धर्मास ग्लानि आली आहे काय?

Submitted by रमेश भिडे on 23 November, 2012 - 13:59

"यदा यदा हि धर्मस्य "या भगवंताच्या उक्तीनुसार जेव्हा जेव्हा अधर्म प्रबळ होतो किंवा खरा धर्म लोप पावतो ,त्यावेळी परमेश्वर स्वत: जन्मास येवून अधर्माचा नाश करून , दुष्टांना शासन करून पुन्हा धर्म स्थापन करतो.

आज जगात किंवा विशेषत:भारतात राहणाऱ्या माणसाला या गोष्टीची अतिशय प्रकर्षाने जाणीव व्हावी कि Oh My God! iसिनेमात दाखवल्याप्रमाणे धर्मसंस्था भ्रष्ट झाली आहे. धर्माचे ठेकेदार आपापली दुकाने मांडून पाप-पुण्याचा धंदा मांडून बसले आहेत. आणि यास्तव धर्माचाच (काळा )बाजार भरल्याने पर्यायाने राजकारण ,समाजकारण आणि सगळेच एकूण चित्र अतिशय भयाण -रीत्या निराशाजनक झालेले आहे.

भ्रष्टाचार ,अनाचार,दुराचार जातीयवादी विद्वेष आणि विशिष्ट (कथित)उच्च-वर्णीय यांचा द्वेष करणे,खर्या राष्ट्र-पुरुष,देशभक्त,साधू-संत पुरुषांचा ,दैवतांचा उपमर्द करणे, इत्यादी सैतानी प्रवृत्ती अतिशय बेफाम धुमाकूळ घालत आहेत.कितीही पाप/भ्रष्टाचार करा,पण अमुक स्वामी/बाबाचा शिष्य व्हा,सगळे गुन्हे माफ! अरे काय चाललेय काय?

मुळात धर्म ही काय संकल्पना आहे ते समजून घेतले तर धर्मास ग्लानी कशी येते ,ते लगेच समजून येऊ शकेल

एक शेतमालक आहे ,त्याने दहा माळी नोकरीला ठेवले.
दहा माळ्यांना एकेक रोप दिले . पाणी,खत,हत्यारे , औषधे,मशागत करण्याचे समान सर्व दिले.
आणि त्या माळ्यांना ते रोप लावण्यास संगितले. व त्याची वाढ करणे ,जोपासना करणे , संरक्षण -संवर्धन करण्याची जबाबदारी माळ्यांना दिली.
प्रत्येक माळ्याने ते रोप लावले ,वाढवले ...जपले .
6 महिन्यांनंतर शेतमालक पुन्हा आला ,आणि रोपे पहिली .
काही रोपे चांगली तरतरीत,हिरवीगार होती.जोमदार होती.तर काही मलूल,मरतुकडी होती.
याचे कारण काही माळी कामचुकार निघाले.
त्यांनी औषधे फवारली नाहीत, खाते दिली नाहीत,गाई-गुरांपसून /ऊन-पावसात रोपांचे संरक्षण केले नाही.

तीच संकल्पना विविध धर्मांना लावून बघा.... मनुष्याचे जीवनमान सुधारावे, त्याची आत्मिक,भौतिक ,सामाजिक प्रगति व्हावी ह्याची जबाबदारी धर्मावर देण्यात आली.पण......................
आज किती आणि कोणते धर्म ते काम करतात? कधी विचार केला आहे?

धर्मो रक्षति रक्षत: या वचंनानुसार धर्म सज्जनांचे रक्षण करतो,दुर्जनांचे निर्दालन करतो ...हे आज घडते का?

नाही..................! असेच उत्तर दुर्दैवाने मिळेल ....

धर्म आणि शास्त्राचे ठेकेदार आणि खोटारडे बाजारू कथित धंदेवाईक तांत्रिक-मांत्रिक यांनी निरर्थक,वेळखाऊ आणि अनुत्पादक अशा कर्म-कांडात आणि पाप-पुण्याच्या जंजाळात धर्म आणि समाजाला अडकवून ठेवले आहे.

