असेच बंधनात राहू दे!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 November, 2012 - 21:54

गझल
असेच बंधनात राहू दे!
मला तुझ्या ऋणात राहू दे!!

तुझी झळाळती प्रभा माझ्या;
अशीच लोचनात राहू दे!

जरी तुला न याद मी आलो;
मला तुझ्या मनात राहू दे!

भले न काळजात ओलावा;
निदान बोलण्यात राहू दे!

नसेन घोळक्यात मी कोठे....
मला दिशादिशात राहू दे!

तुझीच ओढ अन् तुझी प्रीती...
हरेक माणसात राहू दे!

मला तुझेच गीत गाऊ दे!
तुझ्याच पैंजणात राहू दे!!

नको महाल, राजवाडाही...
मला घराघरात राहू दे!

फुटेल पत्थरासही पाझर...
मनास या भ्रमात राहू दे!

पशुत्व माणसातुनी जावो....
ममत्व माणसात राहू दे!!

मिळो सुयोग्य स्थान प्रत्येका!
हि-यास कोंदणात राहू दे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोट्या वृत्तातील ही आमची एक खूप जुनी गझल साधारणपणे १९९१मधे म्हणजेच वयाच्या ३७व्या वर्षी लिहिलेली आहे जी आमच्या हातास काल लागली. तशीच्या तशी दिली आहे. कशी वाटली ते नि:संकोचपणे व परखडपणे कळवा! म्हणजे आम्हीही छोट्या वृत्तात लिहून बघू म्हणतोय!
............प्रा.सतीश देवपूरकर

बरी आहे !!............छानच म्हणायची !!!
जे छान ते छान !!उगाच कशाला नावे ठेवा नै का..................

वैभवा! बराच साळसूद झालास रे? पळणार होतास ना, पळाला नाहीस ते, की पाय निघत नाही तुझा आमच्याप्रमाणे?

पाय निघत नाही >>>>>>>>>होय सर पायाचे दुखणे वाढले आहे हल्ली............माझा उजवा पाय जरा प्रोब्लेमॅटिक आहे ...८-१० वर्षे झालीत ..अख्खी दिवाळी अन्थरूणावर लोळतच काढली ......आता जरा आराम आहे थोडाफार चालू फिरू शकतोय इतकेच
असो
तुम्ही म्हणतच असाल तर जातो ......................

Lol

पाहिलेत !!..........माझे प्रतिसादही अर्थाच्या बाबतीत किती व्यामिश्र असतात ...आणि हेही की माझ्या प्रतिसादाचा नेहमी वाईटच अर्थच तुम्ही कसा चटकन् काढता ते ?? Wink

अवान्तर : जातो म्हणजे वैकुन्ठाला जातो असे नाही ...घरी जातो या अर्थाने म्हणालो मी Lol
अजूनच अवान्तर : एक चांगला गझलकार>>>>> Angry = इतर गझलकारान्ची सम्भावित मनोवस्था !!

कवी सतीश,

राहू दे अशी विचित्र गागागा रदीफ घेऊन अवघी लय बिघडवण्यापेक्षा ठेव ही रदीफ ठेवून बघा

आमचे सल्ले मोलाचे असूनही मोफत असतात

लाभ घ्या

लय बिघडणे! हे काय बुवा?
कुणाला कोणतीही लय आवडेल.
अमुकच लयीत चाला, तमुक लयीत श्वास घ्या, याच तालात गा , असेच पळा असे सांगण्यासारखे आहे हे!
हां, प्रत्येकास प्रत्येक लय आवडलीच पाहिजे असे मात्र आम्ही म्हणणार नाही.
आवडणे/नावडणे...........व्यक्तीसापेक्ष असते, व आम्ही या आवडीनिवडीचा आदर करतो, मग ती कुणाची का असेना!