हिंदी चित्रपटातील अनावश्यक ट्रेण्डस

Submitted by एक प्रतिसादक on 17 November, 2012 - 04:45

जब तक है जान या चित्रपटाचं परीक्षण वाचताना आलेल्या मजेशीर प्रतिक्रियांनी छान करमणूक झाली. तिथेच एक वेगळा बाफ असावा अशी एक सूचना पण आलेली. असंबद्ध असले तरी काही काही मुद्दे विचार करण्यासारखे असल्याने हा .वेगळा बाफ. हिंदी चित्रपटात सुरू झालेले अनावश्यक ट्रेण्डस याविषयी या बाफवर चर्चा करता येईल. चित्रपट कसा आहे हे कळण्याआधीच शंभर कोटींचा गल्ला जमवून पळून जाणा-या निर्मात्यांपासून ते दक्षिणेची नॉनसेन्स अ‍ॅक्शन असावी का, आयटेम साँग असावेत का इथपर्यंत कुठलेही मुद्दे बिनधास्त मांडा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाण्यावर चेहर्‍याने केलेला उत्तम अभिनय आजकाल क्वचितच दिसतो. नाच असेल तर हात पाय जितक्या कोनात आणि जितक्या तर्‍हेने वाकवता / वळवता येतील, तसे वळवलेले असतात. पण चेहरा ढीम्म !

मला याबाबतीत नूतन खुपच आवडते, कुठलेही गाणे, तिच्या चेहर्‍यावर / डोळ्यात वाचता येत असे. जलते है जिसके लिये मधे तर सुनील दत्त पेक्षा, तिक्षा अभिनय सरस वाटतो, मला.

पार अगदी सुवर्णयुग म्हणले जाते अश्या काळापासून हिंदी सिनेमांमधे चालत आलेला दळभद्री आणि घातक ट्रेन्ड...

हिरोने छेड काढायची. हिरोईनने चिडून नकार द्यायचा. त्यावर हिरोने बळच 'ना मे हां छुपी है' असं स्वतःच ठरवायचं. हिरविणीला पीड पीड पिडायचं, लटकायचं. तिची खिल्ली उडवणारी गाणी गायची. अचानक अतर्क्यपणे हिरविण प्रेमाला होकार देते.
थोडक्यात हिरविणीच्या नकाराला कोण किंमत देतंय!!

घरातल्या नोकराचं 'रामूकाका' हे नाव ताबडतोब बदलावे >>> आणि काय ठेवावे? रामूकाका नाव असलेल्या नोकराचे सिनेमा याय्चे दिवस गेले आता.

तलाश मध्ये अरमान कपूरच्या ड्रायवरचे नाव रामू होते . कल्पनादारिद्र्य वाट्ले मला .

हिरोने छेड काढायची. हिरोईनने चिडून नकार द्यायचा. त्यावर हिरोने बळच 'ना मे हां छुपी है' असं स्वतःच ठरवायचं. हिरविणीला पीड पीड पिडायचं, लटकायचं. तिची खिल्ली उडवणारी गाणी गायची. अचानक अतर्क्यपणे हिरविण प्रेमाला होकार देते.
थोडक्यात हिरविणीच्या नकाराला कोण किंमत देतंय!! > +१

अनावश्यक ट्रेण्डस म्हणजे 'कुणाच्या' दृष्टीने अनावश्यक हा एक मोठाच भाग आहे. पिटातलं पब्लिक प्रचंड संख्येने आहे. आपल्याला अंदाज असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त संख्येने. 'डिमांडिंग' सिच्युएशनमध्ये गणले जातील इतक्या संख्येने. शिवाय त्यांतही आजकाल अनेक उत्पन्नगट/ वयोगट/ बौद्धिकगट, अनेक संस्कृती, अनेक सेगमेंट्स तयार झाले आहेत. गंमत अशी आहे, की निर्माते लोक कोट्यवधी रूपये खर्चून बसलेले असतात. त्यामुळे कुणाच्या दृष्टीने आपला सिनेमा जास्त एंटरटेनिंग असायला हवा याचा ७५% टक्के निर्माते तरी नीटच अभ्यास करत असावेत. (उरलेल्या १% ची जगबुडी होते त्याला काय इलाज नाही. :फिदी:)