यातही पुन्हा मेख अशी की ,ज्या वेदांना प्रामाण्यभूत मानून कथित धर्म-शास्त्राची रचना झालेली आहे, त्या वेदापैकी केवळ 5% वेद साहित्य उपलब्ध आहे. उर्वरित 95% वेदात काय होते? आणि त्यावर आधारित कथित शास्त्र कसे असेल? हे कोण ठरवणार?

शास्त्र असे सांगते, तसे सांगत नाही, म्हणून कोकलणार्या5 जुनाट, पोथीवादी ,कर्मठ, गल्लाभरु विद्वानाचे (?) वैचारिक शेण आम्ही कथित शास्त्र म्हणून का स्वीकारावे?

तर अशी सगळी स्थिति आहे...................

यावरून मी असा निष्कर्ष काढला आहे की , (निदान भारतातील/हिंदू ) धर्माला ग्लानि आलेली आहेच! आणि हे सत्य त्या जगन्नियंत्या पर्यन्त पोहोचणे अतिशय आवश्यक आहे.

हे प्रभू तूच आता जन्म घे ,आणि तुझ्याच उक्तीनुसार सज्जनांचे रक्षण आणि दुश्टांचे निर्दालन कर रे बाबा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखकाचा स्वतःपुरता असलेला धर्माचा अर्थ माझ्यापुरता मी बदलून घेतो. त्यांनीच दिलेल्या उदाहरणात काही रोपे मलूल तर काही टवटवीत, तजेलदार होती. याचा अर्थ ज्या माळ्यांकडे उत्तम रोपे निपजली त्यांनी आपल्या धर्माचे व्यवस्थित पालन केले. धर्माची व्याख्या संदिग्ध असल्याने खोलात न जाणे श्रेयस्कर. पण जेव्हां हाच माळी घरी आल्यावर मुलांचा अभ्यास, प्रकृती यांची देखभाल जरतो तेव्हां तो पित्याच्या धर्माचे पालन करतो. तर पत्नीला खूष ठेवत मौल्यवान वस्त्र वगैरे देतो तेव्हां पतीधर्माचे पालन करतो. मानवी समुदायामधे एकमेकांप्रती असलेल्या कर्तव्यांचे पालन करून निकोप वातावरणात प्रेम वाढीस लागावे अशी वागणूक ठेवणे आणि स्वतःस घडवणे हा कदाचित धर्म असावा.

