तळेगाव - लीलावती ग्रीन्स - गुंतवणुकीच्या दृष्टीने - तुमचे मत

Submitted by mansmi18 on 22 November, 2012 - 02:49

नमस्कार,

गुंतवणुकीच्या दृष्टीने तळेगाव हा पर्याय कसा आहे? (प्लस आणि मायनसेस)

खास करुन पुढील प्रोजेक्ट्:
http://www.lilavatigreens.com/

रेट्स ३०००-३२०० सांगत आहेत.

कृपया आपले मत लिहाल का?

धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्मी, नक्की सांगणे अवघड वाटते पण या रेटने तळेगावात थोडी रिस्क वाटतेय. तिथला वीजेचा प्रश्न सुटला का? पाणीपुरवठा सुरळीत झाला का हे माहीत करून घ्या. पुण्याच्या अगदी जवळ लोहगाव विमानतळाजवळ ३५०० रु ने अनेक प्रोजेक्टस सध्या उपलब्ध आहेत ज्यांचे रेट्स सहारा आणि अन्य टाऊनशिपमुळे भविष्यात ४००० च्या पुढे लगेचच जातील असा अंदाज आहे.

तळेगावात रेसिडेन्शिअल जागेचा भाव ४०० ते ६०० रु आहे. त्यात १५०० रु जरी मिळवले तरी ३३०० हे खूपच मार्जिन होतंय.

मनस्मी, तळेगाव पर्याय सध्या हिट आहे. तळेगाव & चाकण एमआयडीसी मुळे तिथे सध्या डेव्हलपमेंट जोरात सुरु आहे. लिलावती ग्रीन्स पेक्षा तिथे आणखीही बरेच प्रोजेक्टस आहे. टाटा, नम्रता, विक्फिल्ड वगेरे. सध्याचा रेट हा अनुकूल आहे. सध्यातरी एक ईन्व्हेस्ट्मेंट म्हणून तळेगाव हा पर्याय निवडण्यास हरकत नाही. रेल्वेस्टेशन, मार्केट, रस्ते या दृष्टीने पहायवयाचे झाल्यास तळेगाव उत्तम पर्याय आहे. आमचं ऑफिस तळेगाव एम आय डी सी मधेच आहे. त्यामुळे रोज येता जाता मी नविन स्किम्स पाहतोच. लाईट्सचा आणि पाण्याचा प्रश्न बर्‍यापैकी सुटलेला आहे. आणि एवढ्या स्किम्स तिथे इनव्हेस्ट करतायेत तर भविष्यात हे प्रॉब्लेम्स सुटतीलही. पुर्वी तळेगाव, कामशेत, सोमाटणे हे सेकंड होम्स साठीचे पर्याय होते पण आता तसे नाही त्याला प्रथम पर्याय मुळेही पसंती देतायेत.

फक्त लिलावती ग्रीन्स..हा एकमेव पर्याय न ठेवता इतरही पर्याय जरूर पहावे. नम्रता बिल्डर्स तीथे बर्‍याच वर्षापासून आहे. स्टेशन नजीक एखादा उत्तम पर्याय मिळाला तर जरूर पहावा.

किरण, सुर्यकिरण धन्यवाद.

सुर्यकिरण,

लीला ग्रीन्स बद्दल काही निगेटिव्ह आहे का? असल्यास प्लीज शेअर कराल का?

लीला ग्रीन्स बद्दल निगेटिव्ह काहीच नाहीये. पण इतरही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. स्टेशन व मार्केट पासून जवळ याबद्दल मी सांगत होतो. कारण लीला ग्रीन्स जरा दूर आहे स्टेशन आणि मार्केट पासून. तिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट, हॉस्पिटल्स हे सुद्धा दूरच आहेत. फक्त पोलिस चौकी जवळ आहे.. याच कारणाने फु.स. दिला.

स्टेशनपासून जवळ वराळे गाव आहे. तिथेही स्किम्स चालू आहेत चांगल्या. तिथलं लोकेशन सुद्धा उत्तम आहे. थोडंस फिरून पहा.

बाकी लीला ग्रीन्स प्रोजेक्ट उत्तमच आहे, कारण तोही प्रोजेक्ट नम्रताचाच आहे.

तळेगावात रेसिडेन्शिअल जागेचा भाव ४०० ते ६०० रु आहे >>>
किरण, कुठे आहे तळेगावात हा रेट?? आम्ही २-३ महिन्यांमागे पाहिले तर सर्व ठिकाणी नवे कन्स्टक्शन २००० च्या पुढेच रेट्स सांगत होते.

मी असे ऐकले की तळेगावात अजूनही शाळा पुण्याइतक्या डेव्हलप झालेल्या नाहीत. त्यामुळे फॅमिली साठी रहायला इन्वेस्ट करणार असाल तर विचार करा.

हिंजवडी फाट्यापासून पासून एन - एच ४ मार्गावर तळेगाव ला आत येणारा फाटा १८ किमी वर आहे साधारण. हिंजवडीला जॉब करणारे बरेच जण पुण्याच्या आसपास (वारजे, सिंहगड रोड इ.) च्या एरीयातून रोजचे तितकेच एका वेळचे ट्रॅव्हल करतातच. मग तेच तळेगावापासून केले तर काही बिघडत नाही. तेव्हा हिंजवडी मध्ये नोकरी असेल तरी तळेगाव पुण्याच्या मानाने कमी रेट मुळे फायदेशीर आहेच.

