दहावी दिवाळी अंक

Submitted by आंबा१ on 18 November, 2012 - 04:30

दहावी बोर्डात आलेल्या मुलांच्या उत्तरपत्रिका एकत्र करुन एक दिवाळी अंक निघतो. दहावी दिवाळी. यावर्षीचा अंक कुणी पाहिला आहे का? कुठे मिळू शकेल?

इथे आहे, पण बाजारात उपलब्ध आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इयत्ता दहावीला एकुन किती विषय असतात? भुगोल आणि पर्यावरण असे दोन स्वतंत्र विषय आहेत का? यांचे पेपर तर स्वतंत्र दिलेले आहेत संचात. पण पुस्तक मात्र भुगोल ( गॉग्रॉफी) याच नावाने असुन त्यावरच पर्यावरण ( एवरॉन्मेंट) असेही लिहिलेले आहे.

हे भुगोल पर्यावरण, जॉग्राफी एन्विरोन्मेंट अशी डब्बल भानगड काय आहे? की, एकाच पुस्तकातील काही धडे भुगोलात आणि काही पर्यावरण पेपरला असतात? पुस्तकात अशी कोणतीही डिविजन नाही.. दहावीची परिक्षा नेमकी किती मार्कांची असते?

नवनीतच्या पेपर संचात पेपर आहेत.. त्यात भुगोल या नावाने पेपर आहेत. तसेच पर्यावरण याही नावाने पेपर आहेत. टाइम टेबल पाहिले, तर एकच पेपर आहे. http://www.infinitecourses.com/Search.aspx?Query=SSC-Exam-Time-Table-201... मग पेपर सेटात दोन वेगळे वेगळे पेपर कसे ? भुगोल + अर्थशात्र असा एक ४० मार्काचा पेपर पेपर सेटात आहे. पर्यावरण या नावाने ६० मार्कांचा स्वतंत्र पेपर आहे.... की भुगोल हा प्रॅक्टिकलच्या सिलॅबसचा पेपर वगैरे आहे? साधारणपणे प्रश्न तसेच वाटत आहेत. पर्यावरण हा मात्र स्वतंत्र थेरॉटोकल पेपर वाटतो. मी हे नवनीत स्मार्ट सराव प्रश्नपत्रिका २०१३ वाचून लिहित आहे.

की, सिलॅबस नुक्ताच चेंज वगैरे झालाय, त्यामुळे काही नवीन पेपर, काही रिपिटर लोकाना जुने पेपर असा प्रकार आहे? पाठ्य पुस्तकांवर तर २००७ साल आहे प्रथमावृत्तीचे. म्हणजे सिलॅबस नुकता बदलेला नाही, हे नक्की.

काय आहे ही भानगड?

नवनीतच्या कॉल सेंटरला फोन केला .. ते म्हणाले बोर्ड भूगोल + अर्थशास्त्र असा पेपर घेते. पर्यावरण या नावाने शालेय पातळीवर स्वतंत्र पेपर शाळा घेते म्हणे.. ( बोर्डाचा पेपर ४० मार्कांचा आणि शाळेचा इंटर्नल पेपर मात्र ६० मार्कांचा हे लॉजिक काही बुद्धीला झेपले नाही. बोर्डाच्या ४० मार्कांच्या लेखी पेपरला २ तास आणि त्याच पुस्तकावर दुसरा लेखी पेपर ६० मार्कांचा, त्याला अडीच तास वेळ! हे तर पार बुद्धीचा कडेलोट करणारे आहे. ) . हे नेमके काय आहे ?

* कडेलोट या शब्दाबद्दल बेफिकिर यांचे आभार.

.