हिंदी चित्रपटातील अनावश्यक ट्रेण्डस

Submitted by एक प्रतिसादक on 17 November, 2012 - 04:45

जब तक है जान या चित्रपटाचं परीक्षण वाचताना आलेल्या मजेशीर प्रतिक्रियांनी छान करमणूक झाली. तिथेच एक वेगळा बाफ असावा अशी एक सूचना पण आलेली. असंबद्ध असले तरी काही काही मुद्दे विचार करण्यासारखे असल्याने हा .वेगळा बाफ. हिंदी चित्रपटात सुरू झालेले अनावश्यक ट्रेण्डस याविषयी या बाफवर चर्चा करता येईल. चित्रपट कसा आहे हे कळण्याआधीच शंभर कोटींचा गल्ला जमवून पळून जाणा-या निर्मात्यांपासून ते दक्षिणेची नॉनसेन्स अ‍ॅक्शन असावी का, आयटेम साँग असावेत का इथपर्यंत कुठलेही मुद्दे बिनधास्त मांडा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) पाहुण्या कलाकारांची गाणी असावीत, मजा येते त्यांनी... पण ती ठराविक पद्धतीने ( म्हणजे उत्तानपणे ) चित्रीत झालेली नसावीत.

२) मागे नाचणार्‍यांची संख्या मर्यादीत असावी.. आदर्श नंबर.. गाईडमधल्या, "पिया तोसे.." इतकाच.

३) नवनवीन लोकेशन्स निवडली जाताहेत... ते फार आवडते. ठराविक ऊटी / सिमला / काश्मिर आता फारसे दिसत नाही.

४) कलाकारांच्या लूक्स वर वेगवेगळे प्रयोग व्हावेत. त्यानेही ताजेपणा वाटतो. सगळ्या चित्रपटात, एकच हेअरस्टाईल / एकच लूक / एकच टोन.... वैताग येतो.

अर्थातच.. हिरो मरत नाही म्हणून तर पिक्चर चालतो ना तीन तीन तास.. आपल्या इथे त्याच्या सिनेमा मधे त्याचा पुर्नजन्म दाखवतात. हॉलिवूड मधे निदान सिक्वल तरी बघायला मिळतो.

दिनेशदांचे आणि माझे बरेच मुद्दे नेहमी जुळतात. माझ्याकडून नवीन म्हणजे मॅट्रिक्सच्या ग्राफिक्सचा अ‍ॅक्शनसाठी केलेला चुकीचा वापर. हिरो बलदंड आहे हे दाखवण्यासाठी अतार्किक दृश्यांची गरज नाही. अर्नोल्डच्याही सिनेमात ट्रिक्स असतात, पण त्या खटकत नाहीत कधी. सन ऑफ सरदार मधे तर एका गुंडाला बास्केटबॉलप्रमाणे जमिनीवर आदळवलेले दाखवलेय. सरदारच्या फेट्याने गुंड हवेत उधळले जाणे वगैरे आता उबग आणणारे आहे. कधीतरी गंमत म्हणून ठीक, पण आता हा ट्रेण्ड होऊ पाहतोय.

चित्रपटातली पात्रे मुंबईतली असो वा लंडनमधली, ती जेव्हा गाण्यासाठी तोंडे उघडतात तेव्हा पंजाबी शब्दांची भरमार असलेली गाणीच गातात. हे आता अती झालेय. गाण्यात इंग्रजी शब्दांची रेलचेल असते त्याबद्दल माझी काहीच हरकत नाहीय कारण सामान्य बोलीभाषाच तशी झालीय. पण हे पंजाबी प्रकरण आवरा. कंटाळा आला.

साधनाबायको येकदम आणुमोदन. अबके बाद आपुनकू घाटी हिंदी मंगता हय. कोईभी सुनेगा तो फुल्टू आडवा पडणेका. खालीफोकट मस्ती नै करनेका. इदर मुंबईमे शिणेमा बनानेका तो घाटीपणाके बगैर कैसा बनेगा. वैसाभी हम वासेपूर शिणेमा देखके मस्तपैकी प्रसन्न हुवा. क्यू मालूम हय? उसमे बहोत सारे मराठी शब्द मिले. अकलकांदा, दूध ढोस, ###पट्टी, और क्याक्या! हमरी तब्ब्येत अफलातून खूष हुयी.

