अभ्यास केला पाहिजे

Submitted by विजय दिनकर पाटील on 26 November, 2012 - 04:44

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ़ार नाही भावलेला हा नवा परिचय जरी
चेहरा हसरा तरी तूर्तास केला पाहिजे >>> वाह!

बास कर ही दीर्घ दुखणी दे अशी व्याधी जिने
निमिष होईतो मनाचा र्‍हास केला पाहिजे >>> आह!!

क्या बात कणखरजी! सर्वच खयाल आवडले! पुलेशु Happy

फ़ार नाही भावलेला हा नवा परिचय जरी
चेहरा हसरा तरी तूर्तास केला पाहिजे<<< वा

सार्थ उत्तर द्यायला ह्या गहन प्रश्नाचे तुझ्या
शांत चित्ताने मला अभ्यास केला पाहिजे<< वा वा

बास कर ही दीर्घ दुखणी दे अशी व्याधी जिने
निमिष होईतो मनाचा र्‍हास केला पाहिजे<<< सुरेख शेर

आणखी कितीदा समाधी भंग होऊ द्यायची (कितिदा - टायपो असावा)
काळजा आता तुझा दुर्वास केला पाहिजे<<< मस्त, दुर्वास केला पाहिजे

गझल आवडली

धन्यवाद

बास कर ही दीर्घ दुखणी दे अशी व्याधी जिने
निमिष होईतो मनाचा र्‍हास केला पाहिजे

ह शेर समजला नाही.

बाकीचे सगळे शेर इन अ क्लास ऑफ कणखर्स ओन. Happy

अभिनंदन..

असा रोग दे ज्यामुळे एखादा दीर्घ रोग न होता (जसे जन्ममृत्यूचा फेरा वगैरे), निमिषार्धात (इच्छानिर्मात्या) मनाचा र्‍हास केला पाहिजे (व सुटका व्हायला हवी) - असा माझा अंदाज आहे Happy

बेफि, आपण सांगीतलेला अर्थ तंतोतंत बरोबर आहे. फक्त 'बास कर' अन्वये तू अगोदरच दिलेली आहेस हे दाखवले आहे. मनाचा र्‍हास म्हणजे सर्व आशा, अपेक्षा, आकांक्षा ह्याची निर्मितीच बंद कर अर्थात समाधी अवस्था दे.

सगळे शेर इन अ क्लास ऑफ कणखर्स ओन
बेफीजीन्चा ; त्या शेराचा अर्थ सान्गणारा अन तुमचा त्यास 'तन्तोतन्त' असे अनुमोदन देणारा प्रतिसाद वाचला म्हणून .....अन्यथा मलाही डॉ.साहेबान्च्या प्रतिसादास 'तन्तोतन्त' अनुमोदन द्यावेसे वाट्ले होते Happy
खूप्खूप आवडले सगळे शेर

धाप घालवण्यास मी हमखास केला पाहिजे
ठाय लय पकडून श्वासोछ्वास केला पाहिजे

या शेरात व्यक्तिशः मला हमखास हा काफिया बदलता आल असता असे वाटले कारन त्या ओळीत काय हा प्रश्न मला पडला ज्याचे उत्तर पुढच्या ओळीत मिळते आहेच पण मग दुसरी ओळ जास्त महत्त्वाची होवून पहिलीतला काफिया तुलनेने जास्त मजा देत नाही दोनही ओळी समसमान भावनिक वजन मनावर टाकत नाहीत

दोनही ओळीन्चा अर्थ ओळ सम्पताच पूर्ण करता आला अन वरून दोनही ओळीत राबता शाबूत राखता आला तर ......तर मला वाट्ते मजा आण्खी वाढेल

माझा एक प्रयत्न पहाल का प्लीज कसा वाटतो आहे ते.....

धाप घालवण्यास मी सायास केला पाहिजे
ठाय लय पकडून श्वासोछ्वास केला पाहिजे

सार्थ उत्तर द्यायला ह्या गहन प्रश्नाचे तुझ्या
शांत चित्ताने मला अभ्यास केला पाहिजे.....व्व्वा आवडालाच हा शेर.

विजयराव! तुमचा मतला आम्ही असा वाचून पाहिला........
ताल टिकवायास मी अभ्यास केला पाहिजे!
ठाय, लय पकडून, श्वासोछ्वास केला पाहिजे!!

लहान तोंडी मोठा घास....! पण तरी लिहितो आहे.
मी ज्या ड्रायव्हरकडून (शरीफ चाचा) मोटारचालन शिकलो त्याने मला सगळ्यात आधी एक सांगितलं होतं. 'हिम्मत करने का, बाबू. गलती होगा, कोई बात नही.. वैसेच सिखने का रहता !' ते आठवून हीसुद्धा एक हिम्मत...

---------------------------------------------------

धाप घालवण्यास मी हमखास केला पाहिजे
ठाय लय पकडून श्वासोछ्वास केला पाहिजे

पहिल्या ओळीचा नीट अर्थ लागला नाही. हमखास काय केला पाहिजे? दुसरी ओळ वाचल्यावर उत्तर मिळतं - 'श्वासोच्छवास'. इथे 'ठाय' हवे की 'ठाम' ? की दोन्ही एकच असते? की दोन्हींत फरक आहे? मला इथे पहिली ओळ अधिक परिपूर्ण असती, म्हणजे तिचा स्वतंत्रपणेही काही अर्थ असता तर जास्त मजा आली असती असं वाटलं.