चुभूदेघे

>>>> धर्माचा अर्थ माझ्यापुरता मी बदलून घेतो. <<<<
फक्त तुमच्या पुरताच बदलून घेण्याची गरज नाही, कारण तुम्ही पुढे वर्णन केलेले व्यक्तिनिष्ठ कर्तव्यपालनाबाबतचे "धर्म" "फलाची अपेक्षा न करता" पाळत रहाणे निदान माझ्या माहितीनुसार तरी हिन्दू धर्मात आवश्यकच मानले आहे. निष्ठेने (निष्ठे बरोबर श्रद्धादेखिल आपसूकच गृहित अस्ते), अचूकपणे करीत राहिलेले प्राप्त "कर्म" (कर्तव्य) म्हणजेच "धर्म" असेही म्हणता येईल.
माणुस जन्मास आला, तर वंशविस्तार हाही एक धर्मच. जर त्यामधे पडलात, पडायचे असेल, तर विद्यार्जन/अर्थार्जन/गृहस्थाश्रम व त्या अनुषंगिक "इतरांबाबतची कर्तव्ये" पाळणे म्हणजेच धर्मपालन.
जन्मास आलोच आहे, ते तर माझ्या हातात नव्हते, पण आता जन्मास आलो आहे तर दैहिक (देहा बाबतची आरोग्य/स्वच्छता इत्यादिक) कर्मे पाळणे, सुयोग्य आहारविहाराद्वारे देह सुदृढ ठेवणे हा देखिल नैमित्तिक धर्मच होय.
अन हे करताना, मनाचा वारु चौखुर उधळून, अनेकदा संताप/द्वेष/इर्षा/राग/लोभ/माया/कुत्सितता/बिभत्सता इत्यादी असंख्य दुर्गुणान्ना जवळ करू शकतो ते टाळण्यासाठी नितीमत्तेच्या सुयोग्य विचारांद्वारे नियमबद्ध आचरण करणे हा देखिल धर्मच.
या सुयोग्य विचारांमधेच मनुष्यजन्माद्वारे प्राप्त दैहिक कर्तव्ये करीत असतानाच/पूर्ण करून, ज्याने तुम्हांस निर्मिले त्या परमेश्वराचे विविध रास्त मार्गांनी चिंतन/मनन/पूजन करून अंती त्याचे ठायीच एकरुप होण्याचा प्रयत्न करणे (अर्थात मोक्षप्राप्ती करणे) हा देखिल धर्मपालनाचाच विषय.
अन हे सर्व समाजाकडून करवुन घेणे/स्वतः करणे /अहंगंड न बाळगता या व्यवस्थेचा एक घटक बनुन रहाणे हा देखिल धर्मच.
आता हिंदू धर्मातील सद्यस्थितीस उपलब्ध जे काय जितके टक्के धर्मसाहित्य उपलब्ध आहे, ते बघता, त्यातिल विचार बघता, वा वरील विचार हे जर कुणास "वैचारिक शेण" वाटत असेल तर कोण काय करणार?
माझ्या मते, मी केवळ एक आद्य शंकराचार्यांचे स्तोत्रांचे ग्रंथ मिळविले, अन मला कळले की ते सर्व समग्र समजून आकलन करण्यास मला माझा उरलासुरला जन्म राहोच, अजुन दोनचार जन्मही पुरणार नाहीत. अन जर तसे असेल, ते माझ्या बौद्धिक्/शारिरीक आवाक्यातच नसेल, तर कोल्ह्याला द्राक्षे आम्बट या न्यायाने मी त्यास वैचारिक शेण म्हणावे का?
परमेश्वराचे चिंतन/मनन्/पूजनाचे असंख्य मार्ग व्यक्तिस उपलब्ध असताना, त्या बाजूसही न वळता, केवळ "इतर काय करताहेत" यावर भाष्य करण्याचा नैतिक अधिकार मला कसा काय मिळतो हे मला कळत नाही. अन त्यामुळेच मी माझ्यापुरते तरी अनुभव वा अनुभूती शिवाय एकही अक्षर लिहीण्याबोलण्याद्वारे भाष्य करीत नाही. असो.
सनातन कालापासून चालू असलेला विषय आहे, चालूद्यात.
धाग्याची शम्भरी भरली Proud की मी येतो शेवटास! Proud

आमचा एक मित्र धार्मिक आहे.. पण त्याने नगरपालिकेचा फाळा १० वर्षे भरलेला नाही.. त्याला धार्मिक म्हणावे की नाही?

>>> आमचा एक मित्र धार्मिक आहे.. पण त्याने नगरपालिकेचा फाळा १० वर्षे भरलेला नाही.. त्याला धार्मिक म्हणावे की नाही? <<<<
त्याने फाळा भरला नाही हे माहित असूनही त्यास "मित्र" बनवुन्/म्हणवुन घेण्याबाबतचा "अधर्म" तुम्ही स्वतः पाळताय असे नाही वाटत तुम्हाला? Proud

{असे होऊ नये, पण याच न्यायाने उद्या तुम्ही सान्गत येऊ शकाल की "आमचा एक मित्र धार्मिक आहे (रावणासारखाच), पण त्याचे दुसर्‍याच्या बायका पळवुन आणून घरी डाम्बुन ठेवल्यात, तो अजुनही बरेच काहीकाही करतो... (पण तो आमचा मित्र आहे व धार्मिकही आहे), तर त्याला धार्मिक म्हणावे की नाही? " आता असे असल्यावर, मूळात अशा रावणप्रकृतीच्या माणसाची संगत तुम्हाला कशी काय हा प्रश्न नै पडणार लोकांच्या मनात? संगतीदोषाने तुम्हीही तसेच नसाल कशावरुन? [म्हणजे फाळा वगैरे न भरणारे अशा अर्थाने म्हण्तोय हो] Wink
अन मूळात "धार्मिक" चा तुम्हाला समजलेला अर्थ काये ? तोच तर अपुरा नाहीये ना हे कधी अभ्यासलेत/तपासलेत का? Happy }