-गा.पै.

लवकरात लवकर आपल्या मातीशी निगडीत सिनेमे काढावेत. जरा चांगले संगीतकार आणि कवी मिळावेत. काय ती गाणी आईकावत नाही कि बघवत नाहीत. शब्द काय आणि अचकट विचकट अंगविक्षेप काय. कशाच कशाला पायपोस नाही. मुळात हल्ली सिनेमे काढणारे सगळेच इंग्रजीमध्य्न शिकलेले दिसतात. ह्यांना एका धड हिंदी वाक्य बोलता येत नाही. नाहीतरी सगळेच कुठल्या न कुठल्या इंग्रजीची सिनेमाची अत्यंत भ्रष्ट नक्कल करतात. त्यापेक्षा ओरिजिनल इंग्रजी पिक्चर बघितलेला उत्तम.

तमिळ चित्रपटांचे रिमेक करण सुद्धा कमी करायला हव.
वाँटेड, सिंघम, रेडी, राउडी राठोड, रावण (अभिषेकचा), आणि बरेच...

दीपान्जली ला अनुमोदन...

इतर काही नकोसे ट्रेंडस
१. उठ्सूठ कबूली द्यायला वा मनःशांती साठी चर्च मधे जाणे - कथा भारतात व हिन्दू लोकांची असली तरीही
२. अती लांडे कपडे व ईंग्लिश बोलण्याचा अतिरेक
३. तथाकथीत 'देशी' मसाला सिनेमांमधे (उदा. सिन्घम, राठोड, बोल्-बच्चन ) रंगांचा धुमाकूळ. भडक आणि हाय्-कॉन्ट्रास्ट फ्रेम्स - बेगडी वाटतात
४. सिनेमा संवादांमधे ई-मेल मधले पीजे - हे म्हणजे लेखकाची बौध्दीक दिवाळखोरी दिसते.

दीप्ति नवल किंवा विद्या सिन्हा सारख्या प्रसन्न हसणार्‍या मध्यमवर्गीया सुरेख मुली आता दिसत नाहीत. एकदम हाय फाय. नाहीतर बार डान्सर्स/ गांव कि गोरी. बघवत नाही सारखे सारखे.

अश्विनी, बालनांची विद्या आहे ना ?

अंकु, ते लोक म्हणजे परदेशातले बेकार लोक असावेत. इथून एवढे नर्तक नेणे परवडत नाहीत आणि परदेशात तर असे नर्तक सहज उपलब्ध असतात. ताल त्यांच्या अंगात असतोच. कपडे फारसे लागत नाहीत. करायच्या हालचाली, (म्हणजे नाच हो ) त्यांच्यासाठी फारश्या अवघड नसतात.. पैसेही फार मागत नाहीत.. आणखी काय
हवे निर्मात्याला ? Happy

बाकी आपल्या मातीतले कथानक, सभ्य विनोद, पटेल अशी हाणामारी.. याबाबत जोरदार अनुमोदन.

अंगप्रदर्शनाचा जो काही ट्रेंड आहे तो सेटच होत नाहीये. दिवसेंदिवस अतीच तोकडे कपडे नी बीभत्स, ओंगळ अंगप्रदर्शन दाखवलं जातंय.

दिनेस आजकाल विद्या बालन आली की मी चॅनेल बदलते. ती कायम त्या उल्ल्ल्ला उल्ल्ल्ला स्टेप्सच करून दाखवते. टीव्हीचा फ्युज जाइल ना.

हल्ली आयटम साँग म्हणुन मराठी लावण्यांचा र्ट्रेंड आला आहे. एखाद दुसर मराठी वाक्य आणि अतीशय विचीत्र पद्धतीने नेसलेली नउवारी.