फ़ार नाही भावलेला हा नवा परिचय जरी
चेहरा हसरा तरी तूर्तास केला पाहिजे

मार्मिक शेर. साध्या सोप्या शब्दांत थेट भाष्य!
खूप आवडला!

सार्थ उत्तर द्यायला ह्या गहन प्रश्नाचे तुझ्या
शांत चित्ताने मला अभ्यास केला पाहिजे

'ह्या गहन प्रश्नाचे' आणि 'तुझ्या' ह्याचे आपण वेगवेगळे संदर्भ लावू शकतो. त्यानुसार विविध अर्थ उलगडले जातात. सरळसोट पहिला अर्थ हा दिसतो की प्रियेच्या प्रश्नाचे उत्तर किंवा 'ती'ने केलेला इजहार-ए-मोहब्बत.. त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची - असा. ह्या व्यतिरिक्त अनेक अर्थ निघतात.

बास कर ही दीर्घ दुखणी दे अशी व्याधी जिने
निमिष होईतो मनाचा र्‍हास केला पाहिजे

सुंदर शेर.
'बास कर' ऐवजी 'खूप झाली' असे वाचल्यावर मला अर्थ जास्त स्पष्ट जाणवला.

आणखी कितिदा समाधी भंग होऊ द्यायची
काळजा आता तुझा दुर्वास केला पाहिजे

शेवटचा... आणि हासील-ए-गझल..!
आपल्याच काळजाचा आपणच दुर्वास करायचा... त्यापासून दूर जायचं... हा खूप मोठा विचार आहे. खूप आवडला हा शेर.

एकूणात संपूर्ण गझल अत्यंत आवडली. मतला, इतर शेरांच्या मानाने किंचित कमजोर वाटला. (क्षमस्व.)

....रसप.....

नवीन प्रतिसादकांचे आभार.

रणजित,

लहान मोठा काही नसते तेव्हां विचारप्रवर्तक चर्चा करीत रहावेत.

मतल्यातल्या 'ठाय' ह्या शब्दाचा अर्थ 'धीम्या' असा आहे. संगीतातल्या तालांत ठाय लय असा शब्दप्रयोग वापरतात.

अभ्यासाचा शेर बहुपदरी का काय म्हणतात तसा झाला असावा Happy

दुर्वासचा अर्थ 'दुर्वास' मुनी असा घ्यावात. असे म्हणतात की दुर्वास मुनी अत्यंत कोपिष्ट होते म्हणजे ते नुसते आले तरी तिन्हीलोकीच्या रहिवाश्यांना शाप देतील की काय अशी भीती वाटत असे.

मतला कमजोर आहेच!

धन्यवाद!

जितू मतल्यासाठी मी वरच्या एका शेरात असा प्रतत्न केला आहे

धाप घालवण्यास मी सायास केला पाहिजे
ठाय लय पकडून श्वासोछ्वास केला पाहिजे

देवसरानीही त्यान्च्यापरीने प्रयत्न केला आहे

ठाय चा अर्थ समजला धन्स कणखरजी .तो शब्द शेरातला सर्वात सुन्दर शब्द आहे मला सर्वाधिक आवडला

विजयराव, अजून एक प्रयत्न केला............

तुमचा मतला असा समजून घेतला.......
धाप लागणे/धाप घालवणे.....शब्द जगण्यातला अवघडपणा दाखवितात.
ठाय.....विलंबित ठेका(संगितात हा शब्द येतो), लय....र्हीदम.....ताल/तोल वगैरे.
ताल/लय/ठेका वगैरे सांभाळून श्वासोच्छ्वास केला पाहिजे, म्हणजेच जगणे हे तालबद्ध/लयबद्ध/सहज होण्यासाठी मला त्याचा सराव/अभ्यास करायला हवा!

वरील गद्य अर्थ लक्षात घेवून हा मतला असा करून पाहिला.....थोडासा अर्थ आपल्या अर्थापेक्षा वेगळा आहे, तरीही पहा कसा वाटतो हा मतला ते..........

लीलया जगण्यास मी अभ्यास केला पाहिजे!
हे नव्हे की, फक्त श्वासोच्छा्वास केला पाहिजे!!

टीप: लीलया शब्दात...लय/ताल/ठाय/ठेका/सराव/अभ्यास/रियाज/सफाई/सहजता वगैरे सर्व अर्थ येतात असे वाटते. आपले मत जरूर कळवा.
.............प्रा.सतीश देवपूरकर

धाप घालवण्यास मी हमखास केला पाहिजे
ठाय लय पकडून श्वासोछ्वास केला पाहिजे

योगशिबीरात प्रवेशद्वारावर हा शेर मोठ्या अक्षरात लिहीला पाहीजे हा शेर. भारी.

पेट्रोल पंप : आपल्यास जे काय पेट्रोल ओकायचेय ते धागा पाहून ओकत जा !!!
आम्हाला काडी टाकायचा मोह होतोय पण हा धागा त्या प्रकारचा नाही म्हणून आम्ही शांत आहोत
आन्यथा तुम्हालाच आग लावली आसती

Pages