(असे म्हणतात की एक बोट दुसर्‍याकडे केले तरी तीन बोटे आपल्याकडेच रोखली जातात. तुम्ही तर एक बोट "तथाकथित मित्राकडे करून अप्रत्यक्ष अन्गुलीनिर्देश मात्र "धर्मावर" रोखताय, जेव्हा की तुमच्याकडेच रोखलेल्या बाकी बोटांचा विचारही करीत नाही, तो करा असे वर सूचवतोय, बघा पट्टय का! Wink )

लेखाची सुरुवात "यदा यदा हि धर्मस्य' ने झालेली आहे. लेखकाची जर खरच धर्मावर श्रद्धा आहे तर त्यांनी "वैचारिक शेण' हा शब्द वापरावयास नको होता.
अनादिकालापासून मुखोद्गत पद्धतीने वेदांचे जतन झालेले आहे. त्यामुळे 5%च वेद शिल्लक आहेत असे कसे म्हणता येईल. सध्याच्या काळात वेदपठणासाठी किंवा स्वाहाकारासाठी कोणीही बोलवीत नाही, वेदाध्ययन हे उपजीविकेचे साधन होऊ शकत नाही; असे असतानाही वैदिकमंडळी केवळ धर्मावरील निष्ठेपोटी वेदजतनाचे महत्कार्य करत आहेत. पूर्वी या कार्यासाठी राजाश्रय होता. सध्याच्या काळात कोणत्याही सरकारी अनुदानाखेरीज वा लोकांच्या प्रतिसादाखेरीज वेदजतनाचे कार्य होत आहे ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.
यावर भरपूर चर्चा करता येण्यासारखे आहे पण आज लिंबूटिंबूंची बॅट फुल फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण आपले नॉनस्ट्रयकर एन्डला राहणे हे योग्य.
वा! लिंबूटिंबूजी कोणताही अभिनिवेश न बाळगता खरचं तुम्ही मुद्देसूद उत्तर दिलेली आहेत. धन्यवाद!

आंबाभाऊ, त्याला नगरसेवक म्हणावे. Wink

जाता जाता, लिंबाजीराव हे आमचे अतिशय धार्मिक मित्र आहेत हे इथे नमूद करतो

>>>>> जाता जाता, लिंबाजीराव हे आमचे अतिशय धार्मिक मित्र आहेत हे इथे नमूद करतो <<<<<
हो हो हो, अगदी अगदी,
मायबोलीवर "मायबोलिचा धर्म" पाळणारा तो "मायबोलिधर्मिक लिम्ब्या" तुमचा नक्कीच अतिशय धार्मिक मित्र आहे. Proud

हे प्रभू तूच आता जन्म घे ,आणि तुझ्याच उक्तीनुसार सज्जनांचे रक्षण आणि दुश्टांचे निर्दालन कर रे बाबा! >>>>

म्हणजे सगळ तुच कर , आम्ही काहीही करणार नाही ..........

स्वत: बदलाल , तर जग बदलेल ...

मुळात धर्म ही काय संकल्पना आहे ते समजून घेतले तर........
सांगा ! सांगा !! लवकर सांगा !! आम्हाला.... पडलेल्या...... या कूट प्रश्नाचे उत्तर..... तुम्ही तरि...... समजून सांगा......!!!!!! टिक् टिक्
(किंवा कातरेला तरि सांगावयास सांगा <डोळा मारा>)
शास्त्र असे सांगते, तसे सांगत नाही, म्हणून कोकलणार्या5 जुनाट, पोथीवादी ,कर्मठ, गल्लाभरु विद्वानाचे (?) वैचारिक शेण आम्ही कथित शास्त्र म्हणून का स्वीकारावे?
सावधान !! लक्श ठेवून आहोत बरं. तरि जरा जपून.
बाकि काय...? यंदाचि दिवाळी इंग्लंडला साजरि केली म्हणे. कशी काय झालि.
सध्या मुक्काम कुठे ? अमेरिका...? तिथलि काहि खबरबात आम्हा गावकरयांना कळू दे कि !!!
हा तिकड्च्या बातम्या कोपी पेस्ट तेव्हडे नको.

