली मला सोडून श्रीमंती.....
परी, आजन्म गरिबीने मला सांभाळले होते!

कळेना काय मी घोडे कुणाचे मारले होते?
शिताफीने मला त्यांनी अखेरी गाळले होते!

पुन्हा मी लागलो नाही कधी हातास कोणाच्या!
क्षणांचे काफिले केव्हा कुणास्तव थांबले होते?

झुळुक बागेतली तुझिया मला बिलगून गेली,अन्
उभे आयुष्य हे माझे तिने गंधाळले होते!

तुला मी पाहिले होते घडीभर फक्त ओझरते!
तुला हृदयामधे माझ्या क्षणी त्या गोंदले होते!!

जगाच्या राहिली लक्षात ओहोटीच का माझी?
कितीदा या किना-याने मला कवटाळले होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेर कसा आहे ते सान्गाल का ? पर्यायी नाही आहे तुमचे अन तुमच्या गझलेचे भवितव्य सान्गीतलेय मी
मानो या ना मानो !!!!

टीप : बोलविता धनी वेगळाची !!.; अर्थ : तुकोबारायाना अपेक्षित होता तोच !!

आमदका शेर Lol

वरची गम्मत द्या सोडून

बाकी गझल समजली फक्त मतला व त्या दोन ओळीत परस्पर सम्बन्ध काय व कसा आहे ते स्पष्ट करून सान्गा सर तसेच नेमका मथितार्थ /गर्भितार्थ काय आहे त्याचा हेही सान्गा !!

स्माईलीज मस्त शोधून काढताय तुम्ही ही कला तुम्हाला नव्यानेच अवगत झालेली दिसतेय
डावा डोळा मारणारा हा स्माईली मुळातच डावखुराय की मराठी लावण्यान्चा फॅन आहे??
असो

मुद्द्याचे बोला ..................मतला??

मला श्वासांमधे आता तुझी ये (स्पेस हो स्पेस) जाच जाणवते!
तुला दाही दिशांना मी उगा धुंडाळले होते!!

जशी आली तशी गेली मला सोडून श्रीमंती.....
परी, आजन्म गरिबीने मला सांभाळले होते!

पुन्हा मी लागलो नाही कधी हातास कोणाच्या!
क्षणांचे काफिले केव्हा कुणास्तव थांबले होते?

झुळुक बागेतली तुझिया मला बिलगून गेली,अन्
उभे आयुष्य हे माझे तिने गंधाळले होते!

जगाच्या राहिली लक्षात ओहोटीच का माझी?
कितीदा या किना-याने मला कवटाळले होते!<<<

वा वा! सुंदर शेर!

(काही शब्दांबाबत काहीशी हरकत!)

पण तरीही:

जगाच्या राहिली लक्षात ओहोटीच का माझी<<< हा मिसरा अतीव सुंदर!

धन्यवाद!

वर काय वाट्टेल ती चर्चा झाल्याचे दिसत आहे. स्मायली तर माबोबाह्य आहेत. (निदान स्मायली तरी माबोबाह्य आहेत वगैरे!)

कवीवर्य अनिल कांबळेंचा 'घराचे दार वाजणे' यावरचा शेर आठवत नाही, पण असाच काहीसा आहे, मतल्यागत!

पुन्हा मी लागलो नाही कधी हातास कोणाच्या!
क्षणांचे काफिले केव्हा कुणास्तव थांबले होते?

फार आवडला हा शेर!

मला कवी,गझलकार अनिल कांबळे यांचा एक मतला आठवला.

खरे तर, दार वा-याने जरासे वाजले होते
कितीदा तूच आल्याचे मनाला वाटले होते...

असाच एक उर्दू शेर स्मरला.

कौन आया है यहाँ, कोई न आया होगा
मेरा दरवाजा हवाओंने हिलाया होगा

धन्यवाद भूषणराव, विजयराव, कैलासराव! असाच लोभ असू द्या!
काय बोलावे हे कळेना म्हणून वैभवाला मुद्रा धाडल्या! हा आमचा स्वभाव नाही! क्षमस्व!
टीप: मतला खूपच पुराणा आहे! गझल पूर्ण करताना पहिला मिसरा वाचल्यावर आम्हासही वारंवार शंका येत होती की, बहुतेक असे कुणी तरी आधीच म्हटले आहे. पण आठवेना नक्की कुणी ते. सांगितल्याबद्दल धन्यवाद! पण सानी मिस-यात बराच फरक आहे!
भूषणराव ये जा असे लिहायला हवे होते! लगेच बदलतो!