एफएम चॅनेल्सवर सतत किंचाळणारी बॉलीवुडची पंजाबी गाणी वात आणतात आपल्याला, पण कॉलेजगोअर्स (आणि आजकाल लहान मुलेही) तीच गाणी पसंत करतात. त्यांची पाठ असतात. तीच गोष्ट त्या हाय काँट्रास्ट रंगसंगती, कोरस नाच, हिरोची सुपरमॅनगिरी, त्यांची भाषा आणि वरच्या पोष्टीत येणार्‍या अनेक सार्‍या गोष्टी. कधीकधी या सार्‍यांचा इतका अतिरेक होतो, की थेटरमध्ये उभं राहून ओरडावंसं वाटतं. काय करणार? सलमान वगैरे असला तर तेही शक्य नाही. सल्लूच्या फॅन्सनी तिथंच झोडपलं तर? काय इलाज नाही. आपणही जमेल तसं एन्जॉय करावं झालं. असो.

एका गोळीमधे हिरो मेला पाहिजे. >>:हाहा: (अनास्पुरेच्या टोनमध्ये 'याऽला काय अर्थ आहे राऽव? थोडा तरी ड्रामा नको का?' म्हणावंसं वाटतंय.) भिकू म्हात्रेला एका गोळीत एका सेकंदात उडवला होता, आठवतं का? अजूनही असतील उदाहरणे. ८०-९० च्या दशकाइतकं आजकाल प्रेक्षकाला गृहित धरलं जात नाही, ही त्यातल्या त्यात जमेची गोष्ट आहे. बाकी 'ट्रेंड्स'ची गाडी पुढे कशी नि कुठे जाईल, ते सध्या तरी सांगता येणार नाही, इतके प्रचंड बदल होत आहेत.

नंदिनी म्हणल्यानंतर बुटांचा सीन हआहैको नंतर कुठे दिसला नाही, हे लक्षात आलं. लग्नांमध्ये ते बुट प्रकरण तेव्हापासूनच सुरू झालं का? आणि इतकं कॉमन झालं, की खूप सिनेम्यांत ते आलं असावं, असा भास होईस्तोवर?! 'सिनेमातून प्रत्यक्षात आलेले अनावश्यक ट्रेंड्स' हा जास्त मोठा विषय असावा.

आणि हो, 'अनावश्यक ट्रेंड्स' असा विषय आहे, पण तो 'अचाट आणि अतर्क्य सीन्स / ट्रेंड्स' याकडे निघाला आहे. Happy

कसला भारी धागा आहे हा Happy
मराठी कॅरेक्टर तुटकंफुटकं मराठी बोलतात (अ‍ॅक्टर मराठी नसल्यामुळे). खूप उत्तम मराठी कलाकार आहेत त्यांना घेता येईल की.
मराठी सिनेमांमधे पूर्ण किंवा अर्धी हिंदी गाणी.
वर लिहील्याप्रमाणे पंजाबीचा अतिरेक.

साजिरा यांचे मत बर्याच प्रमाणात पटतेय. % बद्दल वगैरे.
पण पंजाबी गाणी कॉलेज गोअर्सना आवडतात ती ऐकून ऐकून. त्यापेक्षा जास्त ठेक्याची सौधिंडियन, मराठी गाणी आहेत की आणि ती गाजतात पण. पण सतत त्या मिका सद्रुश निरक्षर, मवाली वाटणार्या लोकांची गाणी ऐकून बोर होते. म्हन्जे आधीच तीन भाषा शिका आणि वर उर्दू आणि पंजाबी शिका गाणी समजायला हवी अस्तील तर. Sad

चित्रपट हा ज्या त्या समाजाचाच आरसा आहे. विषय जर का हिंदी चित्रपटातील अनावश्यक ट्रेंड्स असेल तर वर डिस्कसलेले सगळे ट्रेंड्स सध्या आवश्यक आहेत.

शेवटी धंदा आहे हो! पब्लिक ला जे आवडतं ते देणार! चार मसाला चित्रपट येतात त्याजोडीला १ चांगला चित्रपट सुद्धा येतो. प्रत्येकाचा प्रेक्षक आहे. मग प्रॉब्लेम कुठेय?