काही वर्षांपूर्वी चाकण येथे एअरपोर्ट होणार अशी वदंता होती. त्यामुळे तळेगावात रेट्स म्हणे एकदम वाढायला लागले होते. सध्या ते थंडावले आहे असे ऐकले.

बादवे, तळेगाव मधल्या प्रॉपर्टी गुंतवणुकीवरही नानबा च्या "पुण्यात घर घ्यायचंय?" वर चर्चा चालू होती ना! मग हा सेपरेट धागा का? ते ही "गुंतवणुक (गुंतवणूक, समभाग, म्युच्वल फंड याबद्दल हितगुज)" ह्या ग्रूप मध्ये?

किती वर्षांनी ताबा आहे? तळेगावात सांगितल्या तारखेच्या किमान सहा महिने पुढे धरा. ताबा एक वर्षापेक्षा उशीरा असेल तर भाव अजून १०० - २०० ने पाडून बघा. त्याआधी असेल तर ठीक वाटतोय.

बादवे, तळेगाव मधल्या प्रॉपर्टी गुंतवणुकीवरही नानबा च्या "पुण्यात घर घ्यायचंय?" वर चर्चा चालू होती ना! मग हा सेपरेट धागा का? ते ही "गुंतवणुक (गुंतवणूक, समभाग, म्युच्वल फंड याबद्दल हितगुज)" ह्या ग्रूप मध्ये?>>>>>तो धागा संमिश्र आहे. सगळ्या पुण्यातल्या प्रॉपर्टीज वर चर्चा सुरु असते. मला फोकस्ड धागा ठेवायचा होता. आपली हरकत नसल्यास.
एनिवे, प्रतिसादाबद्दल आभार.

लिला ग्रीन्सचं काम पुर्ण झालंय.. त्याच्या बाजुलाच असलेल्या लेकशोअरचं काम पण पुर्ण झालंय. दोन्ही बेस्ट जवळच एक मस्त लेक पण आहे. ताबा त्वरीत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाहि.

किरण, कुठे आहे तळेगावात हा रेट?? आम्ही २-३ महिन्यांमागे पाहिले तर सर्व ठिकाणी नवे कन्स्टक्शन २००० च्या पुढेच रेट्स सांगत होते. >>>

निंबे
सगळी पोस्ट वाचत जा ना. जागेचा म्हणजे मोकळ्या जागेचा रेट. १५०० हा कमाल रेट बांधकामाचा पकडलाय. तू म्हणतेस तो भाव जुना असावा. २००, ४०० ची वाढ फ्लॅटसाठी योग्य वाटते.

जागेचा म्हणजे मोकळ्या जागेचा रेट >>>
अरे तू रेसिडेन्शियल लिहिलंयस! मोकळी जागा म्हणजे प्लॉट म्हणायचं होतं का तुला? प्लॉट ला रेसिडेन्शियल म्हणतात? Uhoh

प्लॉट ५ प्रकारचे असतात
१. रेसिडेन्शियल
२. अ‍ॅग्रीकल्चर
३. इंडस्ट्रीयल
४. नो डेव्हलपमेंट झोन
५ फॉरेस्ट

तळेगावात इन्वेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतल्यास रेंट ने जातात का प्रॉपर्टीज? जास्त अस्ल्यास कुठल्या एरीयात किती रेंट मिळतो काही आयडीया?

माझ्या माहितीप्रमाणे तळेगाव एम आय डी सी, तळवडे आयटी पार्क, हिंजवडी वीस/पंचवीस मिनिटाच्या अंतरावर असल्याने रेंट ने जातात. अर्थात रेंट तसे कमी आहेत..२ बी एच के - ७,००० ३ बी एच के - ९०००. रो हाउस - १२,०००

मळवली स्टेशनच्या बाहेर प्रांजळ पार्क नावाचा प्रोजेक्ट चालू आहे.
www.pranjalpark.in/pranjalpark.htm
मी २००६ मधे १४० /- sq,ft. नी घेतला होता (NA प्लॉट आहेत). आता रेट ७५० /- आहे. पण १०-१२ वषात भाव बराच वाढेल अस वाटत आहे.

मी तळेगावला दोनदा जाऊन आलो व तेथील सर्व प्रॉपर्टी बद्दल माहिती मिळवली.लिलावती ग्रीन्स आणि टाटा दोन्ही खूप चांगले आहेत. तळेगावलाच घ्यायची असेल तर लिलावती चांगली गुंतवणूक ठरेल. पण मी इथे लिहितोय कारण मला असे वाटत आहे की तळेगावची हाईप खूप केली गेली, त्यामानाने तिथे रिटर्न्स कमी मिळतात.