बाकी वैभवाने त्याच्या प्रतिसादातून त्याचा खरा रंग उधळला, त्याची खरी अभिरुची व्यक्त केली!
कारण पहिलाच प्रतिसाद त्याचा अन् असा वाकडातिकडा आला! त्याला सबूरी शिकण्याची देव बुद्धी देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

बाकी वैभवाने त्याच्या प्रतिसादातून त्याचा खरा रंग उधळला, त्याची खरी अभिरुची व्यक्त केली!
कारण पहिलाच प्रतिसाद त्याचा अन् असा वाकडातिकडा आला! त्याला सबूरी शिकण्याची देव बुद्धी देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

<<<

Rofl

प्रोफेसर साहेब, येथे आपल्यासंदर्भात काही आकडेवारी देऊन गौरवोद्गार काढलेले आहेत हे बघितलेत काय?

भूषणराव, पण तरीही असे या गझलेत कुठे आहे?
दुस-या कोणत्या आमच्या गझलेत आहे का? असल्यास ते ताबडतोब बदलतो!
कृपया कळवावे!

वोके!
पण म्हणजे परंतू, अमुक अमुक असले तरी, असे असून देखिल, असे असून सुद्धा वगैरे
परी म्हणजे सुद्धा परंतू!
तरीही म्हणजे तरी देखिल, तरी सुद्धा! असे आहे तरी देखिल!
वरील दोन्ही शब्द साधारणपणे एकसारखे भाव व्यक्त करतात. म्हणून
पण तरीही म्हटले की, कानास जरा खटकते. शब्दांची उगाचच द्विरुक्ती केल्यागत वाटते!
त्यामुळेच आपण हे विचारले तेव्हा क्षणभर आम्ही गोंधळून गेलो, की, असे कसे आम्ही लिहिले?
पण म्हटले धांधलीत लिहिलेच असेल तर आता बदलता येईल!

धन्यवाद भूषणराव! सांगितल्याबद्दल! या आमच्या कानांस कौतुक ऐकायची सवयच नाही हो राहिली!
खुद्द घरातच आमचे रिंगमास्टर बसले आहेत!
पण आताच धीर करून आमचे विषयक गौरवोद्गार दाखविले! क्षणभर हासल्या व परत तोंडाचा पट्टा सुरू झाला आहे!
टीप: भूषणराव, आपले अभिनंदन! पहिल्या पाचात आल्याबद्दल!
प्रतिसादातील काहींचे शालजोडीतलेही पोचले, पण ते आम्ही चतुरपणे देवपूरकर मामींना दाखविले नाही, नाही तर तेच धरून आम्हास बडव बडव बडवीत राहिल्या असत्या, कौतुक वगैरे राहिले दूर......

पहिल्या पाचात येणे (तेही हहंनी लिहिलेल्या स्टॅट्समध्ये) ही बाब अभिनंदनाची असेल असे मला वाटत नाही, पण धन्यवाद!

ह ह म्हणजे हवाहवाई. त्या येथील अतिशय जुन्या सदस्या आहेत व माझी स्वयंघोषित मैत्रीण आहेत. स्वयंघोषित कारण त्यांनी अजुन माझी मैत्री स्वीकारलेली नाही व या त्यांच्या निर्णयात त्यांचे सूज्ञ धोरण दिसून येते. त्या तुफान विनोदी लेखिका असून त्यांची कुजबूज ही लेखमालिका मायबोलीवरील गाजलेली लेखमालिका आहे. पूर्वीच्या मायबोलीवर त्यांनी काय काय लिहिले आहे ते मात्र मला माहीत नाही.

अधिक माहिती म्हणूनः

'हहगलो' हा स्मायलीही 'हह' यांच्या सदस्यत्वाच्या नावावरूनच 'इन्व्हेन्ट' करण्यात आला आहे.

जसा निष्पर्ण मी झालो, तसा मी एकटा पडलो!
सुगीचे सोबती सारे कधीचे पांगले होते!

पुसे वार्धक्य तारुण्यास माझ्या प्रश्न हा साधा....
कुणी मज टाळले होते, कुणी फेटाळले होते!

मला श्वासांमधे आता तुझी ये जाच जाणवते!
तुला दाही दिशांना मी उगा धुंडाळले होते!!

सुंदर शेर...

आवडली गझल.