हा, आता असल्या थिल्लर गोष्टी आवडीने बघण्याचा प्रेक्षकांचा ट्रेंड का? असा प्रश्न असेल तर बात वेगळी!!

बहुतेक सगळ्या जुन्या पिक्चर मधे - बाईला उलटी = प्रेग्नन्सी कन्फर्म. बाईला उलटी आली म्हण्जे ती प्रेग्नंटच असली पाहिजे . Proud
राज बब्बर च्या त्या पिक्चरमधे ( तो होठोसे झूलो तूम , गाणे आहे तो ) त्या हीरोईन ला कॅन्सर ने उलटी होते तरे सगळे ती प्रेग्नंट आहे असा समज करून घेतात Sad

रच्याकने, प्रेग्नन्सी = उलटी ही हिन्दी सिनेमा शिकवणुक डोक्यात फिट्ट असल्याने , ९ महिन्याच्या बाळंतपणाच्या काळात अत्ता उलटी होईल , मग होईल अशी पुर्ण ९ महिने मी वाट पहात होते. पण काहे केल्या एकही उलटी आलीच नाही Proud

चित्रपट हा ज्या त्या समाजाचाच आरसा आहे.>>>

प्रचंड असहमत.

धकाधकीच्या आयुष्यातल्या गोष्टींपासून चार घटका दूर जाण्यासाठी अवास्तव दुनियेत रमण्यासाठी पूर्वी प्रेक्षक चित्रपट पाहत होता. कॅन्सरचा आनंदी पेशंट ही कवीकल्पना आहे. प्रत्यक्षात असा माणूस असणे शक्य नाही. शंभर जणांची धुलाई करूनही स्वतःसाठी एक पैसाही न घेणारा नायक हा समाजाचा आरसा असू शकत नाही. समाजात नसलेल्या गोष्टी रूजवण्याचं काम चित्रपटाने केलं. बॉबी चित्रपटानंतर मुलं मुली घरातून पळून जायच्या प्रकारात वाढ झाली. त्याचबरोबर पूर्वीच्या चित्रपटांनी धार्मिक सलोखा टिकवण्याचंही काम केलं. असे बरे वाईट मुद्दे अनेक आहेत.

हिरविणीचा नकार कधी असतो? ती तर संदर्भासहित ड्रीमं वेकपं करत असते. म्हणून तर हिरू
नया नया साल है नया नया माल है म्हणू शकतो. पब्लिक की पसंद. और क्या.

१. सगळ्यात आधी हीरोच्या आईला त्याला लहानपणापासून सगळे पदार्थ खायला शिकवा. सारखा गाजर का हलवा!
२. बर्फाळ प्रदेशातल्या गाण्यांत (फॅन्टसीतही) हीरोईनला स्लीवलेस ब्लाऊज आणि मलमली साड्या कशाला? नंतर मेकिंग ऑफ मध्ये त्या हिरोईनला कशी हुडहुडी भरली होती ते साग्रसंगीत दाखवतातच. तशा ठिकाणी हनिमूनला गेलेल्या जोडप्यांचा आयुष्यातल्या स्वप्न आणि सत्याचा पहिला सामना होतो तो इथे! Proud
३. सिनेमातली ती लहान पण अतिशहाणी मुलं. त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे वागू बोलू द्या.
४. हिरोईनला घरात घरातले वाटतील असे कपडे आणि सँडल द्या.

"बहुतेक सगळ्या जुन्या पिक्चर मधे - बाईला उलटी = प्रेग्नन्सी कन्फर्म. बाईला उलटी आली म्हण्जे ती प्रेग्नंटच असली पाहिजे ."

हाहा.. 'क्या कहना' मध्ये भावाच्या चालू असलेल्या लग्नात प्रीटी झिंटाबैंना चक्कर येते, तर लगेच तिची आई 'झाली का ही बया प्रेग्नंट?" असं कमालीच्या विश्वासानं बघते. लगीनघाईमुळं नीट खाणं झालं नसेल, उन्हानं चक्कर आली असेल असले विचारसुद्धा तिच्या मनात येत नाहीत.