हल्लीच्या साड्यांचे पदरही आवरा कोणीतरी. साडी बरी असते पण पदर म्हणुन जे काही अंगावर घेतात ते जेमतेम दोन इंच रुंद असते.

रेहमानचं संगीत असलं की एक तरी सुफी गाणं असावच हा त्याचाही ट्रेंड होऊ पाहतोय का? (सगळीच नाही, पण जोधाअकबर आणि रॉकस्टार मध्ये होतं...)

प्रत्येक चित्रपटात दिसणारी "गे" पात्र . त्यांचे प्रश्न मांडायचे असतील तर गोष्ट वेगळी . पण उगाचच कॉमेडीच्या नावाखाली आचरट्पणा असतो हल्ली.

कुटुंब गुजराती, रहातात प.बंगालमधे, दुसर ध्यान ही जवळपासहुनच वाहुन आलेलं.आणी साखरपुड्यात गाणं मात्र पंजाबी......सांगा पाहु पिच्च्रर कोणता तो ?

इथून एवढे नर्तक नेणे परवडत नाहीत आणि परदेशात तर असे नर्तक सहज उपलब्ध असतात. ताल त्यांच्या अंगात असतोच. कपडे फारसे लागत नाहीत. करायच्या हालचाली, (म्हणजे नाच हो ) त्यांच्यासाठी फारश्या अवघड नसतात.. पैसेही फार मागत नाहीत.. आणखी काय
हवे निर्मात्याला ? <<<

परदेशी लोक नृत्यात तरबेज, कमी कपडे घालणारे आणि यांच्या सिनेमात गर्दीत नाचायला टपून बसण्याइतके लुख्खे आहेत.. आणि पैसे घेत नाहीत...
काय पण गृहितकं...

नृत्यात तरबेज असण्यानसण्याचा परदेशी असण्यानसण्याशी काहीही संबंध नाही.
परदेशी लोक कमी कपडे घालणारे अश्या प्रकारच्या कॉमेंटस निदान जगभर फिरणार्‍याने तरी करू नयेत.
लेबर चार्जेस हे भारतापेक्षा पाश्चात्य देशात नक्कीच जास्त आहेत. ज्युनियर आर्टिस्टसचे पर डे हे इथल्या मानाने खूप प्रचंड आहेत युरोप आणि अमेरिकेमधे...

करण जोहर सिनेमा टाईप्स कॉलेजेस जिथे पूर्ण ग्रूप मध्ये एखादे बावळट ध्यान (किंवा गे पात्र), एखादी टॉम बॉयिश मुलगी, एखादे आधीच जुळलेले कपल आणि कॉलेज मध्ये अभ्यास कमी आणि खेळ, टूर्नामेंट्स, मज्जानी लाईफ जास्त असे चुकीचे संदेश देणारे गुडी गुडी वातावरण व आचरट शिक्षक इ.इ . (आठवा कुकुहोहै, प्यार किया तो डरना क्या इ. )

नीधप, गृहितक नाही, स्विसमधे जे बघितलं तेच लिहिलय. सध्या तरी युरपमधे प्रचंड बेकारी आहे. ते लोक करतात किंवा त्यांना जे करायला लावते, त्याला नाच म्हणवत नाही. अंकुने फिरंगी हा शब्द वापरलाय, त्यामूळे माझ्या पोस्टमधले, परदेशी हा शब्द पण त्याच अर्थाने घ्यायचाय. सर्वच परदेशींबद्दल नाही. इथल्या ज्यूनियर आर्टीस्ट्ना व्हीसा काढून, विमानाने तिथे नेण्यापेक्षा, ते स्वस्तच आहे.

आणि हो.. माझे पोस्ट माझ्या स्वतःच्या नावाने आहे, त्यामूळे, " जगभर फिरणार्‍याने " असे विशेषण वापरण्यापेक्षा, दिनेश लिहिणे सोपे होते... हा पण एक ट्रेंडच झालाय... सॉरी विषयांतर झाले, पण थेट नाव घेऊन लिहावे, या मताचा मी आहे.