Om Namo Narayan !
यदा यदा हि धर्मस्य ,ग्लानिर भवति भारत .अभ्युत्थानमधर्मस्य ,तदात्मानम स्रुजाम्यहम

यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं

शुद्ध लिहा अशी विनंती, कृपया राग नसावा

भारतीय | 24 November, 2012 - 03:40
भिडेसाहेब कशाला उगाच काडी टाकताय अमेरिकेत बसुन!>>>> अमेरिकेत राहणार्याला असले प्रश्न पडत नाहीत, हा देशी भिडे दिसतोय.

एकादशीच्या दिवशी नारायणाचे नाव घेतले असता जीवाचा उद्धार होतो, आज तर महाएकादशी आहे. प्रभु आम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो !!
पुंडरिक वरदा हरि विठ्ठ्ल || श्रीज्ञानदेव तुकाराम ||

ओह माय गॉड! सिनेमावर इथे चर्चा झाल्याचे स्मरते ! त्यात कोणी या सिनेमा मुळे धर्माची हानी झाल्याचे बोलले नव्हते,मग आता मी त्याच थीम वर आधारित पोस्ट टाकली तर एवढा गोंधळ का बुवा?

वैचारिक शेण हा शब्द मी मुद्दामहून वापरला आहे..... शास्त्र पुराण ग्रंथावर आधारित हे असे मानायचे तर चार्वाक-दर्शन आणि वात्स्यायन कामसूत्र हेही प्राचीन ग्रंथ आहेत, मग त्यावर आधारित जीवन-व्यवस्था आपण शास्त्र म्हणून मान्यता देणार का?

आज एकादशी आहे का? कोणती? शुल्क की वैद्य? मला बुवा इकडे अमेरिकेत एकादशी वगैरे काही कधी आहे ते समजत सुद्धा नाही...माफ करा हं ! जे कोणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत जातात ,त्यांनी किमान स्वच्छता तरी पाळावी ......पंढरीच्या वाळवंटात एकादशी नंतरच्या दहा दिवसात कमालीची घाण आणि अस्वछता असते असे ऐकून आहे बुवा!

काल घरी काही मित्र आले होते. गप्पा सुरू होत्या. थोड्या वेळाने त्या अध्यात्म, आत्मा वगैरे विषयांवर आल्या. माझ्या 90 वर्षांची आईने बराच वेळ शांतपणे बाजूला बसून चर्चा ऐकली आणि मग मध्येच म्हणाली 'कसला आलाय रे आत्मा वगैरे . डोळ्यापुढे सगळे जळलेले दिसते ना आपल्या, मग तेच खरे.' आणखी पुढे म्हणाली 'आयुष्य सोपे करून जगायला शिका रे. दिसत नाही त्याच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही.'

मी म्हटले म्हातारे, तुझ्यासारख्या चार पाच जणी बर्‍याचशा आध्यात्मिक बाबांची दुकाने बंद करतील!!!

ग्लानी धर्मला येत नसते. ज्या धर्मातील लोक जागृत असतात, त्यांचाच धर्म जागा रहातो.

संदर्भ : आजचा सनातन प्रभात.

geeta_0.png

रमेश भिडे यांनी खूपच छान उदाहरण दिले आहे माळ्याचे. थोडक्यात खूप काही समजावून सांगितलेत.

Proud

दहा वर्षे महान धर्मग्रंथांवर टी वी सिरियल काढुन धर्म जागा नै झाला.

आणि दीड तासाचा ओ माय गॉड , पीके आले तर म्हणे यांच्यामुळे ग्लानी आली !

चालु द्या !

धर्माला ग्लानी येण्यासंदर्भात एक विद्वान उपस्थित विचारवंतांना मार्गदर्शन करत आहेत अशी एक दृकश्राव्यफीत योगायोगाने पाहण्यात आली. अवलोकनार्थ लिंक देत आहे.

https://www.facebook.com/hemumk/videos/1015395135149479/