मलमली साड्या >>
इथे जरा एक अवांतर प्रश्न विचारतेय. मलमल म्हणजे नक्की काय? हा कापडाचा प्रकार आहे ना? मी लहानपणी सॅटिन असा त्याचा अर्थ समजत होते. मग सासरी बर्‍याच जणांना मलमलचा झब्बा, शर्ट असे बोलताना ऐकले. बघितले तर तलम कॉटनच्या झब्ब्या/शर्टा ला ते मलमल संबोधत होते. त्यामुळे हल्ली मलमल म्हणजे तलम सुती कापड असा समज करून घेतला आहे. पण मग वरच्या पोस्टीत आशूडी ने म्हटलेय ते 'मलमली साड्या' किंवा आशा च्या गाण्यात 'मलमली तारुण्य माझे..' ह्यात मलमल शब्द कोणत्या अर्थाने येतोय??

(मला सुती व पातळ साड्या घातलेल्या हिरवीणी दिसताहेत डोळ्यांसमोर! Proud )

मलमल हे अत्यंत तलम अश्या सुती कापडाचे नाव आहे. तलमपणा, वजनाला हलके, तरीही मजबूत. उन्हाळ्यासाठी योग्य कापड.

व्हेलवेट म्हणजे मखमल.

आशूडी म्हणतीये त्या साड्या मलमली नसून शिफॉन/ जॉर्जेट प्रकारातल्या आहेत. Happy

ढाक्क्याच्या मलमल बद्दल मी असं ऐकलंय की ही मलमल इतकी तलम असायची की एक नऊ वारी साडी एका माचिसच्या डबीत मावायची.

मला वाचवल्याबद्दल धन्यवाद नी. Proud मला पातळ, मऊ, सुळसुळीत, झिरझिरीत एवढं लिहायचा कंटाळा आला होता. शेवटी लिहावं लागलंच.

बहुतेक सगळ्या जुन्या पिक्चर मधे - बाईला उलटी = प्रेग्नन्सी कन्फर्म. बाईला उलटी आली म्हण्जे ती प्रेग्नंटच असली पाहिजे .">> त्यापेक्षा चक्कर येऊन पडली की डॉक्टर घरी येतो.स्टेथास्कोपने तपासतो आणि "मुबारक हो" म्हणतो. (या अस्ल्या बर्‍याचशा सीन्सची लिस्ट अचाट आणि अतर्क्य सीन्स या बीबीवर बघायला मिळेल)

प्रत्येक हीरो पिळदार दंड आणि भरदार छाती वगैरे घेऊन असतो... जोडीला आजकाल ते ६-८ प्याक सुद्धा! काय गरज आहे? पूर्वीच्या काळी कसे अमोल पालेकर पासून बच्चन पर्यंत सगळे आमच्यासारखी शरीरयष्टी असणारे हीरो असायचे.. हे असे साच्यातून अवयव काढून जोडलेल्या शरीराचे सांड-ब्रीड हीरो बास करा आता... (अपवाद- रणबीर कपूर.. म्हणून मला लै आवडतो अन् पटतोही !)

ओह रसप... मग काय चार पोरांचे बाप दिसणारे हिरो बघायचे की काय?
हिरविणी खालच्या मजल्यावरच्या बावळट यमूसारख्या चालतील काय? मग हिरो तरी कोपर्‍यावरच्या सदूसारखे कशाला? Wink
ह घे हे वे सां न ल

नीधप...!!

Happy

चार पोरांचे बाप नाही हो... तसं म्हणायचं असतं तर राजेन्द्र कुमार, अशोक कुमार प्रभूतींची नावं घेतली असती ना! माझं म्हणणं हे की हीरो कधी तरी आमच्यासारखा साधा दिसावा.... ते प्याक-ब्यिक बघून माझ्यासारख्या सिंगल पसली, एकच प्याकला काहीच 'डिमान्ड' नसल्याचा अवास्तव न्यूनगंड येऊ शकतो !!