एखाद्याचे मत पटले नाही तर आपले मत मांडावे वा असहमती दर्शावी. वैयक्तीक उल्लेख कशाला ?

आणि मी जगभर फिरलेलो नाही, तसा दावाही कधी केलेला नाही.

कुटुंब गुजराती, रहातात प.बंगालमधे, दुसर ध्यान ही जवळपासहुनच वाहुन आलेलं.आणी साखरपुड्यात गाणं मात्र पंजाबी......सांगा पाहु पिच्च्रर कोणता तो ?
>> दिग्दर्शक सौंदिंडीयन. विविधता मे एकता. Happy

स्मृतीभ्रंश, डोक्याला मार लागून काही काळापुरते काही न आठवणे इ. इ. कालबाह्य करायला हवेय आता. हास्यास्पद होत चालले आहे.
तसेच एकदा मीलन झाले की गेलेच लगेच हिरविणीला दिवस इ. Wink नशीब जतहैजा मध्ये कतरीना शाहरुख च्या मुला/मुलीला युके मध्ये एकटीच वाढवीत आहे वै. दाखवणे टाळलेय.

परदेशी घडत असलेल्या बर्‍याच चित्रपटातला परदेशी पोलीस अधिकारी हिंदी बोलताना पाहिलाय. त्याचं काहितरी करा राव.

परदेशी घडत असलेल्या बर्‍याच चित्रपटातला परदेशी पोलीस अधिकारी हिंदी बोलताना पाहिलाय. त्याचं काहितरी करा राव. << +१

बहुतेकदा टॅक्सी ड्रायवर देखील भारतीयच असतात.

गिरीश Lol
नंदिनी Rofl
पणआअ‍ॅटमीट, डायवर खरंच देशी असतात....मला नव्या यॉर्कात काय आणि व्हॅनकुवरमध्ये काय बहुतेक मोठ्या शहरात देशी आणि ते पण भारतीयच टॅक्सी डायवर भेटलेत. फार फार तर शेजारची दोन राष्ट्रे पण चेहरे देशीच.

मी तर म्हणते राहुदेत काही काही ट्रेंड्स तसेच...मनोरंजन मुल्यपण कमी होईल..आधीच कथांची कमी आहेच... Wink
इन फॅक्ट थोडं 'सीआयडी" मधलं पण टाका पिच्चर्समध्ये Proud

रियलिस्टिक गोष्टी दाखवाव्यात.

हिरो हिरॉईन फक्त कल ५ बजे मिलते है म्हणतात आणि जातात. कुठे ते सांगतच नाहीत. वेळेत पोहोचतात. कधी गाडी पंक्चर झालेय, ट्रॅफिकात फसलेत, रिक्षेवाल्याशी भांडण झालय, घरी पाकिट विसरलंय इ. प्रॉब्लेम्स दाखवत नाहीत.

अत्यंत वेल टू डू फॅमिली... बाप कायम बिझनेसमन... आणि आई घरी.. नाश्त्याला ब्रेड, ज्यूस हेच पदार्थ दाखवतात, पोहे उपिट दाखवावे...

हिरो हिरॉईन गाडीतून येतात, कुठेही पार्किंग मिळते सहज... जरा घुमवा की पार्किंगसाठी. आम्ही इथे पूण्यात टूव्हिलर घेऊन जायला ही चरकतो.. Uhoh

किचन एकदम चकचकित मोठ्या मोठ्या फॅमिलिचा नाश्ता फर्माइइशीनुसार... जादूने करतात का काय? पीठ संपलय, दूध नासलंय हे कधी दाखवतच नाहीत. गॅसवर कायम पातेल्यात नुसतच काहीतरी हलवताना दाखवू नये.. स्वयंपाक म्हणते तेव्हढंच नसतं.. Uhoh

नायक नेहमी सुपरह्युमन दाखवला जातो. सामान्य माणसाचे प्रॉब्लेम्स नायकाला येतच नाहीत. हाणामारीच्या एखाद्या तरी प्रसंगात नायकाने व्हिलनला विनंती करताना दाखवावे कि " बाबा रे , बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय सध्या. आपण या वीकेण्डला हाणामारी ठेवू."