लोकं लिहित आहेत की तिथे IT पब्लिक जाउन राहील. मला वाटत नाही कारण त्या आधी रावेत, किवळे व पुनावळे हे भरायला पाहिजेत. तिथे (तळेगाव मध्ये) शाळांची सोय नाही, घर घेताना माणूस भविष्याचा विचार करतो व शाळा, कॉलेज देखील पाहतो. जे नक्कीच आज व पुढच्या दहा वर्षात देखील तिथे चांगले डेव्हलप होईल की नाही हे सांगता येत नाही.

जे लोकं चाकण ला काम करतात त्यांना तळेगाव खूप चांगले असा एक प्रचार मिडीया मधून बिल्डर्स करताना दिसतात. कारण चाकण १६ किमी आहे व रोडही चांगला आहे. पण मग खुद्द चाकणच काय वाईट आहे राहायला? चाकण आधी भोसरीचा पूर्ण पट्टा आहे, मोशी आहे आणि निगडी पाठीमागील आयटी पार्क (त्या गावाचे नाव विसरलो, तिथे रेट ३००० आहे) तिथे देखील मग लोक राहतील, वाकडा घास घेऊन तळेगावला जाऊन पुण्याच्या दुर का राहायचे? मोशी पासून नक्कीच चाकण अन पुणे दोन्ही जवळ पडतील. अर्थात ब्लू कॉलर मोशी / चाकण / तळेगाव असे प्रिफर करेन ह्यात वाद नाही.

तळेगाव मध्ये जमीन जर घ्यायची असेल तर सध्या BU भंडारी हे १६०० भाव सांगत आहेत आणि पु ना गाडगीळ देखील १४००+. तेवढ्या पैशात तर हिंजवडी मध्ये फ्रि होल्ड लॅन्ड किंवा भुगाव जे कोथरुडच्या अगदी जवळ आहे त्यात एकदम चांगल्या सोसायटीत ( निसर्ग किंवा विन्डमिल) मध्ये जागा मिळते, मग तळेगाव का? हा प्रश्न मात्र मला पडला. आणि मी तिथे जागेचा नाद सोडला. त्यापेक्षा किवळे, गंहुजे मध्ये फ्रि होल्ड खूप स्वस्त मिळते आहे. (फार्म प्लॉट म्हणून), तिथून रावेत अन आकुर्डी खूप जवळ आहेत. ज्यांना खरेच बंगला बांधून ( अमेरिकेसारखे लांब राहून ट्रॅव्हलची तयारी ठेवायची) त्यांनी तळेगावला घेण्यापेक्षा ह्या दोन तीन गावात जागा घ्यावी.

तळेगाव MIDC मात्र लवकरच बहर घेईल. GM आणि इतर लोकं तिथे भरपूर इन्वेस्टमेंट करत आहेत. हा एक + मुद्दा नक्कीच आहे. उद्या जागा संपून जाईल, ह्या खोट्या आशेत लोकांनी तळेगाव मध्ये फ्लॅट घेतले. पण त्याला किरायाच मिळणार नाही कारण ओव्हर अ‍ॅव्हॅलेबिलिटी असणार. मग रेंट देखील ६ ते ६५०० असा असेल. अर्थात बजेट जर ३५ लाखांच्या आसपास असेल आणि १० वर्षे वाट पाहणार असाल तर नक्कीच तळेगाव बरे पडेल.

प्रतिसाद लांबला आहे पण तिथे नाईकनवरेंचा प्रोजेक्ट ऑलमोस्ट फायनल करून मी सोडून दिला. ( स्लिप ऑन इट मुळे फायदा झाला. Happy )

निगडी पाठीमागील आयटी पार्क (त्या गावाचे नाव विसरलो, तिथे रेट ३००० आहे)>>
चिखली / तळवडे ??
देहु गावच आहे मग त्यानंतर.

ईथे कुणी पुणे, तळेगाव, चाकण व अधिल मधिल गावे असा एखादा एकत्रीत नकाशा स्कॅन करून टाकला तर जरा अधिक चांगला अंदाज येईल..

हो तळवडेच. तिथे सध्या ३-३१०० असा भाव आहे. पुढे चिखली गाव. तिथे एक मोठी स्किम आहे ८-१० बिल्डिंगची. ३५ ते ३८ लाखामध्ये तिथेही २ BHK मिळतो व तो आयटी पार्क म्हणजे अंगणच. तिथून पुढे चिखली - मोशी आणि चाकणला सहज जाता येते आणि निगडी / आकुर्डीत पण सहज येता येते.

योग - गुगल मॅप पाहा की. Happy

फायनली आम्ही लीलावती ग्रीन्स - तळेगाव मधे बुक केले. सगळ्याना प्रतिक्रियांबद्दल आभार.
>>
मनस्मी, आम्हीही तिथे हा धागा ओपन केल्यानंतरच्या वीकांताला त्या बाजूला गेलो होतो तेव्हा चौकशी केली होती. फक्त तिसर्‍या मजल्यावर बूकिंग्स अवेलेबल आहेत, असे सांगितले गेले. तुम्हालाही असाच अनुभव आला का?

आम्ही पण तळेगाव मधे कोहिनूर बेगोनिआ २ BHK बूक केला आहे, investment म्हणून घेतला असल्याने rent out करायचा विचार आहे...