अश्लिल शब्दरचना असलेली गाणी, त्यावर तोकडया कपडयात नाचणारया हिरोईन्स, आधी राखी सावंत नाचायची आता सरसकट सर्वंचजणी नाचतात आणि तिच्याभोवती लाळ पघळत नाचणारे पुरुष..... यक.... बघुनच घाण वाटते.... पुन्हा अशी गाणी करण्यात हल्ली हिरोइन्स मध्ये देखील चढाओढ.... मी आइटम साँग करताना एकदम ढिच्यॅंक आइटम वाटते कि नाही.... एकदा करिना कपुर तिच्या कोणत्यातरी फिल्मच्या प्रमोशनसाठी टिव्ही कार्यक्रमात आली होती. त्यात ती प्रेक्षकांना हसुन विचारते हलकट जवानीमें मै हलकट लगती हुं ना! या हिरोईन्स असल्या गाण्यांवर नाचुन स्वतःच्या बॉडीगार्डसोबत एसी गाडीतुन फिरणार व रस्त्यावरुन जाणारया मुली, बायकांना फालतु लोक शीला की जवानी,हलकट जवानी, फेवीकॉलसे वगैरे गाणी गाउन छेडछाड करणार व मग अश्या रस्त्यावर फ्रि अवेलेबल असणारया मुलींवर बलात्कार झाले कि मग याच हिरोईन्स स्त्रियांची मान-मर्यादा किती महत्वाची आहे यावर मिडियात लेक्चर्स देणार. छान चाललय.......

यशस्विनी हाच लोकांचा प्रॉब्लेम आहे, हलकट किंवा जवानी सारखे शब्द आपल्या भारतीय साहित्यात आहेत याचाच अर्थ ते वर्ज्य नसावेत. करिनाने विचारलेला प्रश्न अतिशय प्रोफेशनल आहे. कारण त्यात तिने हलकट दिसणंच अपेक्षित आहे. पण पाहणारे लोक त्याच्याकडे प्रोफेशन म्हणून किंवा एक भूमिका म्हणून पहात नाहीत. तो शब्द किंवा त्याचा त्यांना लागलेला अर्थ ते थेटराच्या बाहेर आणून खर्‍या आयुष्यात या अशा (तुम्ही वर सांगितलेल्या) पद्धतीने वापरायचा प्रयत्न करतात. तिथेच तर गोची होतेय.

बैल छाप जर्दा,
<<धकाधकीच्या आयुष्यातल्या गोष्टींपासून चार घटका दूर जाण्यासाठी अवास्तव दुनियेत रमण्यासाठी पूर्वी प्रेक्षक चित्रपट पाहत होता. कॅन्सरचा आनंदी पेशंट ही कवीकल्पना आहे. प्रत्यक्षात असा माणूस असणे शक्य नाही. शंभर जणांची धुलाई करूनही स्वतःसाठी एक पैसाही न घेणारा नायक हा समाजाचा आरसा असू शकत नाही. समाजात नसलेल्या गोष्टी रूजवण्याचं काम चित्रपटाने केलं. बॉबी चित्रपटानंतर मुलं मुली घरातून पळून जायच्या प्रकारात वाढ झाली. त्याचबरोबर पूर्वीच्या चित्रपटांनी धार्मिक सलोखा टिकवण्याचंही काम केलं. असे बरे वाईट मुद्दे अनेक आहेत.
>>

यातील प्रत्येक वाक्य खरे करून दाखवीणारी माणसं समाजात आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कथा बनतात. चित्रपट हा ज्या त्या समाजाचाच आरसा असतो! अगदी फ्यान्टसी जरी घेतली तरी ज्या त्या समाजाला पटेल-भावेल अशीच असते.
याची corollary पण खरी आहे - चित्रपटात दाखवतात ते सगळं खरोखरीच असतं अशी समजूत करून मोठा समाजघटक आयुष्य कंठतो.

भाभी का सिंदूर की अजून काय आणि तत्सम डबड्या सौभाग्यवस्तू भांडार सिनेमांनी चांगले असणे = वाट्टेल ते सहन करणे याचे जे कमालीचे मूर्ख उदात्तीकरण केलेय ते हिडीस आहे.