मला नव्या यॉर्कात काय आणि व्हॅनकुवरमध्ये काय >>>>

नव्या दिल्लीत आणि वड्याळ्यात असं नव्हतं ना लिहायचं ?? Uhoh

उंच उंच ग्लासात ऑरेंज ज्युस भरून हाटॅलांमधे व्हीलन हिरो किंवा कोणीही दोघे महत्वाचे बोलत असतात आणि दहा दहा मिनिटे ते ज्युसाला तोंड लावत नाहीत. आपण मात्र कोरड पडलेल्या घश्याने बघत बसायचे.

दक्षिणा, कथेची गरज असेल त्यानुसा॑रच आणि तेवढेच दाखवले जाणार ना? अडीच तीन तासामधे सिनेमा आटपायचा असतो. उगाच गरज नसताना कुठेही "दूध नासल्याचा" सीन कशाला दाखवतील?
नाश्त्याला ब्रेड, ज्यूस हेच पदार्थ दाखवतात, पोहे उपिट दाखवावे... >>> घर मराठी असेल तर ठिक आहे, पंजाबी/गुजराती/बंगाली लोक पोहे उपीट कशाला खातील?

आपल्या आयुष्यामधे जसं रोज घडतं तसं सिनेमामधे व्हायला हवी ही अपेक्षाच मलातरी हास्यास्पद वाटते आहे. सिनेमा फँटसी असते. रोजचं तेच तेच जगणं यायला लागलं तर पदरचे पैसे खर्च करून कोण जाईल बघायला??? तरी इच्छा असेल तर रूबरू नावाचा हिंदी सिनेमा अवश्य बघा. हिरो हिरॉइन्सचा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंतचेच चित्रण इंटरव्हलपर्यंत आहे. इंटर्व्हलनंतर हीरो झोपेतून जागा होते आणि आधी पाहिलं ते स्वप्न होतं हे आपल्याला समजतं. नंतर त्याला स्वप्नात दिसलेले प्रत्यक्षात व्हायला लागते. थोडक्यात तेच सीन परत रीपीटमोडमधे.

मस्त धागा आहे हा, माझे हात जाम शिवशिवतायत लिहायला Lol

*हिरो किंवा हिरॉईनच्या बड्डेला त्यांचे रिस्पेक्टिव्ह बाप त्यांना चारचाक्याच भेट देतात. काहीही देऊ नका... रडून थयथयाट करणारी हिरॉईन दाखवा की.

* घरातल्या नोकराचं 'रामूकाका' हे नाव ताबडतोब बदलावे Angry

* सिनेमातल्या कुटुंबांची नावं 'सिंघानिया', शर्मा, वर्मा, अरोडा, सिंग ऐवजी
केळकर, म्हात्रे, पाटील, कुडचेडकर, तांबे अशी ठेवावीत.

* हिरो हिरॉईनच्या झाडाभोवतीच्या नाचकामाऐवजी त्यांचे तात्विक वाद दाखवावेत.
लग्नात बूट पळवणे, करवा चौथ होली बिली सगळं कट करावं.

हिरो किंवा हिरॉईनच्या बड्डेला त्यांचे रिस्पेक्टिव्ह बाप त्यांना चारचाक्याच भेट देतात. काहीही देऊ नका... रडून थयथयाट करणारी हिरॉईन दाखवा की. >> कथेमधे गरज असेल तर दाकह्वतील. अन्यथा कशाला दाखवतील? उगाचच.

घरातल्या नोकराचं 'रामूकाका' हे नाव ताबडतोब बदलावे >>> आणि काय ठेवावे? रामूकाका नाव असलेल्या नोकराचे सिनेमा याय्चे दिवस गेले आता.

