Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 November, 2012 - 13:00
मिट्ट काळोखात वर आकाशात
पूर्णचंद्र झळकत होता .
पिवळा पांढरा रंग त्याचा
शुभ्र प्रकाश झिरपत होता .
मनात माझ्या खोल आत
काही जागवत फुलवत होता.
पाहता पाहता चंद्र नभात
मी मला सोडून दिले.
किरणांच्या झोक्यावर मग
मी पण माझे हरवून गेले .
कुणास ठावूक किती वेळ
मीच चंद्र झालो होतो.
प्रकाशात अन् स्वत:च्या
चिंब निथळत उभा होतो .
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर..
सुंदर..
धन्यवाद भारतीजी.
धन्यवाद भारतीजी.
मी प्रथमच मायबोलीवर. आपल्या
मी प्रथमच मायबोलीवर.
आपल्या कवितेतील शेवटच्या दोन ओळीतील काव्यात्मकता लाजवाब.
मोरेश्वर मराठे, धन्यवाद
मोरेश्वर मराठे,
धन्यवाद ,मायबोलीवर स्वागत .