पण पाहणारे लोक त्याच्याकडे प्रोफेशन म्हणून किंवा एक भूमिका म्हणून पहात नाहीत. तो शब्द किंवा त्याचा त्यांना लागलेला अर्थ ते थेटराच्या बाहेर आणून खर्‍या आयुष्यात या अशा (तुम्ही वर सांगितलेल्या) पद्धतीने वापरायचा प्रयत्न करतात. तिथेच तर गोची होतेय.>> दक्षिणाचा सत्कार करा. Happy एकदम परफेक्ट!!!!

दक्षिणाचा सत्कार करा.

(एकदम 'सरकारनामा' आठवला :अओ:)

भाभी का सिंदूर की अजून काय आणि तत्सम डबड्या सौभाग्यवस्तू भांडार सिनेमांनी चांगले असणे = वाट्टेल ते सहन करणे याचे जे कमालीचे मूर्ख उदात्तीकरण केलेय ते हिडीस आहे.

+१००००००

बैल छाप जर्दा --> एक प्रतिसादक कधी आणि का ? आमच्या प्रतिक्रियांमध्ये आलेले तुमचे नाव एडिट करायला लागणार का?

बैल छाप जर्दा - एक प्रतिसादक. हा बदल सुचला याबद्दल देवाचे आभार मानतो. नामसाधर्म्य असणारे आयडी आता दिसताहेत. असो. जोपर्यंत कुणी लिहीलंय यापेक्षा काय लिहीलंय हे पाहणारा एखादा आयडी शिल्लक आहे तोपर्यंत फिकीर करण्याचं कारण नाही.

तरी इच्छा असेल तर रूबरू नावाचा हिंदी सिनेमा अवश्य बघा.
>>
मी पाहियालाय तो मूव्ही बहुदा
पण कुणास ठाऊक का मी प्रचंड अस्वस्थ झालेले तो सिनेमा संपल्यावर
पुन्हा नाही पाहू शकत मी आता तो सिनेमा

<<बैल छाप जर्दा - एक प्रतिसादक. हा बदल सुचला याबद्दल देवाचे आभार मानतो. नामसाधर्म्य असणारे आयडी आता दिसताहेत. असो. जोपर्यंत कुणी लिहीलंय यापेक्षा काय लिहीलंय हे पाहणारा एखादा आयडी शिल्लक आहे तोपर्यंत फिकीर करण्याचं कारण नाही >>

नावापेक्षा काय लिहिलंय हे महत्त्वाचं वाटतंय तर नाव बदलू नका. बैल छाप जर्दा छान होतं की नाव! Happy

सुलुजी धन्यवाद. पण काही जण मुद्दाम नामसाधर्म्य असलेले आयडी वापरत असल्याने आता हाच ठीक आहे. या आयडीचं नामसाधर्म्य सहजशक्य होणार नाही. अवांतर बद्दल क्षमस्व ! Happy

पण पाहणारे लोक त्याच्याकडे प्रोफेशन म्हणून किंवा एक भूमिका म्हणून पहात नाहीत. तो शब्द किंवा त्याचा त्यांना लागलेला अर्थ ते थेटराच्या बाहेर आणून खर्‍या आयुष्यात या अशा (तुम्ही वर सांगितलेल्या) पद्धतीने वापरायचा प्रयत्न करतात. तिथेच तर गोची होतेय.>>

दक्षिणा, १०००% सहमत.

१. उठ्सूठ कबूली द्यायला वा मनःशांती साठी चर्च मधे जाणे - कथा भारतात व हिन्दू लोकांची असली तरीही
<<<<<<<<<आता हा ट्रेंड मराठीतही लागू होतोय. कथा गोव्यात घडते म्हणून ती मितवातील नंदिनी (तिचे सरनेम माहित नाही) उठ सुठ चर्च मध्ये जाते. गोव्यात मंदिर आहेत न अगदी फ़ेमस.

चांगला धागा.
आयटेम नंबर्सच्या पोस्टसना प्रत्येकी एकेक मत दिलंच आहे. यशस्विनी यांचा प्रतिसाद खूप आवडला.
या ट्रेण्डविरुद्ध मत देणं म्हणजे आपण काळाबरोबर नाहीत कि काय असा गंड निर्माण होण्यासारखे दिवस असताना अनेक जणांना सेमच वाटतंय हे पाहून बरं वाटलं.

Pages