सिनेमातल्या कुटुंबांची नावं 'सिंघानिया', शर्मा, वर्मा, अरोडा, सिंग ऐवजी
केळकर, म्हात्रे, पाटील, कुडचेडकर, तांबे अशी ठेवावीत. >> गरज आहे तेव्हा अशीच काय पण बाबूराव आपटे, भिकू म्हात्रे, अर्जुन जोगलेकर, दामले, पाटील अशी नावे येऊन गेलेली आहेत सिनेमामधे.

हिरो हिरॉईनच्या झाडाभोवतीच्या नाचकामाऐवजी त्यांचे तात्विक वाद दाखवावेत.
लग्नात बूट पळवणे, करवा चौथ होली बिली सगळं कट करावं.>>> लग्नात बूट पळवणे हे मला वाटतं हम आपके है कौनमधे होतं त्यानंतर कुठल्या सिनेमामधे होतं?
तात्त्विक वाद म्हणजे नक्की काय? सिनेमा आहे तो. मायबोली न॑व्हे. उगाचच्या उगाच वाद दाखवायला. तीन तासामधे जी काही असेल ती कथा दाखवणे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांना पैसावसूल करून देणे हाच एक इरादा असतो त्यांचा. प्रेक्षकांचा पैसावसूल झाला तरच त्यान्चा धंदा चालणार आहे.

बरं समजा, हे सर्व काही तू म्हणते आहेस तसे आर्ट सिनेमा नावाखाली कितीतरी सिनेमा येत असतात, तू नियमितपणे तेच पाहत जा. कुणी अडवलय?

पंजाबी गाणी आता अगदी अंगावर शिसारी आणतात. जतहैजा मधलं पुन्हा पुन्हा वाजणारं गाणं मला अगदी कालपर्यंत 'जल्ला...जल्ला' आहे असं वाटत होतं आणि त्यामुळे प्रश्न पडत होता की हे गाणं सिद्धार्थ जाधव साठी लिहिलं होतं की काय किंवा त्यानेच गायलं तर नाही ना? काल कळलं ते 'चल्ला' आहे!

चित्रपट हिंदी असताना गाणं हिंदीच असायला हवं.

आजकालच्या सिनेमातले अभिनेते (आणि अभिनेत्र्याही) उपकार केल्यासारखे हिंदी बोलतात. गाण्यातही अकारण इंग्रजीची भेसळ असते. ते नको वाटते. रस्त्यावर तशी भाषा बोलली जाते म्हणून सिनेमातही तशीच बोलणार हे मला पटत नाही कारण सिनेमातील गोष्टी भव्य दिव्य असाव्यात अशीच सामान्य पब्लिकची अपेक्षा असते.
सिनेमात बोलली जाणारी हिंदी ही उर्दूची कमीजास्त सरमिसळ असणारी असते असे माझे निरीक्षण आहे. पण ही भाषा इतकी समृद्ध आहे की सिनेमातील कुठला प्रसंग रंगवायला ती कमी पडेल असे वाटत नाही. पण नव्या पिढीचे अभिनेते ह्या भाषेत कच्चे आहेत असे साफ दिसते. बहुतेक लोक सिनेमात काम करायचे म्हणून शिकवण्या लावतात. आणि सिनेमाशी संबंधित कुठलाही कार्यक्रम, मग मुलाखत असो वा पुरस्कार सोहळा, कायम फाडफाड इंग्रजीच हाणतात.

तेव्हा मेहरबानी करुन बॉलिवुडी सिनेमे हिंदीतच राहू द्यावेत. वाटले तर इंग्रजाळलेल्या भारतीयांकरता अस्सल भारतीय इंग्रजीत वेगळे सिनेमे बनवावेत. पण ह्या रुबाबदार, राजबिंड्या, श्रीमंत हिंदी भाषेला इंग्रजीची बटिक बनवू नये.

एखादी गझलही ऐकायला मिळावी .. सरफरोश नंतर चांगली गझल , तीही योग्य प्रकारे मेन स्ट्रीम सिनेम्यात वापरलेली बघितली नाही.

जुन्या गाण्यांचे रिमिक्स नको व्ह्यायला. कल्पनाशक्तीचे इतके दारिद्र्य आलेय की काय असे वाटते कधी कधी. Uhoh

Pages